विप्रोला रु. ३०८७/- कोटी नफा I Wipro profit of Rs. 3087/- Crore I
विप्रोला रु. ३०८७/- कोटी नफा
विप्रोला चौथ्या तिमाहीत नफ्यात ४% ची वाढ
IT क्षेत्रातील विप्रो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ३.८७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३०८७.३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २९७२.३/- कोटीचा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात २८.४०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २०,८६०/- कोटी आहे .मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १६,२४५.४/- कोटी होती. डॉलर च्या तुलनेत आयटी सर्विसेस विभागातून महसूल $२७२१.७ मिलियन होता. जून २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला हा महसूल $२७४८ मिलियन ते $ २८०३ मिलियन असेल अशी अपेक्षा आहे. सलग सहाव्या तिमाहीत कंपनीने महसुलात सरासरी ३% ची वाढ केली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo