एच सी एल टेक कंपनीला रु. ३५९३/- कोटींचा नफा I HCL Technologies profit of Rs. 3593/- Crore I
एच सी एल टेक कंपनीला रु. ३५९३/- कोटींचा नफा
HCL टेक कंपनीला निव्वळ नफ्यात २२६% ची वाढ
प्रती शेअर रु.२८/- चा अंतरिम लाभांश जाहीर
HCL टेक्नॉलॉजीसने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला मार्च अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २२६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३५९३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११०२/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात १५.०५%ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २२,५९७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १९,६४१/- कोटीं होती. प्रती शेअर रु.२८/- चा अंतरिम लाभांश कंपनीने जाहीर केला आहे. या तिमाहीत १० नवे कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळाले आहेत. डिजिटल , क्लाउड, इंजिनीअरिंग विभागात कंपनीने वार्षिक १२.७% ची वाढ केली आहे. सर्विसेस बिझनेस मध्ये कंपनीने उत्तम कामगिरी करत महसुलात या तिमाहीत ५% तर वार्षिक १७.५% ची वाढ केली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo