यशस्वी उद्योजक व्हायचंय – डॉ. संतोष कामेरकर ⓒ अर्थसंकेत
यशस्वी उद्योजक व्हायचंय – डॉ. संतोष कामेरकर ⓒ अर्थसंकेत
बिझनेस कोच डॉ. संतोष कामेरकर यांनी अर्थसंकेत मार्फत मार्गदर्शन केले.
श्रीमंत या शब्दात एक जादू आहे. मी माझ्या लाखो विद्यार्थ्यांना हा श्रीमंतीचा कानमंत्र दिला आहे. यामध्ये आपण एक ऍक्टिव्हिटी करू. लॉक डाउन चा कालावधी संपल्यानंतर किती लोक २० किलोमीटर धावू शकतात. त्यांना मी माझ्या एसके रिसॉर्ट वर १ पॅकेज मोफत देणार आहे.
यामध्ये अशक्य असे काही नाही. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही या जगात काहीही करूशकता. आजच्या परिस्थितीत सगळीकडे भीती निर्माण झाली आहे. यामुळे सर्वजण घाबरून गेले आहेत. असे म्हटले जाते कि, थॉट ऑफ फेल्युअर इज अ सीड ऑफ फेल्युअर. थॉट ऑफ सक्सेस इज अ सीड ऑफ सक्सेस. आपल्या मनात काही विचार येत असतात. एखादी गोष्ट मी करू शकतो.किंवा एखादी गोष्ट मी नाही करू शकतो. हे दोन्ही विचार योग्यच आहेत.
आज जगात अनेक अशक्य गोष्टी घडल्या आहेत त्याचे कारण हे लोकांनी स्वतःवर ठेवलेला विश्वास हे आहे. मी स्वतः गरीब कुटूंबातून आलेलो आहे. पण आज मी करोडपती आहे. अनेक व्यवसाय मी करीत गेलो. कारण मला माहित होते कि मी पैसे कमवू शकतो. श्रीमंती हि एक कला आहे . ती शिका. कर्ज काढलात तर त्यातून पैसे मिळवू शकतो का, धंदा वाढत आहे का हे पहा.
आज आम्ही देखील आमच्या बँकेमार्फत कर्ज वितरण करताना लोकांना विचारतो कि, हे कर्ज तुम्ही कश्यासाठी घेत आहेत. एखाद्यानं ३० हजार हफ्ता घेऊन गाडी खरेदी केली तर त्यातून धंदा कसा होईल याचा विचार करा. मी देखील रिसॉर्ट बांधले तेव्हा कर्ज घेतले होते. ३० हजाराचा हफ्ता होता तर माझे उत्पन्न त्यावेळी २ लाख होते. नेहमी कर्ज काढताना धंद्याचा विचार करा.
हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशन डॉ अमित बागवे विश्वविक्रम
अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ !
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा !