महिंद्रा लाइफस्पेसेसतर्फे महिंद्रा खराडी अनेक्स, पुणे येथे महिंद्रा आयव्हीलश लाँच I

महिंद्रा लाइफस्पेसेसतर्फे महिंद्रा खराडी अनेक्स, पुणे येथे महिंद्रा आयव्हीलश लाँच

महिंद्रा लाइफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेड (एमएलडीएल) या महिंद्रा समूहाच्या रियल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर विकास कंपनीने खराडी अनेक्स येथील महिंद्रा आयव्हीलश (महिंद्रा कोडनेम क्राउन) या प्रकल्पाचा दुसरा टप्पा लाँच केला आहे. या टप्प्यात दोन नवे टॉवर्स लाँच करण्यात आले असून त्यात अंदाजे ५०० निवासी घरांचा समावेश आहे. महिंद्रा आयव्हीलशमध्ये प्रीमियम २बीएचके आणि ३बीएचके घरांचा समावेश असून राहाण्याचा सुखद अनुभव तिथे मिळणार आहे. या प्रकल्पामध्ये स्वतंत्र प्रीमियम ४ बीएचके टॉवरचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाच्या जोरावर हे लाँच करण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये प्रशस्त डेक्स, खेळती हवा, ज्येष्ठांसाठी सोयीस्कर वॉशरूम्स आणि हवामानानुसार बदलत्या सोयींचा समावेश करण्यात आला आहे.

Mahindra Ivy lush
Mahindra Ivy lush

महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि. चे प्रमुख व्यवसाय अधिकारी (निवासी) विमलेंद्र सिंग म्हणाले, ‘पहिल्या टप्प्याला मिळालेला प्रतिसाद ग्राहकांचा महिंद्रा लाइफस्पेसेसवर असणारा विश्वास दर्शवणारा आहे. दुसऱ्या टप्प्यात आम्ही उपयुक्तता, आरामदायीपणा आणि दर्जा यांचा मेळ घालणारी नाविन्यपूर्ण घरे उभारण्याचे ध्येय ठेवले आहे. या लाँचमुळे शहरात राहाण्याचा नवा मापदंड प्रस्थापित करण्याची आमची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.’

पूर्व पुण्यातील मध्यवर्ती भागात वसलेला हा प्रकल्प खराडी आयटी हब आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरपासून उत्तम कनेक्टिव्हिटी देणारा आहे. प्रकल्पाभोवती चांगल्या प्रकारे विकसित करण्यात आलेल्या सामाजिक पायाभूत सुविधा असून त्यात वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे, युरोस्कूल खराडी आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूलसारख्या नामवंत शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *