मायक्रोसॉफ्ट, मर्सिडीज-बेंझ आणि ऍमेझॉन ठरले भारतातील सर्वात आकर्षक एम्प्लॉयर ब्रँड I

मायक्रोसॉफ्ट, मर्सिडीजबेंझ आणि अॅमेझॉन ठरले भारतातील सर्वात आकर्षक एम्प्लॉयर ब्रँड

रँडस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च (REBR)२०२२

  • मालक कंपनीची निवड करताना आकर्षक पगारापेक्षाही काम-आयुष्य यांच्यातील समतोल राखला जाण्याचा मुद्दा अधिक प्राधान्याचा.
  • नोकरी गमावण्याची भीती खरी, ५१% कर्मचारी ज्यांना आपली नोकरी गमावण्याची भीती वाटते, त्यांनी २०२२ च्या  पहिल्या सहामाहीत आपली नोकरी बदलण्याची आखली योजना
  • १० पैकी ९ भारतीय कर्मचार्‍यांना प्रशिक्षण आणि वैयक्तिक करिअरची वाढ खूप महत्त्वाची वाटते

मुंबई, २१ जुलै २०२२: मायक्रोसॉफ्ट इंडिया ही आघाडीची तंत्रज्ञान कंपनी भारतातील सर्वात आकर्षक एम्प्लॉयर (नियोक्ता) ब्रँड म्हणून उदयास आली आहे. जगातील सर्वात व्यापक, स्वतंत्र आणि सखोल एम्प्लॉयर ब्रँड संशोधन असलेल्या रँडस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च (REBR) २०२२ मधून ही बाब समोर आली आहे. मायक्रोसॉफ्ट इंडियाने सर्वेक्षणानुसार संस्थेसाठी ३ अग्रणी कर्मचारी मूल्य प्रस्ताव (EVP) म्हणजेच आर्थिक आरोग्य, मजबूत प्रतिष्ठा, नावलौकिक आणि आकर्षक पगार आणि फायदे यावर खूप उच्च गुण मिळवले. मर्सिडीज बेंझ इंडियाने यावर्षी क्रमवारीत वर चढत प्रथम उपविजेतेपद मिळविले तर त्यानंतर ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज अमेझॉन इंडियाने क्रमांक पटकावला.

रँडस्टॅड इंडियाच्या वार्षिक नियोक्ता ब्रँडिंग संशोधनाने हे उघड केले आहे की महामारीनंतरच्या कार्यजगात  सर्व क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांच्या भावनांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे.  आरईबीआर अहवाल जागतिक स्तरावर २२ पेक्षा जास्त यशस्वी वर्षांपासून नियोक्त्यांना त्यांच्या नियोक्ता ब्रँडला आकार देण्यास मदत करण्यासाठी मौल्यवान दृष्टिकोन प्रदान करत आहे आणि या वर्षीची भारतातील ही १२ वी आवृत्ती आहे. APAC (७६%) कर्मचाऱ्यांच्या सरासरीच्या तुलनेत या वर्षी ३१ सहभागी देशांसह जागतिक अर्थव्यवस्थेच्या ७०% पेक्षा जास्त आणि जगभरातील सुमारे १.६३ लाख उत्तरदात्यांचा समावेश असलेल्या या संशोधनातून स्पष्टपणे असे दिसून आले की  १० पैकी ९  भारतीय कर्मचारी (८८%) त्यांच्यासाठी प्रशिक्षण आणि वैयक्तिक करिअरची वाढ अत्यंत महत्त्वाची मानतात. तशाच प्रकारचे  प्रवाह  प्रतिबिंबित करून अहवालात असेही दिसून आले आहे की जागतिक घडामोडींचा विचार करताना २०२१ मध्ये ३ पैकी २ भारतीयांसाठी (६६%) कामाचा आणि करिअरचा अर्थ आणि हेतू अधिक महत्त्वाचा बनला आहे. उच्चशिक्षित (७०%) आणि २५-३४ वर्षांच्या (७२%) कर्मचार्‍यांप्रमाणे पुरुषांपेक्षा (७२% वि. ६२%) स्त्रियांना याबद्दल अधिक तीव्रतेने वाटते.

या व्यतिरिक्त, या वर्षी देखील, भारतीय कर्मचारी वर्ग नियोक्ता निवडताना वर्क-लाइफ बॅलन्स म्हणजेच काम आणि आयुष्य यांच्यातील समतोल (६३%) सर्वात महत्वाचा घटक मानतो. हा कल उच्च-शिक्षित (६६%) आणि ३५ वर्षे वयांहून अधिक वयाच्या कर्मचार्‍यांमध्ये (६६%) जास्त आहे. यानंतर आकर्षक पगार आणि फायदे (६०%) आणि संस्थेची चांगली प्रतिष्ठा (६०%) हे मुद्दे आहेत. सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की ६६% व्हाईट कॉलर कर्मचारी वर्क-लाइफ बॅलन्सला सर्वात महत्त्वाचा मुद्दा  मानतात, तर ५४% ब्लू कॉलर कामगार नियोक्त्यासाठी प्रतिष्ठा आणि आर्थिक आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे घटक मानतात. तेव्हा काम आणि आयुष्य यांच्यातील संतुलन आणि अगदी पगार आणि फायदे देखील मागे राहते.

Randstad
Randstad

रिमोट वर्किंगमधील (दूरच्या ठिकाणावरून काम)प्रवाह:

विशेष म्हणजे, भारतात दूरच्या ठिकाणावरून काम करण्याचे प्रमाण २०२१ मधील ८४% वरून २०२२  मध्ये ७३% इतके कमी झाले आहे. सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की दूरच्या ठिकाणावरून काम करण्याचा कल पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे (७६% विरुद्ध ६९%). संपूर्ण APAC प्रदेशातील सरासरीच्या तुलनेत (४२%) भारतात लक्षणीयरीत्या जास्त दूरच्या ठिकाणावरून काम करणारे कर्मचारी आहेत. याव्यतिरिक्त, सध्याच्या दूरच्या ठिकाणावरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी बहुसंख्य (९८%) जणांना असे वाटते की सध्या ते करत असलेल्या प्रमाणात नाही तरी भविष्यात ते अशा प्रकारे काम करत राहतील.

नोकरी बदलण्याचे वर्तन आणि नोकरी गमावण्याची भीती:

भारतातील २४% कर्मचाऱ्यांनी २०२१ च्या शेवटच्या सहामाहीत त्यांची मालक कंपनी बदलली. याशिवाय, २०२२ च्या पहिल्या ६ महिन्यांत ३ पैकी १ कर्मचाऱ्याचा (३७%) त्यांचा नियोक्ता बदलण्याचा मानस आहे. ५१% कर्मचारी ज्यांना त्यांची नोकरी गमावण्याची भीती आहे, त्यांनी २०२२ च्या पहिल्या सहामाहीत त्यांची नोकरी बदलण्याची योजना आखली आहे.

२०२२ साठी भारतातील आघाडीचे १० सर्वात आकर्षक एम्प्लॉयर ब्रँडस:

1. मायक्रोसॉफ्ट

2. मर्सिडीज-बेंझ

3.अॅमेझॉन

4. हेवलेट पॅकार्ड

5. इन्फोसिस

6. विप्रो

7. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

8. टाटा स्टील

9. टाटा पॉवर कंपनी

10. सॅमसंग

आरईबीआर २०२२ सर्वेक्षण निष्कर्ष सादर करताना रँडस्टॅड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथ पी. एस. म्हणाले, “नियोक्ता ब्रँडिंगची संकल्पना गेल्या काही वर्षांत आमूलाग्रपणे विकसित झाली आहे. आता केवळ ब्रँड ओळख निर्माण करणे पुरेसे नाही; त्याला आता अधिक अर्थपूर्ण जोडणी तयार करावी लागते. आकर्षक ब्रँड वचन आणि उद्देशाने पाठबळ दिले पाहिजे, जे नंतर कर्मचार्‍यांना आणि संभाव्य कर्मचाऱ्याना अखंडपणे जोडते. संस्थांना आता हे समजले आहे की, पसंतीचा नियोक्ता बनण्यासाठी आणि अग्रणी नियोक्ता ब्रँड होण्यासाठी सुसंगत सहभाग आणि अनुभव आवश्यक आहे.

या वर्षीच्या रँडस्टॅडच्या नियोक्ता ब्रँड संशोधन अहवालातून हीच समान भावना प्रतिबिंबित होते. ८८% कर्मचार्‍यांनी त्यांचे नियोक्ते निवडताना वैयक्तिक करिअर वाढीला अधिक प्राधान्य दिल्याने त्याचे  महत्त्व जास्त आहे. हे लक्षात घेणे विशेष आहे की उर्वरित APAC मधील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत भारतीय कर्मचारी त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी अधिक प्रेरित आहेत. यातील बहुतांश बदलाचे श्रेय भारतीय नियोक्त्यांद्वारे सादर केलेल्या अत्युत्तम शिक्षणाच्या संधी आणि विविध क्षेत्रातील कामगारांच्या सतत विकसित होत असलेल्या गरजांशी जुळवून घेण्याच्या लवचिकतेला दिले जाऊ शकते. REBR च्या निष्कर्षांवरून हे देखील अधोरेखित करण्यात आले आहे की आकर्षक नियोक्ता ब्रँडचे बहुतेक पॅरामीटर्स पुरुष आणि महिला कर्मचार्‍यांसाठी सारखेच असतात, तथापि, महिला कर्मचार्‍यांनी आता लवचिक काम, आरोग्य सेवा फायदे आणि करिअरच्या प्रगतीसह कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. लोक कंपन्यांसाठी नव्हे तर संस्कृतींसाठी काम करतात म्हणून, नियोक्ता म्हणून तुमच्याबद्दल त्यांना काय वाटते हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि मला खात्री आहे की रँडस्टॅडचा हा अभ्यासपूर्ण अहवाल इंडिया इंक.च्या प्रतिभा व्यवस्थापन निर्णयांमध्ये खूप मोलाची भर घालेल,” असेही ते पुढे म्हणाले.

आरईबीआर २०२२ मधील इतर प्रमुख निष्कर्ष:

सर्वेक्षणात पुढे आलेला एक विशेष प्रवाह म्हणजे पुनर्कुशलता आणि कौशल्य वाढीचे महत्त्व. मुख्यतः महामारी आणि कार्यशक्तीमध्ये नवीन कौशल्यांची मागणी यामुळे याला चालना मिळाली आहे. बहुसंख्य कर्मचारी (८९%) पुन्हा नव्याने कौशल्ये शिकणे आणि/किंवा कौशल्यात वाढ करण्याची संधि मिळणे महत्त्वाचे मानतात आणि हा कल २५-३४ वर्षे वयोगटातील (९०%) आणि उच्च-शिक्षित कर्मचाऱ्यां( ९३%) मध्ये अधिक ठळकपणे दिसून येतो. नियोक्त्यांसाठी चांगली बातमी अशी आहे की सर्वेक्षणातील ८५% प्रतिसादकर्त्यांनी नमूद केले आहे की जर त्यांच्या नियोक्त्याने रीस्किलिंग/अपस्किलिंगसाठी पुरेशी संधी दिली तर ते संस्थेत राहण्याची शक्यता आहे.

काम आणि आयुष्य यांमधील संतुलन सुधारण्यासाठी कृती:

ईव्हीपीज मध्ये वर्क-लाइफ बॅलन्स सर्वाधिक गुण मिळवत असताना कर्मचाऱ्यांनी स्वतःसाठी याची खात्री करण्यासाठी पावले उचलली आहेत. ४६% कर्मचार्‍यांनी लवचिक वेळेच्या कक्षेमध्ये काम केले, ४४% नी अधिक दूरस्थपणे काम केले, तर २३%नी कार्य-जीवन संतुलन सुधारण्यासाठी त्यांच्या सध्याच्या   भूमिकांवर पुन्हा नव्याने विचार करून काम केले.

जागरूकता आणि आकर्षकतेनुसार भारतातील ४ आघाडीची क्षेत्रे:

सर्वेक्षणात असेही अधोरेखित करण्यात आले आहे की माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार (१), एफएमसीजी, रिटेल आणि ई-कॉमर्स (२), त्यानंतर ऑटोमोटिव्ह (३), आणि बीएफएसआय (4) यांसारख्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांसाठी भारतीय कर्मचारी वर्ग काम करण्यास प्राधान्य देतात.

********************************

About Randstad Employer Brand Research (REBR):

The Randstad Employer Brand Research is the most comprehensive, independent and in-depth employer brand research in the world, identifying the most attractive employers among thousands of companies. The research globally captures the views of over 163,000 respondents (general public, aged 18-65) from 5,944 companies in 31 countries. It provides insights into the perceptions and drivers of choice of potential employees. Why do people prefer one company, or a specific industry, over another? What motivates them to stay with an employer or start looking elsewhere? The research, conducted since 2000, was done by Randstad’s international research partner Kantar.

The Approach:

In each country, 150+ large companies, based on the employee numbers are chosen for the survey. This company list is presented to a representative cross-section of relevant respondents, with about 4000 respondents from each country. There is more emphasis on people aged between 25-44. Unlike similar surveys, HR officers, staff or experts are not invited to take part in the survey, which guarantees maximum objectivity. The respondents are asked to identify the companies they recognize and then indicate whether or not they would like to work for them. In the next step, they evaluate the relative attractiveness of each of the selected companies based on several key factors /drivers presented to them. Based on the attractiveness score of each of the employers presented to the respondents, the rankings are given per country. 

About Randstad India:

Randstad India offers the broadest HR services portfolio ranging from Staffing, Search & Selection to Recruitment Process Outsourcing (RPO). The organization has a vast network of offices across the country to be within the reach of clients, candidates and flexi workers. The company, previously called Ma Foi is one of the leading players in the HR services industry in India for almost 30 years and became part of Randstad through its global acquisition of Vedior in 2008.The Randstad Group is the global leader in the HR services industry, active in 38 countries across the globe. Randstad India continues to focus on developing customized and innovative HR services, leveraging on its unique strengths of geographical presence and end-to-end capability across all HR service functions.  For more information: www.randstad.in

About Randstad:

Randstad is the world’s largest HR services provider and is driven to become the world’s most valued ‘working life partner’, supporting as many people as possible in realizing their true potential throughout their working life. We provide companies with the high quality, diverse, and agile workforces they need while helping people get rewarding jobs and stay relevant in the ever-changing world of work. In 2021, we helped more than two million people find a job that is right for them, advised 235,000 clients on their HR needs, from talent acquisition to total workforce management, and delivered training to over 450,000 people. We use data and technology to provide the right advice at the right moment at scale, while our consultants across almost 5,000 locations in 38 markets give talent and clients personal, dedicated human attention. It is this combination of Tech and Touch that makes our offer unique. Randstad was founded in 1960 and is headquartered in Diemen, the Netherlands. In 2021, Randstad had on average 39,530 corporate employees and generated revenue of € 24.6 billion. Randstad N.V. is listed on the NYSE Euronext. For more information, see www.randstad.com.

For any further queries, please contact:

Manjulakshmi:  +91 9916993240 | manjulakshmi.p@randstad.in

Sakshi Panda: +91 91676 68192 | sakshi.panda@adfactorspr.com

Mayukhi Mondal: +91 9168464125 | Mayukhi.mondal@adfactorspr.com

Disclaimer: This study contains information in summary, from data based on primary research done in the country and is intended for general guidance only. It is not intended to be a substitute for detailed research or exercise of professional judgment. Neither Randstad India Pvt. Limited nor any other member of the global Randstad organization accepts any responsibility for any loss occasioned to any person acting or refraining from action as a result of any material in this publication.

Nesa Learning llp
Nesa Learning llp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *