शेअर बाजारात तेजी ….. सेन्सेक्स आणि निफ्टी सर्वोच्च स्तरावर !
शेअर बाजारात तेजी ….. सेन्सेक्स आणि निफ्टी सर्वोच्च स्तरावर !
केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी दुसऱ्या तिमाहीत आत्मनिर्भर भारत या महत्वकांक्षी योजनेत २० लाख कोटींची घोषणा केली आणि परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात तब्बल ६८ हजार ५५८ कोटींची गुंतवणूक केली आहे. परदेशी गुंतवणुकीच्या जोरावर सेन्सेक्स आणि निफ्टीने सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला आहे.
निफ्टी – १४१३२.९०
सेन्सेक्स – ४८१७९.८०
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या माहितीनुसार परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची आतापर्यंतची इक्विटीमधील सर्वाधिक गुंतवणूक आहे. डिसेंबरमध्ये ६२०१६ कोटी रुपये शेअरमध्ये गुंतवण्यात आले आहेत.
ऑक्टोबर महिन्यात २२०३३ कोटी आणि नोव्हेंबर महिन्यात ६२९५१ कोटींची गुंतवणूक परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून करण्यात आली आहे.
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे ! मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र