रिव्हिगो बाय महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे एक्सप्रेस हब लाँच, नेटवर्क, तंत्रज्ञान आणि प्रक्रिया क्षमता आता आणखी बळकट I
रिव्हिगो बाय महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे एक्सप्रेस हब लाँच, नेटवर्क, तंत्रज्ञान आणि प्रक्रिया क्षमता आता आणखी बळकट
मुंबई, १६ मे २०२३ – रिव्हिगो बाय महिंद्रा लॉजिस्टिक्स या भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वप्रकारच्या लॉजिस्टिक्स सेवा पुरवणाऱ्या कंपनीने भिवंडी येथे आपले पहिले एक्सप्रेस हब सुरू केले आहे. लुहारी आणि पुण्यानंतर सुरू करण्यात आलेले हे प्रक्रिया केंद्र कंपनीच्या मोठ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांना सेवा देणाऱ्या वेयरहाउसचा एक भाग आहे. या वेयरहाउसमध्ये ग्राहकांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा दिल्या जातात.
देशभरातील १७ प्रक्रिया केंद्रे आणि २०० पेक्षा जास्त शाखांच्या मदतीने एक्सप्रेस हब विविध उद्योगांना सेवा देण्यासाठी सज्ज आहे. त्यात ई- कॉमर्स, ग्राहकसेवा, इंजिनियरिंग यांचा समावेश आहे. हे कामकाज एका शाश्वत यंत्रणेद्वारे हाताळले जाणार आहे. या नव्या केंद्रांमध्ये सर्वसमावेशक वैशिष्ट्ये, उच्च दर्जा, ऑटोमेशन व सुरक्षा कार्यरत करण्यात आली आहे.
या लाँचविषयी रिव्हिगो बाय महिंद्रा लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीराम वेंकटेश्वरन म्हणाले, ‘ग्राहकांना वेगवान, सुरक्षित आणि सर्वात विश्वासार्ह एक्सप्रेस वितरण सेवा पुरवण्यासाठी आम्ही बांधील आहोत. त्यासाठी दमदार वेयरहाउस नेटवर्क महत्त्वाचे आहे. एक्सप्रेस हबच्या लाँचमुळे जास्त दूरवर, सर्वोत्तम सेवेसह वितरण सेवा देता येईल. त्याशिवाय ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना सेवा देईल. आमच्या व्यावसायिक क्षमता विकसित करण्यासाठी एक शाश्वत यंत्रणाही उभारली जाणार आहे.’
गुरगावस्थित रिव्हिगो बाय महिंद्रा लॉजिस्टिकने रिले फुल ट्रक लोड बिझनेसपासून कामकाजाची सुरुवात केली होती. इतक्या वर्षांत कंपनीने देशभरातील पीटीएल/एक्सप्रेस सेवा क्षेत्रात आपले स्वतंत्र अस्तित्व तयार केले आहे. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि सेवेमुळे हे शक्य झाले आहे. कंपनीचा ग्राहकवर्गही मोठा असून सध्या देशातील १९,००० पिनकोड्सच्या ठिकाणी सेवा दिली जाते.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे