मसाला किंग डॉ.धनंजय दातार यांना ‘फोर्ब्ज मिडल इस्ट’ यादीत २५ वे मानांकन !
मसाला किंग डॉ.धनंजय दातार यांना ‘फोर्ब्ज मिडल इस्ट’ यादीत २५ वे मानांकन !
मराठी उद्योजकांचा जगभरात डंका
‘अल अदील ट्रेडिंग’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना ‘फोर्ब्ज मिडल इस्ट’ मासिकातर्फे नुकतेच ‘टॉप इंडियन लीडर्स इन द मिडल इस्ट २०२१’ या ताज्या यादीत २५ वे मानांकन जाहीर झाले आहे.
रीटेल क्षेत्रातील कटिबद्धतेद्वारे पश्चिम आशिया क्षेत्रातील प्रगतीत योगदान दिल्याबद्दल हा गौरव आहे.
पश्चिम आशियातील आघाडीच्या १०० भारतीय व्यावसायिक नामवंतांच्या या प्रतिष्ठित यादीत डॉ. दातार २७व्या स्थानावर होते.
कोरोनाच्या साथीदरम्यान जून २०२० मध्ये दुबईत अडकून पडलेल्या व मायदेशी परत जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना डॉ. दातार यांनी स्वखर्चाने विमानाची तिकीटे काढून दिली. या मोहिमेचा गौरवपूर्ण उल्लेख ‘फोर्ब्ज मिडल इस्ट’कडून करण्यात आला आहे.
डॉ. धनंजय दातार म्हणाले, लॉकडाऊन काळात आम्ही ५००० हून अधिक भारतीयांना मायदेशी पोहोचवले. तसेच असहाय्य स्थितीत अनवधानाने स्थानिक कायद्याचे पालन न झाल्याने तुरुंगवासात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका करण्यासाठी आम्ही स्वयंस्फूर्तीने पाठपुरावा केला आणि त्याला यश आले.
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा !
सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या सूचीतला मराठी ब्रँड – डॉ धनंजय दातार / Masalaking Dr. Dhananjay Datar
अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ ! संपर्क – 8082349822