युपीएल आणि क्लीनमॅक्सची भागीदारी गुजरातेत नूतनीकरणीय ऊर्जेचा नवा प्रकल्प विकसित करणार I
युपीएल आणि क्लीनमॅक्सची भागीदारी गुजरातेत नूतनीकरणीय ऊर्जेचा नवा प्रकल्प विकसित करणार
युपीएल आणि क्लीनमॅक्स एन्व्हायरो एनर्जी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड गुजरात राज्यात ६१.०५ मेगावॅट क्षमतेचा पवन सौर हायब्रीड ऊर्जा प्रकल्प उभारणार.
युपीएलला संपूर्ण जगभरातील आपल्या कामकाजात जेवढी वीज लागते त्यापैकी ३०% गरज नूतनीकरणीय ऊर्जेने पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.
या कॅप्टिव्ह प्रकल्पामुळे दरवर्षी १.२५ लाख टन कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन रोखले जाईल.
मुंबई, १६ सप्टेंबर २०२२: पर्यावरणपूरक कृषी उत्पादने, सेवासुविधा पुरवणारी जागतिक पातळीवरील कंपनी युपीएल लिमिटेडने (एनएसई: UPL, बीएसई: 512070, एलएसई: UPLL) (‘युपीएल’) मुंबईमध्ये स्थित नूतनीकरणीय ऊर्जा कंपनी क्लीनमॅक्स एन्व्हायरो एनर्जी सोल्युशन्ससोबत (‘क्लीनमॅक्स’) भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. गुजरात राज्यामध्ये सौर पवन हायब्रीड ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी ही भागीदारी करण्यात आली आहे.
युपीएल आणि क्लीनमॅक्स यांची ही भागीदारी २८.०५ मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता आणि ३३ मेगावॅट पवन ऊर्जा क्षमता असा हायब्रीड कॅप्टिव्ह ऊर्जा प्रकल्प उभारून त्याचे संचालन करणार आहे. सर्वाधिक वेगाने वाढत असलेल्या नूतनीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञानांपैकी दोघांचा मिलाप घडून आल्याने या प्रकल्पामुळे युपीएलला आपल्या एकूण जागतिक ऊर्जा वापराची ३०% गरज नूतनीकरणीय ऊर्जेने पूर्ण करता येईल. सध्या युपीएलच्या एकूण ऊर्जा वापरामध्ये नूतनीकरणीय ऊर्जेचे प्रमाण ८% आहे. पवन आणि सौर ऊर्जा एकमेकांना पूरक प्रकारच्या असल्याने त्यांचे हायब्रीड ऊर्जा प्रकल्प अतिशय कार्यक्षम असतात, विश्वसनीय आणि सातत्यपूर्ण वीज पुरवठा करतात, ज्यामुळे वीज भारांचे सक्षमपणे प्रबंधन करण्यात मदत मिळते.
युपीएलचे ग्लोबल सीईओ श्री. जय श्रॉफ यांनी सांगितले, “आमच्या अंतर्गत कामकाजामध्ये तसेच आमच्या शेतकरी सहयोग्यांसमवेत पर्यावरणपूरकतेची नवकल्पना साकार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमच्याकडे विश्वसनीय, शुद्ध ऊर्जा पुरवठा उपलब्ध झाला तर हे व्हिजन पूर्ण करण्यात मदत मिळेल कारण आम्ही आमच्या कार्बन फूटप्रिंटमध्ये लक्षणीय घट करत आहोत. या भागीदारीमार्फत आमच्या ओपनएजी नेटवर्कमध्ये सहभागी होताना क्लीनमॅक्सचे स्वागत करताना आम्ही उत्सुक आहोत. भारताच्या हरित ऊर्जेच्या दिशेने सुरु असलेल्या वाटचालीत सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे.”
क्लीनमॅक्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री. कुलदीप जैन म्हणाले, “६१.०५ मेगावॅट क्षमतेचा कॅप्टिव्ह पवन सौर हायब्रीड ऊर्जा प्रकल्प गुजरातेत क्लीनमॅक्सने विकसित केलेल्या एका मोठ्या पवन सौर हायब्रीड फार्मचा एक भाग आहे. क्लीनमॅक्स पवन सौर हायब्रीड फार्मची एकूण क्षमता ४०० मेगावॅटपेक्षा जास्त आहे, यामध्ये २३० मेगावॅट पवन आणि १८० मेगावॅट सौर ऊर्जेचा समावेश आहे. यामुळे दरवर्षी ८.७५ लाख टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन रोखले जाते.”
ते पुढे म्हणाले, “युपीएलसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. युपीएलला वर्षाचे सर्व महिने आणि दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी नूतनीकरणीय ऊर्जेचा सातत्यपूर्ण आणि भरपूर पुरवठा मिळत राहावा यासाठी या हायब्रीड प्रकल्पामध्ये पवन आणि सौर ऊर्जेचा मिलाप करण्यात आला आहे.”
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi