आय सी आय सी आय सिक्युरिटीजला रु. ३४०/- कोटी नफा I ICICI Securities profit of Rs. 340/- Crore I
आय सी आय सी आय सिक्युरिटीजला रु. ३४०/- कोटी नफा
आय सी आय सी आय सिक्युरिटीजला चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ३% ची वाढ
आय सी आय सी आय सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३४०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ३२९.४७/- कोटी चा निव्वळ नफा झाला होता. महसुलात २१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८९२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७३९.३४/- कोटी होती. कंपनीचे एकूण ७६ लाख क्लायंट असून या तिमाहीत ६.२ लाख क्लायंट मिळाले आहेत. नवीन तंत्रज्ञान व विविध कौशल्य असलेला कर्मचारी वर्ग याकरिता गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीने सांगितले. २०२२ आर्थिक वर्षात कंपनीला रु. १३८३/- कोटी चा निव्वळ नफा झाला असून त्यात २९% ची वाढ झाली आहे. महसुलात ३३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३४३८/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo