टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत १० दिवस वाढवली
टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत १० दिवस वाढवली
केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत १० दिवस वाढवली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत १० जानेवारी २०२१ पर्यंत टॅक्स रिटर्न सादर करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. तसेच जी एस टीचा वार्षिक रिटर्न भरण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दरवर्षी ३१ जुलैपर्यंत आयकर विवरण सादर करण्याची मुदत असते. मात्र यंदा करोना संकट आणि त्यात लागू केलेली कठोर टाळेबंदी यामुळे अर्थ मंत्रालयाकडून दोन वेळा मुदत वाढवण्यात आली होती.
अंतिम मुदतीपर्यंत विवारण सादर केले नाही तर १ जानेवारी २०२१ किंवा त्यांनतर टॅक्स फाईल करणाऱ्याना विलंब शुल्क भरावे लागणार आहे.