गोदरेज लॉकिम मोटर्स ने महाराष्ट्रात नवीन अनुभव केंद्राचे अनावरण केले I
गोदरेज लॉकिम मोटर्स ने महाराष्ट्रात नवीन अनुभव केंद्राचे अनावरण केले
मुंबई, २७ फेब्रुवारी, २०२३: गोदरेज समूहाची एक प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयस ने त्यांच्या गोदरेज लॉकिम मोटर्स व्यवसायाद्वारे नवीन अनुभव केंद्राच्या उद्घाटनाची घोषणा केली. आजच्या आणि पुढ्या पिढीतील इलेक्ट्रिक वाहने ग्राहकांच्या गरजा कशा पूर्ण करू शकतात हे समजून घेण्याची आणि त्यासाठी एक सखोल माहितीवजा अनुभव घेता यावा याची आवश्यकता लक्षात घेऊन गोदरेज लॉकिम मोटर्स व्यवसायाने त्यांच्या महराष्ट्रातील शिंदेवाडी प्लांटमध्ये २००० चौरस फूटांच्या अत्याधुनिक अनुभव केंद्राचे अनावरण केले. गोदरेज लॉकिम अनुभव केंद्राची रचना उभरत्या ग्राहकांचे अनुभव लक्षात घेऊन केली असून तेथे व्हर्च्युअल रिअॅलिटी प्लॅटफॉर्मवर व्यवसायाच्या क्षमतांबद्दल सखोल माहिती व ज्ञान दिले जाते.
कंपनीच्या क्षमतांना प्रक्षेपित करण्यासाठी स्पर्श संवेदनशील परस्परसंवादी भिंत (टच सेन्सिटीव्ह इंटरॅक्टिव वॉल), वाहन आणि त्यांचे घटक बनवण्याची प्रक्रिया नजरेसमोर आणण्यासाठी होलोग्राम प्रतिमा, वेगवेगळ्या वातावरणात वाहन कसे काम करते हे ग्राहकांना समजून घेता यावे म्हणून लहान आकाराच्या प्रति वाहनाचे अॅप्लिकेशन आणि कंपनी नंबर आणि गुणवत्ता प्रक्रिया प्रदर्शित करण्यासाठी माहितीपूर्ण वॉल ग्राफिक्स यांसह हे केंद्र सुसज्ज आहे. अधिक शाश्वत आणि हरित भविष्य असावे यासाठी पर्यावरण आणि सामाजिक विकास क्षेत्रात कंपनी करीत असलेले समर्पित प्रयत्न सुद्धा हे केंद्र दाखवते.
गोदरेज लॉकिम मोटर्स आणि गोदरेज अँड बॉयसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख श्री. झर्सिस के मार्कर यावेळी म्हणाले, “ही अत्याधुनिक सुविधा आमच्या भागीदारांना आमची नावीन्यपूर्ण उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवांचा सखोल अनुभव प्रदान करते आणि त्यातून आमच्या सेवा त्यांच्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकतात हे जाणण्याची, त्याबाबत संवाद साधण्याची आणि ते अधिक अनुभवण्याची संधी सुद्धा देते. आमच्या ग्राहकांना हा अनोखा, परस्पर संवादी अनुभव देताना आणि उत्कृष्टतेबद्दलची आमची वचनबद्धता प्रदर्शित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”
गोदरेज लॉकिम मोटर्सचे हे अनुभव केंद्र भारतीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही ग्राहकांना सेवा देईल. हे केंद्र विविध अॅप्लिकेशन्ससाठी विद्यमान तंत्रज्ञान आणि पर्यायी व नवीन तंत्रज्ञान वापरुन बीएलडिसी आणि इन्डक्शन दोन्ही हरमेटिक कॉम्प्रेसर, डोअर क्लोजर मोटर, मोटर लॅमिनेशन्स, मोटर कॉम्पोनन्ट्स आणि अत्याधुनिक खास सानुकूल तयार केलेल्या मोटर्स प्रदर्शित करेल.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे