शेअर मार्केट म्हणजे नक्की काय ? – श्री मनोज साठे (संचालक अर्थन्यासा ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी व माजी उपाध्यक्ष NSDL) ⓒ अर्थसंकेत
शेअर मार्केट म्हणजे नक्की काय ? – श्री मनोज साठे (संचालक अर्थन्यासा ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी व माजी उपाध्यक्ष NSDL) ⓒ अर्थसंकेत
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा
अर्थसंकेत – मराठी माणसाचा खरा मित्र !
श्री मनोज साठे यांनी अर्थसंकेत मार्फत मार्गदर्शन केले.
शेअर मार्केट म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेऊयात.
भारतात उद्योग करणाऱ्या उद्योगधंद्यांना जेव्हा भांडवलाची गरज भासते, तेव्हा ते गुंतवणूकदारां समोर एक प्रपोजल आणतात . आपण त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास त्या बदल्यात त्या व्यवसायाचे शेअर आपण मिळवू शकतो व तुम्ही त्या कंपनीचे शेअर होल्डर म्हणून ओळखले जाता.
जेव्हा कंपनी शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदा आपले शेअर वितरीत करते ,तेव्हा प्रायमरी मार्केट मध्ये त्यांना IPO म्हटले जाते.
भारतीय शेअर बाजाराचा नियमक SEBI आहे. त्या मार्फत IPO वितरणा पूर्वी त्या कंपनीचे माहितीपत्रक लोकांना दिले जाते.त्यात
कंपनी बोर्डाची माहिती, पूर्वइतिहास , प्रॉडक्ट, धोरणे, प्रॉफिट-लॉस त्यात नमूद केला जातो. याचा अभ्यास करून तुम्ही ठरवू शकता की ही कंपनी पैसे गुंतवण्यास योग्य आहे की नाही.
एकदा लिस्टिंग झाल्यानंतर त्या कंपनीच्या परफॉर्मन्स वर त्या शेअर ची किंमत कमी जास्त होत असते. कंपन्यांचे IPO वितरित झाल्यानंतर सेकंडरी मार्केट BSE व NSE या मोठ्या स्टॉक एक्सचेंज वर या कंपन्यांचे शेअर खरेदी विक्री साठी उपलब्ध असतात. हे दोन मोठे शेअर बाजार असून सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते चार या वेळात तुम्ही शेअरची खरेदी विक्री करू शकता.
शनिवारी-रविवारी व इतर सुट्ट्यांचा अपवाद वगळता आज लॉक डाऊन मध्ये देखील शेअर बाजार सुरू आहे .भारतातील व जगातील वेगवेगळे शेअर बाजार कधी बंद झालेले नाहीत. या शेअरचे भाव नेहमी कमी जास्त का होतात यासाठी अर्थशास्त्राचा डिमांड सप्लाय चा नियम लागू पडतो .तसेच इतर अनेक कारणे असू शकतात. जसे कंपनीचे कामकाज , बातम्या किंवा देशातील सोशल ,फायनान्स, पॉलिटिकल घटनांचा परिणाम शेअर बाजारावर होत असतो .
आपण पाहिले तर मार्चच्या सुरुवातीला निर्देशांक ३८ ते ४० हजाराच्या दरम्यान होता. त्यानंतर लॉकडाउन झाले व बऱ्याच जणांनी विचार केला की आता अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असून त्यामुळे त्यांनी शेअर विकायला सुरुवात केली व जेव्हा शेअर विक्री करणारे लोक खरेदी करणाऱ्यांपेक्षा जास्त असतात तेव्हा निर्देशांक खाली येतो.
आज सेन्सेक्स ४८००० च्या वर आहे, म्हणजेच खाली आलेल्या बाजारात ज्यांनी गुंतवणूक केली होती त्यांनी जवळपास ५०% पेक्षा जास्त उत्पन्न मिळविले आहे.
अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ !
“Arthsanket Open Networking & Business Growth Challenge”
Gifts and Benefits worth Rs. 15,000/- Per Business
For Details send on WhatsApp your Name, Business Name, Business Details, Location
Contact 8082349822
T & C Apply