आयुर्वेदाला सन्मान मिळवून देणारा डॉक्टर – डॉ अक्षय भोईर
आयुर्वेदाला सन्मान मिळवून देणारा डॉक्टर – डॉ अक्षय भोईर
डॉ अक्षय भोईर हे स्वतः आयुर्वेद आणि योग या विषयात MD असून गेले १२ वर्षे “ब्रह्मांड आयुर्वेद” या नावाने आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत.
जीवनशैलीचे आजार (lifestyle disorder) यामध्ये यांचे विशेष नैपुण्य असून त्यांनी मायग्रेन (migraine) या प्रकारातील डोकेदुखीवर रिसर्च केलेला आहे, ज्यामध्ये गायीच्या तुपाने आणि गायीच्या दुधाने विशेष लाभ मिळतो हे सिद्ध झालेले आहे.
जीवनशैलीच्या आजारांमध्ये लिव्हर, किडनी, हर्मोनल असमतोल, हृदयरोग, मानस व्याधी पोटाचे आजार व हाडांचे आजार यावर कित्येक रुग्णांना लाभ दिलेला आहे. त्याचे चिकित्सा करतेवेळी आलेल्या अनुभवांनी युक्त स्वलिखीत “मी ब्रह्मांड आयुर्वेद बोलतोय…!!” हे पुस्तक विशेष गाजले. या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झालेल्या असून यास प्रस्तावना महाराष्ट्र भूषण कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी दिलेली आहे.
आयुर्वेद क्षेत्रात काम करतांना आयुर्वेदातील निकष आजच्या आधुनिक संशोधनानुसार (scientific research) मांडून त्यास रुग्णांवर उपचार करणे, यामध्ये यांचा हातखंडा आहे. गेल्या बारा वर्षांमध्ये कित्येक रुग्णांनी याचा लाभ घेतलेला असून एकाच शास्त्रावर अवलंबून न राहता डॉ अक्षय यांनी योग, ज्योतिष, वास्तू व कर्म यांचा शास्त्रोक्त वापर त्यांनी वेळोवेळी रुग्णांवर करून आपली प्राचीन भारतीय शास्त्रे आजच्या आधुनिक कसोटीवर (scientific aspect) सिद्ध कशी आहेत , हे वेळोवेळी जगासमोर मांडले.
इथवर न थांबता आपल्या नंतर देखील आयुर्वेद अविरत सुरू राहावा यासाठी त्यांनी कित्येक आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना तयार केले, जे आयुर्वेद क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.
पुढील वाटचालीसाठी त्यांनी स्वतःची आयुर्वेद डॉक्टरांची टीम तयार करून महाराष्ट्र तसेच भारतात ठिकठिकाणी ब्रह्मांड आयुर्वेदाची शाखा उघडून रुग्णांना लाभांवित करण्याचा त्यांचा मानस आहे.
डॉ अक्षय भोईर संपर्क – 9970155015
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा !
अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ ! 8082349822