यूपीएल एसएएस (UPL SAS) ने भारतातील सोयाबीन आणि कापसाच्या पिकांसाठी शाश्वत कीडनियंत्रण उपाय म्हणून अर्गाइल (Argyle) बाजारात आणले I
यूपीएल एसएएस (UPL SAS) ने भारतातील सोयाबीन आणि कापसाच्या पिकांसाठी शाश्वत कीडनियंत्रण उपाय म्हणून अर्गाइल (Argyle) बाजारात आणले
यूपीएल लिमिटेडचे (NSE: UPL, BSE: 512070, LSE: UPLL) (“UPL”) एक सर्वसमावेशात्मक अॅग्-टेक व्यासपीठ (AgTech platform) यूपीएल सस्टेनेबल अॅग्री सोल्युशन्स (UPL SAS) ने अर्गाइल (Argyle)हे खास कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी तयार केलेले परिणामकारक, किफायतशीर, शाश्वत व कल्पक असे कीड नाशक उपाय बाजारात आणल्याचे जाहीर केले.
अर्गाइल (Argyle) मध्ये २५% अॅसेटामिप्रिड आणि २५% बायफेन्थ्रिन हे वेटेबल ग्रॅन्युअल्स (WG) एकत्रितपणे समाविष्ट आहेत. हे असे पर्यावरणपूरक वेटेबल ग्रॅन्युअल्स फॉर्म्युलेशन (WG) आहे, जे पाण्यामध्ये वेगाने विरघळते आणि कॅनोपी कव्हरेज आणि परिणामकारकता हे दोन्ही सुयोग्य करते. अर्गाइल (Argyle) तुलनेने प्रति एकरासाठी कमी प्रमाणात वापरावे लागत असल्याने ते एक किफायतशीर असे उपाय असून ते शाश्वत शेतीला प्रोत्साहन देते. वेटेबल ग्रॅन्युअल्स फॉर्म्युलेशन (WG) मुळे हे हाताळायला सोपे जाते आणि ते वापरत असताना सांडणे, वाहून जाणे किंवा धूळ बसणे हे धोके टाळते. परिणामी या उपायामुळे हवा शुद्ध राहते आणि जमिनीचे आरोग्य देखील चांगले राहते. हे पर्यावरण आणि वापरणारे या दोघांसाठी सुरक्षित असल्याने या प्रकारच्या व या किमतीतील अन्य उपायांच्या तुलनेत वेगळे ठरते.
पर्यावरणपूरक असलेले हे अर्गाइल (Argyle) व्हाइट फ्लाय, अॅफिड्स, जॅसिड्स, सेमीलुपर आणि गर्डल बीटल्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांवर परिणामकारक रीतीने नियंत्रण ठेवते. अर्गाइल (Argyle) दुहेरी फायदा देते. ते कीटक प्रतिकार रोखण्यात मदत करते आणि कीटक व्यवस्थापन पद्धतींमध्ये दीर्घकालीन शाश्वतता सुद्धा देते. शिवाय, अजून दुसऱ्या काही उपाय योजना करण्याची आवश्यकता देखील कमी करते.
योग्य परिणामांसाठी हे उत्पादन खरीप हंगामामध्ये कापसाच्या पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी आणि सोयबिनच्या पेरणीनंतर २०-२५ दिवसांनंतर वापरावे.
यूपीएल सस्टेनेबल अॅग्री सोल्युशन्स (UPL SAS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष डोभाल म्हणाले, “नावीन्यपूर्ण आणि शाश्वत उपायांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगळे आणि सर्वोत्तम उपाय देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. अर्गाइल (Argyle) बाजारात आणून शेतकऱ्यांना असे किफायतशीर उपाय पुरविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, जे त्यांच्या कीटक नियंत्रणाच्या गरजा पूर्ण करतील, पर्यावरणपूरक व जबाबदार पद्धतींचा अवलंब करण्यास मदत करतील आणि महत्त्वाचे म्हणजे अखेरीस चांगले उत्पादन देऊन अधिक नफा कमवण्यास सुद्धा उपयुक्त असेल.”
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi