८२% मुंबईकरांनी जाणीवपूर्वक केली शाश्वत जीवनाकडे वाटचाल: गोदरेज प्रॉपर्टी होम लिव्हअॅबिलिटी फॅक्टर्स I
८२% मुंबईकरांनी जाणीवपूर्वक केली शाश्वत जीवनाकडे वाटचाल: गोदरेज प्रॉपर्टी होम लिव्हअॅबिलिटी फॅक्टर्स I
अहवालातील प्रमुख ठळक मुद्दे:
· ८२% मुंबईतील घर खरेदीदारांना घरामध्ये शाश्वत जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित झाल्यासारखे वाटते
· मुंबईतील ८०% गृहखरेदीदारांना छंद, आवड आणि आकांक्षा जोपासायला आवडते आणि त्यासाठी त्यांच्या घरात एखादी विशिष्ट जागा असणे त्यांना महत्त्वाचे वाटते
· ७८% मुंबईकरांना कार्यालयीन व्यवस्था घरी असणे महत्त्वाचे आहे असे वाटते
मुंबई, १२ ऑगस्ट २०२२: मुंबईतील ८२% प्रतिसादकर्त्यांनी कबूल केले की साथीच्या आजाराने त्यांना घरातील शाश्वत जीवनशैलीसाठी प्रभावित आणि प्रेरित केले. गोदरेज प्रॉपर्टीजने नुकत्याच केलेल्या होम लिव्हेबिलिटी फॅक्टर्सच्या अभ्यासातून ८४% मुंबईकरांना त्यांच्या घरात आणि आजूबाजूच्या परिसराला निसर्गाशी जोडणे महत्त्वाचे वाटले. अभ्यासात असे दिसून आले आहे की मुंबईकर अधिक जागरूक झाले आहेत, ऊर्जा आणि संसाधने वाचवण्याचा ते प्रयत्न करतात, अन्नाची नासाडी टाळतात आणि शक्य असेल तेव्हा शाश्वत उत्पादनांचा वापर करतात.
होम लिव्हेबिलिटी फॅक्टर्स घर खरेदीदारांच्या प्राधान्यांमध्ये मूलभूत बदल अधोरेखित करतात. त्यात महामारीचा उदय आणि त्यामुळे निवासी अपार्टमेंटसाठी त्यांच्या पसंतीमध्ये झालेले लक्षणीय बदल आहेत.
गोदरेज प्रॉपर्टीजचे मुख्य डिझाईन अधिकारी श्री राकेश कुमार म्हणाले, “घर खरेदी करणारे आता मूलभूत चेकलिस्टच्या पलीकडे जात आहेत आणि अतिशय विशिष्ट, सानुकूल-डिझाइन केलेल्या आणि स्मार्ट घरांच्या शोधात आहेत. ही घरे केवळ तांत्रिकदृष्ट्या विकसित नाहीत तर सुरक्षितता, सावधानता यांबाबतीत अधिक आधुनिक सुविधा देतात. घरातील जीवन आता आरोग्य आणि तंदुरुस्तीवर केंद्रित झाले आहे ज्यामुळे मुक्त आणि सुरक्षित राहण्याच्या वातावरणाला एक मजबूत महत्त्व प्राप्त झाले आहे.”
अभ्यासात असे दिसून आले आहे की ८०% मुंबईकरांना छंद आणि आवड जोपासणे महत्त्वाचे आहे असे वाटते आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या घरात जागाही विकसित केली आहे. महामारीच्या काळात मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य ही आणखी एक महत्त्वाची चिंता होती. ५८% मुंबईतील घर खरेदीदारांनी मान्य केले की ते निरोगी आणि सुरक्षित राहण्याचे वातावरण सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतात तर २४% लोकांनी कबूल केले की त्यांचे घरगुती जीवन त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर केंद्रित आहे.
महामारी नंतर घर खरेदी करणार्यांच्या मानसिकतेत मूल्यात्मक बदल झाले आहेत आणि आता घरे म्हणजे घर खरेदी करणार्यांच्या विविध गरजा पूर्ण करू शकणारी निवासस्थाने आहेत. ७८% मुंबईकरांना असे वाटते की ऑफिस सेटअप घरी असणे महत्वाचे आहे. ५८% लोकांना असे वाटते की घर कधीही त्यांच्या ऑफिसची जागा घेणार नाही, तर २०% लोक म्हणाले की त्यांनी महामारीच्या काळात घरात ऑफिस सेट अप तयार करून पूर्णपणे जुळवून घेतले.
आता लोक त्यांच्या घराकडून असलेल्या अपेक्षांबद्दल अधिक जागरूक आहेत. घरे ही त्यांची फक्त ‘राहण्याची जागा’ राहिलेली नाही. घरांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांच्या कामाच्या ठिकाणाचे अंतर गृहनिर्माण संकुलापासून किती जवळ-लांब आहे हे बघतात आणि मुख्य निर्णय घेण्याच्या निकषांमध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे. ८४% लोकांनी खरेदीची किंमत आणि विविध प्रकारच्या सेवा सुविधा जसे की (दुकाने, शाळा, सार्वजनिक जागा इ. हा महत्त्वाचा निकष म्हणून मानांकित केला आहे आणि ८०% लोकांना वाटते की त्यांच्यासाठी बिल्डर/प्रमोटरचा लौकिक किंवा ब्रँड इक्विटी घर निवडीसाठी महत्त्वाची आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo