माइंडट्रीला रु. ४७३/- कोटी नफा I Mindtree profit Rs. 473/- Crore I
माइंडट्रीला रु. ४७३/- कोटी नफा
प्रती शेअर रु. २७/- चा अंतरिम लाभांश जाहीर
माइंडट्री ला चौथ्या तिमाहीत नफ्यात ४९% ची वाढ
आयटी सर्विसेस फर्म माइंडट्री ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ४९.१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४७३.१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३१७.३/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात ३७.४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २८९७.४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २१०९.३/- कोटी होती. मार्च अखेर आर्थिक वर्षात कंपनीने प्रती शेअर रु. २७/- चा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीचे २७६ क्लायंट असून $२० मिलियन श्रेणीत कंपनीचे १४ क्लायंट असून $५ मिलियन श्रेणीत ५६ क्लायंट आहेत. मार्च २०२२ अखेर कंपनीकडे ३५,०७१ कर्मचारी आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo