अर्थसंकल्प २०२१

अर्थसंकल्प २०२१

  • कापड उद्योगासाठी मेगा टेक्सटाइल इन्व्हेस्टमेंट पार्क्स उभारणार. आवश्यक सर्व सुविधांसह येत्या तीन वर्षात सात टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करणार
  • आयकरात बदल नाही
  • जल जीवन मिशन योजनेसाठी दोन लाख ८७ हजार कोटींची तरतूद
  • आरोग्य सुविधांसाठीची तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी १३७ टक्क्यांनी वाढवली
  • भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयासाठी १.१८ लाख कोटी रुपयांची तरतूद
  • केंद्र सरकार २० हजार रुपयांच्या भांडवलासह वित्तीय विकास संस्थेची स्थापना करणार
  • पश्चिम बंगालमधील महामार्गांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद
  • २०२१ या वर्षात भांडवली खर्चात ३४.५ टक्क्यांची वाढ
  • दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरात गॅस पाइपलाइनचा विस्तार करणार
  • आरोग्य क्षेत्राला संजीवनी ; प्रत्येक जिल्ह्यात होणार अत्याधुनिक लॅब
  • मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद
  • रेल्वेला पायाभूत सुविधांसाठी १.१० लाख कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीची तरतूद
  • नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५९७६ कोटी, नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटींची तरतूद
  • कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक लाख ७८ हजार कोटींचा निधी
  • जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ जाहीर. २० वर्षांनी खासगी वाहनांसाठी तर व्यवसायिक वाहनांची १५ वर्षांनी फिटनेस टेस्ट.
  • विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून वाढवून ७४ टक्के
  • ५ वर्षात सागर मिशन अंतर्गत अभूतपूर्व संशोधनाचं लक्ष्य
  • लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ उभारणीची घोषणा
  • सरकारी बँका सक्षम करण्यासाठी २० हजार कोटी रुपयांच्या भांडवलाची तरतूद
  • एल आय सीचा आयपीओ बाजारात येणार
  • ग्रामीण पायाभूत सुविधांसाठीचा निधी ३० हजार कोटींवर ४० हजार कोटींवर
  • उज्ज्वला योजनेत आणखी एक कोटी लाभधारकांचा समावेश होणार
  • राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत १५ हजार शाळांमध्ये गुणात्मक सुधारणार होणार
  • किमान वेतन कायदा सर्व क्षेत्रांमध्ये लागू करण्यात येणार
  • डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी १५०० कोटी रुपये
  • १०० नव्या सैनिक स्कूलची घोषणा
Union Budget 2021
Union Budget 2021
  • २०२०-२१ या वर्षातील वित्तीय तूट जीडीपीच्या ९.५ टक्के, बाजारातून ८० हजार कोटी रुपये उभारणार
  • गोवामुक्तीला ६० वर्षपूर्तीनिमित्त ३०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार
  • आत्मनिर्भर स्वास्थ योजनेंतर्गत चार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची स्थापना करण्यात येणार
  • डिजिटल व्यवहारास चालना देण्यासाठी केंद्र सरकराने १५०० कोटींची तरतूद
  • ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही
  • टॅक्स ऑडिट मर्यादा आता ५ कोटींवरुन १० कोटींवर
  • परवडणाऱ्या घरांना ३१ मार्च २२ पर्यंत कर सवलत
  • असंघटित मजुरांसाठी ऑनलाइन पोर्टल तयार करणार
  • ज्या मोबाइलच्या सुट्ट्या भागांना ० टक्के कस्टम ड्युटी होती ती आता २.५ टक्के
  • भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली डिजिटल जणगणना करण्यात येणार
  • गुंतवणूक वाढवण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय
  • २०२० मध्ये रेकॉर्डब्रेक ६ कोटी ४८ लाख लोकांनी आयकर रिटर्न भरल्याची माहिती
  • एन आर आय नागरिकांना दुहेरी कर प्रणालीतून दिलासा देण्याचा निर्णय
  • २ मोबाईल हॉस्पिटलची घोषणा
  • आदिवासी भागात ७५० ‘एकलव्य’ शाळा उभारणार
  • पहिल्यांदाच पेपरलेस बजेट सादर

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा !

वर्ष २०२० यशोगाथा – डॉ अमित बागवे I Success Stories of Year 2020 Dr Amit Bagwe I

अर्थसंकेत युट्युब चॅनेलवर १० लाख Views पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *