महिंद्रा लॉजिस्टिक्सने वार्षिक १५ % वाढ नोंदवून उत्पन्नातील आजवरची सर्वाधिक वाढ साध्य केली, करोत्तर नफ्यामध्ये वार्षिक १८ % वाढ
मुंबई, जानेवारी 29, 2021: महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) या भारतातील सर्वात मोठ्या 3PL सोल्यूशन्स देणाऱ्या कंपनीने डिसेंबर 31, 2020 पर्यंतच्या तिमाहीतील व नऊ महिन्यांतील कन्सॉलिडेटेड आर्थिक निकाल आज जाहीर केले आहेत.
आर्थिक वर्ष 21 मधील तिसऱ्या तिमाहीतील कामगिरीची आर्थिक वर्ष 20 मधील तिसऱ्या तिमाहीतील कामगिरीशी तुलना
• गेल्या वर्षातील 908 कोटी रुपयांच्या तुलनेत उत्पन्न 1,047 कोटी रुपये
• गेल्या वर्षातील 44 कोटी रुपयांच्या तुलनेत एबिटा 55 कोटी रुपये
• गेल्या वर्षातील 21 कोटी रुपयांच्या तुलनेत करपूर्व नफा 25 कोटी रुपये
• गेल्या वर्षातील 16 कोटी रुपयांच्या तुलनेत करोत्तर नफा 18 कोटी रुपये
• गेल्या वर्षातील 2.17 रुपयांच्या तुलनेत ईपीएस (डायल्युटेड) 2.53 रुपये
आर्थिक वर्ष 21 मधील 9 महिन्यांतील कामगिरीची आर्थिक वर्ष 20 मधील 9 महिन्यांतील कामगिरीशी तुलना
• गेल्या वर्षातील 2,659 कोटी रुपयांच्या तुलनेत उत्पन्न 2,290 कोटी रुपये
• गेल्या वर्षातील 131 कोटी रुपयांच्या तुलनेत एबिटा 101 कोटी रुपये
• गेल्या वर्षातील 68 कोटी रुपयांच्या तुलनेत करपूर्व नफा 23 कोटी रुपये
• गेल्या वर्षातील 45 कोटी रुपयांच्या तुलनेत करोत्तर नफा 16 कोटी रुपये
• गेल्या वर्षातील 6.32 रुपयांच्या तुलनेत ईपीएस (डायल्युटेड) 2.42 रुपये
ठळक वैशिष्ट्ये
• ई-कॉमर्स, कन्झ्युमर, फ्रेट फॉरवर्डिंग यातील वाढती मागणी व ऑटोमोटिव्हमध्ये सुधारणा यामुळे सप्लाय चेन श्रेणीमध्ये तिमाहीत वार्षिक 24% वाढ.
• कोविड-19 मुळे एंटरप्राइज मोबिलिटी श्रेणीतील व्हॉल्युममध्ये सातत्याने घट दिसून आली तरी तिमाहीतील आजवरचे सर्वाधिक उत्पन्न नोंदवले.
• सप्लाय चेनमध्ये ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सेवा देण्यावर सातत्याने भर दिल्याने गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत वेअरहौसिंग सर्व्हिसेस अँड सोल्यूशन्समध्ये 24% वाढ.
• “इडेल” सुरू: सर्वदूर इलेक्ट्रिक डिलेव्हरी सेवा. मागणी प्रचंड असल्याचे कंपनीचे निरीक्षण, त्यामुळे आणखी ताफा वापरण्याची संधी.
• सर्व कार्यामध्ये कॉस्ट व कॅशफ्लो यावर कठोर नियंत्रण ठेवल्याने परताव्यावर भर कायम.
• सीआयआय स्केल अवॉर्ड 2020 मध्ये “ओव्हरऑल एक्सलन्स इन लॉजिस्टिक्स” गोल्ड अवॉर्डने सन्मान.
कामगिरीविषयी बोलताना, महिंद्रा लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रामप्रवीण स्वामीनाथन यांनी सांगितले,
“बाजारातील सुधारत असलेली परिस्थिती आणि आमच्या ग्राहकांना कस्टमाइज्ड, एकात्मिक सेवा देण्याच्या आमच्या धोरणाची अंमलबजावणी यामुळे आमच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली आहे. आर्थिक वर्ष 20-21 मधील तिसऱ्या तिमाहीत, आम्ही आजवरचे सर्वाधिक तिमाही उत्पन्न मिळवले. त्यामध्ये ई-कॉमर्स, ऑटोमोबाइल व फ्रेट फॉरवर्डिंग व्यवसायांचे लक्षणीय योगदान होते. कोविड-19चा परिणाम झाल्यामुळे एंटरप्राइज मोबाइल श्रेणीमध्ये सातत्याने मंदी असली तरी सप्लाय चेन श्रेणीच्या प्रगतीने ती भरून काढली आहे. आम्ही सेवांमध्ये सातत्याने विस्तार व वाढ करत आहोत. तिमाहीदरम्यान, आम्ही ‘इडेल’ ही सर्वदूर डिलेव्हरी सेवा देणारी सेवा सुरू केली. ही सेवा 100% इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करते. ही सेवा 6 शहरांमध्ये सुरू करण्यात आली असून, येत्या 12 महिन्यांमध्ये ती 14 शहरांमध्ये विस्तारली जाणार आहे.
व्यवसायांपुढची परिस्थिती सुधारते आहे आणि त्यामध्ये बदलही होत आहेत. आर्थिक क्षेत्र लवकरात लवकर सावरेल आणि सक्षम होईल, अशी अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने सर्व ठिकाणी मागणीमध्ये वाढ झाली की प्रगती करण्यासाठी अनेक संधी निर्माण होतील.”
महिंद्रा लॉजिस्टिक्सविषयी
महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड (एमएलएल) ही सप्लाय चेन मॅनेजमेंट व एंटरप्राइज मोबिलिटी (पीपल ट्रान्सपोर्ट सोल्यूशन) यामध्ये हातखंडा असलेली एकात्मिक थर्ड-पार्टी लॉजिस्टिक्स (3पीएल) सेवा देणारी कंपनी आहे. दशकभरापूर्वी स्थापना झालेली एमएलएल ऑटोमोबाइल, इंजिनीअरिंग, कन्झ्युमर गुड्स व ई-कॉमर्स अशा विविध क्षेत्रांतील 400 हून अधिक कॉर्पोरेट ग्राहकांना सेवा देते. कंपनी “अॅसेट-लाइट” बिझनेस मॉडेल अवलंबते व संपूर्ण सप्लाय चेन मॅनेजमेंट व पीपल ट्रान्सपोर्ट सोल्यूशनसंबंधी कस्टमाइज्ड व तंत्रज्ञानावर आधारित सेवा देते. एमएलएल ही महिंद्रा समूहाच्या मोबिलिटी सर्व्हिसेस सेक्टरचा भाग आहे.
अधिक माहितीसाठी पाहा www.mahindralogistics.com
महिंद्रा मोबिलिटी सर्व्हिसेस सेक्टर
महिंद्राच्या मोबिलिटी सर्व्हिसेस सेक्टरमध्ये (एमएसएस) विविध व्यवसायांचा समावेश असून त्याद्वारे भारतात सर्वत्र व्यक्ती व माल यांच्या कार्यक्षम वाहतुकीसाठी नावीन्यपूर्ण, तंत्रज्ञान-आधारित सेवा दिली जाते. याबरोबरच, फयुचर ऑफ मोबिलिटी या उद्दिष्टाची सह-निर्मिती करण्याच्या उद्देशाने, महिंद्रा समूह तंत्रज्ञान-प्रणित मोबिलिटी कंपन्यांमध्ये जी गुंतवणूक करते त्यासाठी इन्क्युबेशन सुविधा व प्रगतीला चालना दिली जाते.
या क्षेत्रामध्ये महिंद्रा लॉजिस्टिक्स या सप्लाय चेन मॅनेजमेंट व एंटरप्राइज मोबिलिटी यामध्ये हातखंडा असणाऱ्या भारतातील एका सर्वात मोठ्या 3PL सेवा देणाऱ्या कंपनीचा समावेश आहे. तसेच, महिंद्रा फर्स्ट चॉइस व्हील्स, कारअँडबाइक आणि भारतातील एक सर्वात मोठी मल्टि-ब्रँड कार वर्कशॉपमधील साखळी असलेली महिंद्रा फर्स्ट चॉइस सर्व्हिसेस या भारतातील आघाडीच्या प्री-ओन्ड, संघटित कार व्यवसायातील कंपन्यांचा समावेश आहे.
एमएसएस अन्य व्यवसायांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या वाहतूक सेवांची प्रवर्तक आहे. जसे, मेरू हा उत्तमरित्या संघटित असलेला शेअर्ड मोबिलिटी ब्रँड, पोर्टर हे ऑनलाइन गुड्स ट्रान्सपोर्ट मार्केटप्लेस, झूमकार ही भारतातील आघाडीची सेल्फ-ड्राइव्ह कार रेंटल कंपनी आणि ग्लिड हे ऑल-इलेक्ट्रिक कॉर्पोरेट मोबिलिटी प्लॅटफॉर्म.
महिंद्राविषयी
20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, वाहतूक सुविधांमध्ये नावीन्य आले पाहिजे, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 200,000 कर्मचारी आहेत.
महिंद्राविषयी अधिक माहितीसाठी पाहा www.mahindra.com / ट्विटर व फेसबुक: @MahindraRise
अर्थ बजेटचा – सर्वसामान्यांसाठी काय ? – सी ए अनिकेत कुलकर्णी I Union Budget 2021
अर्थसंकेत युट्युब चॅनेलवर १० लाख Views पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार !!!