सहकारी बँकांना लाभांश वाटपास मनाई I
सहकारी बँकांना लाभांश वाटपास मनाई I
सहकारी बँकांनी लाभांश वाटप न करता ताळेबंद सक्षम करावा, असे निर्देश रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी पतधोरण जाहीर करताना दिले. या निर्देशांमधून सहकारी बँकांना वगळण्याचा आग्रही विनंती सहकारी बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिखर संघटनेनेकडून केली जाणार आहे.
सभासद हे सहकारी बँकांचे मालक असतात. संस्थेच्या नफ्यातील हिस्सा मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे, तो हिरावून घेता येणार नाही. सभासदांना जर लाभांश दिला जाणार नाही तर सहकारी बँकांना भांडवल उभारणी करणे अवघड होईल. लाभांश उत्पन्न न मिळाल्याने सहकारी बँकिंग क्षेत्रांत नकारात्मक वातावरण तयार होईल आणि सभासदांवर परिणाम होईल, अशी भीती दि महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनने व्यक्त केली आहे.
देशात १५४१ नागरी सहकारी बँका आहेत. या बँकांचे १३००० कोटींचे भांडवल आहे. त्यातील अ आणि ब वर्ग गटातील ११२५ बँका आहेत. या बँकांचे भांडवल ९००० कोटींच्या आसपास आहे. त्यावर १० टक्के लाभांश धरल्यास ९०० कोटी रुपये होतात.