मुकेश अंबानींच्या मालमतेची विभागणी I
मुकेश अंबानींच्या मालमतेची विभागणी
२००२ मध्ये जेव्हा धीरूभाई अंबानी हे आपल्या मालमत्तेची विभागणी न करता व मृत्यूपत्र न बनवता मृत्यू पावले ,व त्यानंतर मुकेश अंबानी व अनिल अंबानी हे दोघे भाऊ मालमत्ता वाटणी करिता कोर्टात गेले. व त्यानंतर २००५ मध्ये मुकेश अंबानी यांना बंगाल च्या खाडीतील खोल समुद्रातील गॅस प्रक्रिया केंद्र मिळाले व त्यानंतर त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ची स्थापना केली. तर अनिल अंबानी यांना रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड चा ताबा मिळाला . आज मुकेश अंबानी $९० बिलियन च्या मालमत्तेसह श्रीमंतांच्या यादीत जगातील १० व्या क्रमांकावर राज्य करीत आहेत.
अंबानी यांनी त्यांच्या मालमत्तेच्या वाटणीनुसार, त्यांच्या मोठा मुलगा आकाश यास रिलायन्स जिओ इन्फोकॉम ची जबाबदारी दिली असून मुलगी ईशा हिस जिओ मार्टच्या अध्यक्षपदी राहील तर २७ वर्षीय अनंत यास ऑइल व केमिकल व्यवसायाची जबाबदारी सांभाळेल. परंतु त्यास प्रदूषण विरहित अश्या नव्या सोलर पॅनल, सोडिअम आयन बॅटरी, ग्रीन हायड्रोजन अश्या व्यवसायात सध्याचा मूळ व्यवसाय रूपांतरित करावा लागेल.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo