पॉलीकॅब इंडिया लि. २०२३ मधील आगामी आयसीसी ग्लोबल इव्हेंट्सची भागीदार म्हणून घोषित I
पॉलीकॅब इंडिया लि. २०२३ मधील आगामी आयसीसी ग्लोबल इव्हेंट्सची भागीदार म्हणून घोषित
· पॉलीकॅब इंडिया लि. आता महिला व पुरुषांशी संबंधित सर्व आयसीसी कार्यक्रमांची भागीदार
मुंबई, 9 फेब्रुवारी २०२३ – पॉलीकॅब इंडिया लि. (पीआयएल) या भारतातील आघाडीच्या आणि १२२+ अब्ज रुपयांची एकत्रित उलाढाल असलेल्या इलेक्ट्रिकल गुड्स कंपनीने आज आर्थिक वर्ष २२ साठी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलसह अधिकृत भागिदारी केल्याचे जाहीर केले.
या भागिदारीअंतर्गत पॉलीकॅबद्वारे २०२३ च्या अखेरपर्यंत जागतिक पातळीवरील महिला व पुरुषांच्या सर्व आयसीसी कार्यक्रमांसाठी प्रायोजकत्व दिले जाणार आहे. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेत होत असलेला आयसीसी वुमन्स टी20 कप, इंग्लंडमधील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि भारतात होत असलेला आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ यांचा समावेश आहे.
गेल्या काही दशकांपासून पॉलीकॅब इंडिया हा भारतातील घराघरात माहीत असलेला ब्रँड असून आयसीसीबरोबर केलेल्या सहकार्यामुळे ब्रँडची दृश्यमानता वाढण्यास आणि जगभरातील एक अब्ज क्रिकेटप्रमींमध्ये त्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. या भागिदारीच्या माध्यमातून पॉलीकॅबने आपल्या सद्य आणि संभाव्य ग्राहकांबरोबरचा संवाद वाढवण्याचे ध्येय ठेवले असून त्यांच्यापर्यंत ‘वी इनोवेट फॉर अ ब्राइटर लिव्हिंग’ हा संदेश पोहोचवला जाणार आहे. स्पर्धेदरम्यानचा सर्व संवाद नाविन्यपूर्ण, सुरक्षित आणि उर्जा उत्पादनांवर भर देत तसेच ग्राहक व इन्फ्लुएन्सर्सपर्यंत प्रभावीपणे पोहोचून साधला जाणार आहे.
पॉलीकॅब इंडिया लि. चे अध्यक्ष आणि प्रमुख विपणन अधिकारी श्री. निलेश मलानी म्हणाले, ‘आमच्यासारख्या प्रतिष्ठित, एतद्देशीय विकास केलेल्या आणि आता ६० देशांत विस्तारलेल्या ब्रँडसाठी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलबरोबर भागिदारी करणे हा अभिमानाचा क्षण आहे. जगभरात या खेळाचे लाखो चाहते आहेत आणि आमची विचारसरणी समान तत्वावर आधारित असल्यामुळे पॉलीकॅबला ग्राहकांपर्यंत त्यांच्या पॅशनच्या माध्यमातून संवाद साधण्याचे महत्त्व समजते. क्रिकेटला पाठिंबा देण्यासाठी आयसीसीबरोबर भागिदारी करताना आम्हाला आनंद होत असून एकत्रितपणे आम्ही आमच्या ग्राहकांसाठी अविस्मरणीय अनुभवाची निर्मिती करू.’
आयसीसीचे प्रमुख कमर्शियल अधिकारी श्री. अनुराग दहिया म्हणाल्या, ‘२०२३ च्या अखेरपर्यंत पॉलीकॅब आयसीसीची अधिकृत भागीदार असेल हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. आगामी कार्यक्रमांसाठी त्यांच्यासोबत सहकार्य करून चाहत्यांना या खेळाचा अधिक आनंद देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
आयसीसी ग्लोबल इव्हेंट्सची अधिकृत भागीदार या नात्याने पॉलीकॅब इंडियाला या भागिदारीचा अभिमान वाटत असून आपले ग्राहक आणि व्यावसायिक भागिदारांसह भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
About Polycab India:
Polycab India Limited (PIL) is India’s largest manufacturer of Wires and Cables and one of the fastest growing FMEG companies with a consolidated turnover of INR 122+ billion in FY22. PIL is at the forefront of providing innovative, safe and energy efficient products to a diverse set of customers via a strong distribution network of 4,600+ authorized dealers and 205,000+ retail outlets. PIL’s business operations span across India through 25 manufacturing facilities, 15+ offices and 25+ warehouses. PIL has also served customers in 60+ countries globally. PIL’s 4,400+ employees are dedicated to upholding robust governance practices, preserving a customer centric culture, having a purpose to serve the communities, and imbibing a genuine sense of ecological consciousness. For further information, please visit www.polycab.com
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi