कॉमन सर्व्हिस सेंटर्स आणि शुगरबॉक्स नेटवर्क्सने ग्रामीण भौगोलिक भागांना डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी केली भागीदारी
पाटेठाण (पुणे), ७ जून २०२२: कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) हे संपूर्ण भारतातील सामाजिक, आर्थिक आणि डिजिटली सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी सरकारच्या आदेशाला सक्षम करणारे नेटवर्क आहे. ‘डिजिटल इंडिया’ मिशनमध्ये योगदान देत, सीएससी आणि शुगरबॉक्स नेटवर्क्स यांनी ग्रामीण भौगोलिक भागांना डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी भागीदारी केली आहे.
प्रत्येक वेळी जेव्हा देशात सगळ्या अनुभवांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर देण्यासंदर्भात बोलले जाते तेव्हा खरा प्रश्न ‘लास्ट-माईल’ कनेक्टिव्हिटीला याच्याशी कशा प्रकारे जोडले जाईल याचे मूल्यांकन करणे हा आहे. पायाभूत सुविधांचा अभाव, डिजिटल सेवांबद्दल अत्यल्प जागरूकता, स्थानिक भाषेतील सेवांची अनुपलब्धता किंवा व्यावसायिकदृष्ट्या (पुरवठादारांसाठी) अव्यवहार्य ही विद्यमान डिजिटल असमानतेची सामान्य कारणे म्हणून अनेकदा सांगितली जातात. या विद्यमान परिसंस्थेचा (आणि पायाभूत सुविधांचा) उपयोग करून वंचित तसेच सेवा न मिळालेल्या भौगोलिक क्षेत्रांतील नागरिकांना जोडणे ही काळाची गरज आहे.
आणि सीएससी इ-गर्व्हरनन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिनेश त्यागी यांनी हीच सुविधा निर्माण करण्याचा दृष्टीकोन ठेवला. आज दुर्गम भागात किंवा अविश्वसनीय किंवा नेटवर्क कनेक्शन नसलेल्या क्षेत्रात अंतिम वापरकर्ता पेटंट केलेल्या हायपरलोकल एज क्लाउड तंत्रज्ञान सोल्यूशनद्वारे डिजिटली कनेक्टेड भागात राहत असल्याप्रमाणे मूळ डिजिटल आशयाशी संपर्क करू शकतो. अधिक चांगल्या भविष्याच्या दिशेने टाकलेले हे पुढचे पाऊल आहे असा विश्वास डॉ.दिनेश त्यागी यांना वाटतो.
“सीएससी आणि शुगरबॉक्स नेटवर्क्सची भागीदारी ग्रामपंचायतींमध्ये शून्य डेटा खर्चावर डिजिटल माहिती मिळवण्यासाठी संपर्क सेवा सक्षम करण्यासाठी आहे. या भागीदारीचा उद्देश देशभरातील गावकऱ्यांना चित्रपट आणि व्हिडिओ मालिका यांच्याद्वारे शिक्षण, आरोग्य सेवा, मनोरंजन आणि माहितीसह सुसज्ज करणे तसेच डिजिटल पेमेंट पद्धतीला प्रत्यक्षात आणणे हा आहे. देशभरात वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांत पसरलेल्या खेडेगावातून पथदर्शी प्रकल्पांतून आम्ही हा भागीदारी उपक्रम राबविला आहे,” असे सीएससी इ-गर्व्हरनन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिनेश त्यागी यांनी सांगितले.
या भागीदारीचा हेतू शक्य तितक्या वंचित भौगोलिक क्षेत्रांमध्ये या मॉडेलची प्रतिकृती करून डिजिटल असमानता कमी करण्याचा आहे. सध्या, शुगरबॉक्सने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंडमधील ४० हून अधिक ग्रामपंचायतींसाठी डिजिटल सेवा संपर्क सुकर केला आहे.
“शुगरबॉक्स नेटवर्क्सच्या भागीदारीमुळे आमच्या समाजाला परवडणाऱ्या किमतीत डिजिटल संपर्क सेवा मिळणे शक्य झाले आहे. प्रत्येकजण आपला मोकळा वेळ घालवण्यासाठी चित्रपट आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम बघताना सीएससी केंद्रांभोवती जमा होतात. त्यामुळे समाज उभारणीची भावना वाढण्यासही मदत झाली आहे. पाटेठाण मधील ग्रामस्थांना आता शून्य डेटा खर्चावर त्यांना पाहिजे तेव्हा मनोरंजनाचा आस्वाद घेणे शक्य झाले आहे. आम्हाला आशा आहे की हा परिणाम देशातील खेड्यापाड्यातील एक वास्तव बनेल,” असे पाटेठाण गावच्या सरपंच श्रीमती ज्योती गोविंद यादव म्हणाल्या.
उच्च सार्वजनिक भाग जसे की ग्रामपंचायती, सीएससी, सरकारी शाळांमध्ये हायपरलोकल एज क्लाउड टेक्नॉलॉजी सोल्यूशनचा अवलंब होण्यासाठी शुगरबॉक्स काम करत आहे. त्यामुळे खेडेगावांसाठी ‘डिजिटलदृष्ट्या जोडलेले’ राहणे ही एक समान गरज बनू शकेल.हे सहकार्य ग्रामीण भारतामध्ये शिक्षण देण्यासाठी उचललेले एक मजबूत पाऊल आहे. त्यायोगे अधिक चांगल्या जीवनशैलीसाठी भविष्यातील क्षमतांमध्ये सुधारणा होईल.
“आज खेड्यांना समान संधींची गरज आहे – मग ती आर्थिक किंवा अगदी डिजिटल असो. हे मान्य करणे महत्त्वाचे आहे की दुर्गम भागात राहणा-या रहिवाशांनाही त्यांचे जीवनमान वाढवण्यासाठी डिजिटल विश्व सादर करत असलेले लाभ मिळणे आवश्यक आहे. सीएससी केंद्रांसोबत असलेली आमची भागीदारी शून्य डेटा शुल्कात अखंड आणि विश्वासार्ह पद्धतीने ग्रामस्थांसाठी डिजिटल आशय सादर करण्याची संधी खुली करत आहे. पाटेठाण हे आमच्या पहिल्या मॉडेल गावांपैकी एक बनले आहे जिथे आम्ही पथदर्शी प्रकल्पाचा एक भाग म्हणून आमची पेटंट तंत्रज्ञान सुविधा राबवली आहे. आम्हाला खात्री आहे की ही भविष्यातील इंटरनेटचा कणा तयार करण्याची आणि इंटरनेट लोकशाहीचा पाया रचण्याची सुरुवात आहे,” असे शुगरबॉक्स नेटवर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक रोहित परांजपे यांनी सांगितले.
डॉ.दिनेश त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भारतात शिक्षण, ग्रामीण अर्थकारण आणि डिजिटल पेमेंटस सादर करण्यासाठी हा सहयोग म्हणजे एक मजबूत पाऊल असल्याचा आम्हांला विश्वास आहे. त्यायोगे पुढील अब्ज वापरकर्त्यांपर्यंत भविष्यातील क्षमता सुधरविणे आणि पोहोच विस्तारणे या गोष्टी साध्य होतील.
About SugarBox Networks
SugarBox Networks is the world’s first Hyperlocal Edge Cloud platform that enables Users, Networks (ISPs, Internet Infra providers, etc.) and Digital Services (Apps, Websites, etc.) alike, to harness the power of Local Area Networks. With this technology at its heart, the company is reimagining connectivity for the unserved and underserved globally, to make digital access affordable, and reliable for the masses, whilst being economically viable for the existing internet ecosystem.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo