आनंद राठी वेल्थला चौथ्या तिमाहीत नफ्यात वाढ I Anand Rathi Wealth profit rises I
आनंद राठी वेल्थला चौथ्या तिमाहीत नफ्यात वाढ
आनंद राठी वेल्थ कंपनी ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात तिपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. ३५/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १०/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. महसुलात ४९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ११५/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७७/- करोड होती. २०२१-२२ आर्थिक वर्षात कंपनीला रु.१२७/- करोड चा निव्वळ नफा व रु.४२६/- करोड चा महसूल मिळाला आहे. मागील वर्षीचे तुलनेत एकूण मालमत्ता व्यवस्थापन २३% ने वाढले असून रु. ३२,९०६/- करोड आहे. मार्जिन मध्ये कंपनीला वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात महसुलात ५२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४२६/- करोड आहे. निव्वळ नफा १८४% ने वाढला असून रु.१२७/- करोड आहे. २०२१ डिसेंबर कंपनीचे एक्सचेंज वर लिस्टिंग झाले होते. हि कंपनी म्युच्युअल डिस्ट्रिब्युशन मध्ये काम करीत असून सर्व प्रकारचे फायनान्शिअल प्रॉडक्ट विक्री करते.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo