गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स तिमाही निकाल I

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स तिमाही निकाल

आ.व. २०२३च्या १ल्या तिमाहीचे निष्कर्ष – जीसीपीएलने आ.व. २०२३च्या १ल्या तिमाहीत ८% वृद्धीसह ३,०९४ करोड रुपयांची विक्री केली.

मुंबई, ३ ऑगस्ट २०२२: गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) ह्या ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणाऱ्या उदयोन्मुख अग्रगण्य कंपनीने ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे तिचे आर्थिक निष्कर्ष आज जाहीर केले.

आर्थिक दृष्टिक्षेप
आ.व. २०२३ च्या १ल्या तिमाहीच्या कामगिरीचा सारांश
• आ.व. २०२३च्या १ल्या तिमाहीची एकत्रित विक्री वर्षागणिक ८% ने वाढली; ३ वर्षांचा सीएजीआर १०% एवढा होता.

  • भारतातील व्यवसायाची विक्री वर्षागणिक १२% ने वाढली, ३ वर्षांचा सीएजीआर १२% एवढा होता.
  • इंडोनेशियातील विक्री वर्षागणिक भारतीय रुपयांमध्ये ९% व स्थिर चलनाच्या परिभाषेत १२% ने घटली; ३ वर्षांचा सीएजीआर स्थिर चलनामध्ये -२% होता.
  • आफ्रिका, अमेरिका आणि मध्यपूर्वेतील विक्री वर्षागणिक भारतीय रुपयांमध्ये आणि स्थिर चलन परिभाषेत १२% ने वाढली . ३ वर्षांचा सीएजीआर स्थिर चलनामध्ये ११% एवढा होता.
  • लॅटिन अमेरिका आणि सार्कमधील विक्री वर्षागणिक भारतीय रुपयात ५% ने घटली आणि स्थिर चलन परिभाषेत ती १५% ने वाढली. ३ वर्षांचा सीएजीआर स्थिर चलनामध्ये २८% एवढा होता.
    • आ.व. २०२३च्या १ल्या तिमाहीचे वर्षागणिक एकत्रित ईबीआयटीडीए १३% ने घटले (एकदाच करावयाच्या बाबींशिवाय)
    • आर्थिक वर्ष २०२३च्या १ल्या तिमाहीतील संकलित निव्वळ नफा (अपवादात्मक बाबींशिवाय आणि एकदाच करावयाच्या बाबींशिवाय) १६% ने घटला.

कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे भाष्य

 Sudhir-Sitapati-MD-CEO-GCPL
Sudhir-Sitapati-MD-CEO-GCPL

२०२३च्या १ल्या तिमाहीतील व्यवसायाच्या कामगिरीवर भाष्य करताना जीपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर सीतापती म्हणाले:

आ.व. २०२३च्या १ल्या तिमाहीत आम्ही स्थिर कामगिरी केली. एकूणच विक्री ८% ने वाढली, ज्यात ३ वर्षांचा सीएजीआर दोन अंकी होता. परंतु किमतींमुळे ही वृद्धी शक्य झाली. आम्हाला असा विश्वास वाटतोय की, आमच्या पोर्टफोलिओच्या तुलनात्मक नॉन-डिस्क्रिशनरी, मास प्रायसिंगमुळे आणि बाजारपेठांमधील हिश्श्याच्या उत्तम कामगिरीमुळे मध्यम कालावधीत व्हॉल्यूम ग्रोथ पुन्हा एकदा दिसून येईल. पूर्वी कधीही नव्हती एवढ्या जागतिक कमॉडिटी तेजी, बाजारात केलेल्या थेट गुंतवणुकीमुळे आणि आमच्या लॅटिन अमेरिका आणि सार्क व्यवसायाने केलेली खराब कामगिरी यांमुळे आमचे एकूणच ईबीआयटीडीए १३% ने घटले (एकदाच करावयाच्या बाबींसह). अपवादात्मक बाबी आणि एकदाच करावायाच्या बाबी यांच्याशिवाय पीएटी १६% ने घटले.

भौगोलिक बाबतीत सांगायचे झाले, तर भारतात १२% ने स्थिर वृद्धी झाली. आमच्या आफिक्रा, अमेरिका आणि मध्य पूर्वेतील व्यवसायाने वृद्धीचा मजबूत आलेख पुढे चालूच ठेवला – भारतीय रुपयांमध्ये आणि स्थिर चलनाच्या परिभाषेत १२% ने वृद्धी झाली. आमच्या इंडोनेशियन व्यवसायातील कामगिरी भारतीय रुपयांमध्ये ९% ने आणि स्थिर चलनामध्ये १२% ने घट झाल्यामुळे कमजोर राहिली. संवर्गनिहाय विचार करता, भारतात पर्सनल केअरमध्ये सतत वाढ झालेली आम्हाला पहायला मिळाली, जी २५% ने वाढली. होम केअरने सौम्य कामगिरी केली व तिच्यात ४% ने घट झाली.

तेजीच्या वातावरणाचा दबाव कमी होत असल्याने नियंत्रण करता येण्याजोग्या खर्चांवर लक्ष केंद्रित करून बाजारपेठेत जास्त गुंतवणूक करणे चालू ठेवून वस्तूंच्या खपात वाढ होईल आणि त्याचबरोबर मार्जिन्समध्येही सुधारणा होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

आमचा ताळेबंद नेहमीप्रमाणेच मजबूत आहे आणि आमचे डेट आणि इक्विटीचे गुणोत्तर कमी होत आहे. इन्व्हेंटरी आणि वेस्टेड कॉस्ट कमी करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत आणि संवर्गविकासाच्या माध्यमातून आमच्या सर्व पोर्टफोलिओंमध्ये नफादायक आणि शाश्वत व्हॉल्यूम ग्रोथ करण्यासाठी ह्याचा उपयोग करून घेऊ.

उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांसाठी आरोग्य आणि सौंदर्य यांतील भलेपणा घेऊन येण्याच्या आमच्या हेतूशी आम्ही बांधील आहोत.

व्यवसायाविषयी अद्ययावत माहिती – भारत

कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये
• २०२३च्या १ल्या तिमाहीत भारतातील विक्रीत १२% ने वाढ होऊन ती १,८१४ कोटी रुपये झाली; व्हॉल्युममध्ये ६% ने घट झाली.
• २०२३च्या १ल्या तिमाहीत ईबीआयडीटीए ४% ने घट होऊन तो ४०८ कोटी रुपये झाला.
• २०२३च्या १ल्या तिमाहीत, एकाच वेळी करावयाच्या बाबींव्यतिरिक्तच्या निव्वळ नफ्यामध्ये २% ने घट होऊन तो ३१९ कोटी रुपये झाला.

संवर्गनिहाय पुनरावलोकन

होम केअर
होम केअरमध्ये ४% ने घट झाली, ज्यात २ वर्षांचा सीएजीआर ८% होता.
आम्ही घरगुती कीटकनाशकांच्या बाबतीत, हाय बेस आणि तुलनात्मक कमी हंगामाच्या पार्श्वभूमीवर सौम्य कामगिरी केली, तर मॅट बेसिसवर आम्ही नवीन प्रदेशात शिरकाव केला आणि बाजारपेठेतील हिस्सा मिळवणे चालू ठेवले. शाश्वत वृद्धीसाठी आम्ही संवर्गविकासाची बीजे रोवत आहोत. गुडनाईड लिक्विड व्हेपरायझर # नींदों को नजर ना लगे (#NeendoKoNazarNaLage) आणि ‘हिट’ यांसाठी आम्ही नवीन मोहीम सुरू केली. आमच्या नॉन-मॉस्क्विटो पोर्टफोलिओने मजबूत वृद्धी गती सुरूच ठेवली.

एअर फ्रेशनर संवर्गातील वाढीमुळे त्याने मजबूत कामगिरी केली, आणि मॅट बेसिसवर आम्ही बाजारपेठेतील हिस्सा मिळवणे चालू ठेवले. एअर पॉवर पॉकेटसाठी त्याभोवतीचे आमचे संवर्गविकास उपक्रम आणि एअर मॅटिकसाठी प्रिमिअमायझेशनच्या माध्यमातून (‘जर न्हाणीघरांना/खोल्यांना बोलता येत असतं, तर’) ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता.

पर्सनल केअर
पर्सनल केअरमध्ये २५% ने वृद्धी झाली, ज्यात २ वर्षांचा सीएजीआर २१% होता.
पर्सनल वॉश आणि हायजिनने त्याच्या वृद्धीची गती कायम ठेवली, ज्यात विक्रीची वृद्धी दोन अंकी होती आणि २ वर्षांचा सीएजीआर दोन अंकी मध्ये होता. संवर्गविकासासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे आम्ही मॅट बेसिसवर बाजारपेठेतील हिस्सा मिळवणे सुरू ठेवले आहे आणि नवीन प्रदेश काबीज करणे चालूच ठेवत आहोत. परवडणारा आणि टिकाऊ रेडी-टू-मिक्स मॅजिक बॉडीवॉश ४५ रु. किमतीमध्ये बाजारपेठेत आणून आम्ही व्हॅल्यू-फॉर-मनी आणि ग्रीन प्रोपोझिशनला मजबूती देत आहोत.

संवर्गातील वाढीमुळे हेअर कलरमध्ये मजबूत वृद्धी झाली, ज्यात २ वर्षांचा सीएजीआर दोन अंकी होता. गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम सातत्याने चांगली कामगिरी करत आहे आणि बाजारपेठेतील त्याचा हिस्सा मिळवत आहे, जो बाजारपेठेतील मजबूत मोहिमेमुळे शक्य झाला. त्याशिवाय, गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीमला १५ रुपये किमतीत मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.
व्यवसायाविषयी अद्ययावत माहिती – इंडोनेशिया

इंडोनेशियातील आमच्या व्यवसायाने खराब कामगिरी केली, ज्यात स्थिर चलन परिभाषेतील विक्रीत १२% ने घट झाली. हायजिन (सॅनिटर) वगळून झालेल्या विक्रीत स्थिर चलनाच्या परिभाषेत ४% ने घट झाली.
आम्ही चॅनेल पार्टनर्ससोबतचे स्टॉक्स कमी करणे चालूच ठेवले, परिणामस्वरूपी विक्रीमध्ये जवळपास एकसमान वृद्धी झाली. कमॉडिटी इन्फ्लेशनमधील वाढ, बाजारपेठेतील थेट गुंतवणूक, मोठ्या प्रमाणावरील हायजिन कंपॅरेटर आणि स्केल डिलिव्हरजन्स यांमुळे आमचे ईबीआयटीडीए मार्जिन्स वर्षागणिक ८१० बीपीएसने कमी झाले. संवर्गविकास आणि सर्वसाधारण व्यापाराच्या विस्तारासाठी आम्ही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे चालू ठेवलेले आहे.

व्यवसायाविषयी अद्ययावत माहिती – आफ्रिका, अमेरिका आणि मध्यपूर्व

आफ्रिका, यूएसए आणि मध्य पूर्वेतील आमच्या व्यवसायसमूहाने स्थिर चलनाच्या परिभाषेत १२% ची दोन अंकी विक्री वृद्धी नोंदवली (३ वर्षांचा सीएजीआर ११%). आमची विक्रीतील मजबूत वृद्धी गती दक्षिण आफ्रिकेत चालूच राहिली. आमच्या ड्राय हेअर संवर्गातील उत्पादनामध्ये मध्य-एकल अंकात वृद्धी झाली, तर एफएमसीजी संवर्गात दोन अंकी वृद्धी झाली. एकीकडे ईबीआयटीडीए मार्जिन्समध्ये वर्षागणिक १६० बीपीएसने घट झाली, तर शाश्वत वृद्धी चालू ठेवण्यासाठी आणि ड्राय हेअर आणि एफएमसीजी अशा दोन्ही संवर्गांमध्ये वाढीव गुंतवणुकीसाठी आम्ही मार्केटिंग इनिशिएटिव्ह सुरूच ठेवले.

Godrej Consumer products
Godrej Consumer products

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस्विषयी

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस् ही एक अग्रगण्य उदयोन्मुख विपणन कंपनी आहे. १२५ वर्षांच्या तरुण गोदरेज समूहाचा एक हिस्सा म्हणून विश्वास, प्रामाणिकपणा आणि दुसऱ्यांच्या प्रति असलेला आदर यांच्या मजबूत मूल्यांच्या पायावर उभारेला वारसा आम्हाला सुदैवाने लाभलेला आहे. त्याचवेळी आम्ही वेगाने प्रगती करीत आहोत आणि आमच्या अपेक्षा उत्कंठावर्धक आणि महत्त्वाकांक्षी आहेत.

आज आपल्या समूहाला जागतिक पातळीवर वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये १.१५ बिलिअन ग्राहकांचा आश्रय लाभत आहे. सर्वात मोठ्या घरगुती कीटकनाशकांच्या आणि हेअर केअर कंपन्यांच्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आमचा वरचा क्रमांक आहे. घरगुती कीटकनाशकांच्या बाबतीत आम्ही भारतात अग्रेसर आहोत, इंडोनेशियात दुसऱ्या क्रमांकावर आणि आफ्रिकेत आमचे कार्यक्षेत्र विस्तारत आहोत. आम्ही आफ्रिकन वंशाच्या स्त्रियांच्या हेअर केअर उत्पादनांच्या गरजा पूर्ण करण्यात अग्रेसर आहोत, भारतात आणि सब-सहारन आफ्रिकेत आणि लॅटिन अमेरिकेतील अग्रगण्य कंपन्यांमध्ये हेअर कलर कंपन्यांमध्ये क्रमांक एकवर आहोत. भारतात साबणांच्या बाबतीत आमचा क्रमांक दुसरा आहे आणि एअर फ्रेशनर्स आणि वेट टिश्यूमध्ये इंडोनेशियात क्रमांक एकवर आहोत.

परंतु आमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे की, मजबूत आर्थिक कामगिरी आणि नवनवीन कल्पना, अत्यंत लोकप्रिय उत्पादने, असूनही आम्ही एक उत्तम कंपनी आहोत. आमच्या समूहाच्या सुमारे २३ टक्के प्रमोटर होल्डिंग कंपन्या ह्या ट्रस्टने धारण केलेल्या आहेत, जे पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण यांमध्ये गुंवतणूक करतात. आमच्या ‘गुड अँड ग्रीन’ दृष्टिकोनाच्या माध्यमातून वेगळेपणा दाखवून देण्यासाठी, अधिक समावेशक आणि हरित भारत निर्माण करण्यासाठी आम्ही आमच्या उत्कट भावना आणि हेतू यांना एकत्र आणीत आहोत.

या सर्वाच्या केंद्रस्थानी आहे ती आमची बुद्धिमान टीम. चपळ आणि उच्च कामगिरीच्या संस्कृतीसह, कार्यसंस्कृतीस प्रोत्साहन देणारे कार्यस्थळ निर्माण करण्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या टीममधील विविधता ओळखून विविधतेचा सन्मान करण्यासाठीही आम्ही कटिबद्ध आहोत.

अस्वीकृती:
वर व्यक्त केलेली आर्थिक स्थिती ही व्यवसायाच्या वास्तविक आर्थिक कामगिरीचे प्रतिबिंब दर्शविण्यासाठी कळविलेल्या आर्थिक स्थितीपेक्षा वेगळी असू शकते. ह्या संज्ञापनातील काही विधाने लागू असलेल्या कायद्यांच्या आणि विनियमांच्या अर्थानुसार कदाचित आशावादी असू शकतात. यात व्यक्त केलेल्या किंवा अध्याहृत निष्कर्षांपेक्षा वास्तवातले निष्कर्ष हे मोठ्या प्रमाणावर वेगळे असू शकतात. कंपनीच्या विकासावर परिणाम करू शकतील अशा महत्त्वाच्या घडामोडींमध्ये उद्योगाच्या रचनेतील बदल, भारतातील आणि परदेशातील राजकीय आणि आर्थिक वातावरण, करविषयक कायदे, आयात कर, न्यायालयीन खटले आणि कामगार संबंध यांमध्ये झालेले मोठे बदल यांचा समावेश आहे.

Avadhut sathe
Avadhut sathe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *