गोदरेज इंटेरिओने त्याच्या पोर्टफोलिओ अंतर्गत एकत्रित केले ब्रँड U&Us आणि स्क्रिप्ट I
गोदरेज अँड बॉयसने गोदरेज इंटेरिओ ब्रँड अंतर्गत एकत्र केला संपूर्ण फर्निचर सुविधा व्यवसाय
गोदरेज इंटेरिओने त्याच्या पोर्टफोलिओ अंतर्गत एकत्रित केले ब्रँड U&Us आणि स्क्रिप्ट
~किरकोळ नेटवर्क १०० आउटलेट्सने विस्तारित करण्याची योजना
~५,००० पिनकोड्सपर्यंत ई-कॉमर्स पोहोचचा विस्तार
मुंबई, 11 ऑगस्ट २०२२: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसने घर आणि संस्थात्मक विभागांमधला भारतातील अग्रगण्य फर्निचर सोल्यूशन्स ब्रँड असलेला त्यांचा व्यवसाय गोदरेज इंटेरिओने त्यांच्या एंड-टू-एंड होम इंटिरियर सोल्यूशन्स ब्रँड U&US आणि प्रीमियम फर्निचर आणि होम अॅक्सेसरीज ब्रँड स्क्रिप्टचे त्याच्या पोर्टफोलिओमध्ये एकत्रीकरण करत असल्याची घोषणा केली आहे. हे एकत्रीकरण गोदरेज इंटेरिओ स्टोअरमध्ये जाणाऱ्या ग्राहकांना मुख्य मॉड्युलर फर्निचर सोल्यूशन्स, कस्टमाइझ फर्निचर, एंड टू एंड इंटिरियर्स किंवा फर्निचरची आधुनिक, समकालीन प्रीमियम लाइन अशा गोदरेज अँड बॉयसच्या फर्निचर सादरीकरणाच्या संपूर्ण श्रेणीचे एक्सपोजर मिळविण्यात मदत करेल.
गोदरेज इंटेरिओचे व्यवसाय प्रमुख स्वप्नील नगरकर म्हणाले: “गोदरेज इंटेरिओ या रिटेल फर्निचर शाखेने गेल्या ३ वर्षात संपूर्ण भारतामध्ये झपाट्याने विकास झालेला पाहिला आहे आणि संपूर्ण उद्योगक्षेत्राची वाढ ६-७% दराने होत असताना त्यांचा विकास १५% सीएजीआर सह झाला आहे. समूहातर्फे घरे आणि कार्यालये या दोन्ही फर्निचर श्रेणीतील विभागासाठी सेवा पुरविली जाते आणि पेटंट अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरांच्या जागांसाठी नाविन्यपूर्ण कल्पना पुरवत अंतर्गत परिसंस्था आणि अनुभव तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. आमच्या अलीकडील ग्राहक विभागणी अभ्यासातून असे दिसून आले आहे की गोदरेज इंटीरियो , स्क्रिप्ट आणि यू आणि अस डिझाईन स्टुडिओ या आमच्या ३ ब्रँडमध्ये ग्राहकांना ओव्हरलॅप करणे आवश्यक आहे. त्यामुळे, त्यांच्या गरजा वेगवेगळ्या ब्रँडद्वारे पूर्ण करण्याऐवजी गोदरेज इंटेरिओच्या मोठ्या छत्राखाली त्यांना सादर करणे अधिक चांगले आहे. त्यातून आम्हाला आमचे सर्व प्रयत्न आणि संसाधने गोदरेज इंटेरिओ ब्रँडवर केंद्रित करण्यात मदत होते. अशा प्रकारे, एकात्मिक पध्दतीने ग्राहक वर्गाच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारी फर्निचर सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.”
पुढील विकासावर भाष्य करताना स्वप्नील पुढे म्हणाले, “आमच्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओचा स्मार्ट कार्यक्षमतेसह विस्तार करणे आणि व्यवसायाच्या अंतर्गत श्रेणीद्वारे सानुकूलित सुविधा पुरविणे अशी कल्पना आहे. आम्ही पुढील २-३ वर्षांमध्ये बाजारपेठेतील प्रवेश वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि त्यादृष्टीने टियर ३ शहरांमध्ये सेवा देण्यात येईल. आम्ही डिलिव्हरींसाठी सुधारित बॅकएंडसह ५,००० पिन कोडपर्यंत डिलिव्हरी वाढवून आमचे स्वतःचे डीटूसी ईकॉमर्स चॅनल मजबूत करण्याची योजना आखत आहोत आणि या आर्थिक वर्षाच्या अखेरीस प्लॅटफॉर्म विक्रीचा रन रेट दुप्पट करण्याचे आमचे ध्येय आहे. अग्रगण्य मार्केटप्लेस वेबसाइटवरील विक्रेत्याच्या मॉडेलप्रमाणेच प्लॅटफॉर्म लवकरच आमच्या डीलर नेटवर्कला ऑनबोर्ड करण्यास सक्षम होईल आणि त्यामुळे त्यांना त्यांची स्टॉक इन्व्हेंटरी अपलोड करण्याची आणि डिजिटल दृश्यमानता सुधारण्याची अनुमती मिळेल.”
U&Us डिझाईन स्टुडिओज आता गोदरेज इंटेरिओ होम इंटिरिअर्स म्हणून काम करतील. ते सानुकूलित फर्निचर आणि डिझाईनपासून डिलिव्हरीपर्यंत एंड-टू-एंड होम इंटिरियर सुविधा पुरवितात. हे खास डिझाईन स्टुडिओ सध्या ठाणे, बंगळुरू आणि हैदराबाद येथे आहेत आणि ग्राहकांना त्यांच्या स्वत:च्या जागा कॉन्फिगर आणि व्हिज्युअलाईज करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणारे रिटेल अनुभव देण्याचे आश्वासन देतात. त्याचप्रमाणे स्क्रिप्टची प्रीमियम फर्निचर आणि होम अॅक्सेसरीजची श्रेणी आता गोदरेज इंटेरियो श्रेणी अंतर्गत त्याच्या दालनामध्ये तसेच वेबसाइटवर उपलब्ध असेल.
एकत्रीकरणाचा एक भाग म्हणून गोदरेज इंटेरिओने मुंबई, दिल्ली, गुडगाव आणि कोलकाता येथील COCO दालनामध्ये शॉप-इन शॉप फॉरमॅटद्वारे या सेवा देण्याची योजना आखली आहे. अखेरीस इतर शहरांमध्येही मॉडेल फूटप्रिंटचा विस्तार करण्याची या ब्रँडची योजना आहे.
ब्रँड पुनरचना एकात्मिक क्रिया मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होतील आणि एकूण महसुलात ५-८% योगदान देईल. आक्रमक विस्तार धोरणासह गोदरेज इंटेरिओने देशभरात १०० आऊटलेट्सनी आपले रिटेल नेटवर्क वाढवण्याची योजना आखली आहे आणि या आर्थिक वर्षात एकूण महसूल २५% वाढीचे लक्ष्य आहे.
गोदरेज इंटेरिओ देखील शेवटी कलेक्शन तत्वज्ञानाचा अवलंब करणार आहे जिथे ते डिझाईन लँग्वेज, फंक्शनॅलिटी इत्यादीसारख्या समान धाग्याच्या उत्पादनांचा संग्रह एकत्र करतील आणि ते ग्राहकांसमोर प्रेरणादायी पद्धतीने सादर करतील. ब्रँडने सध्या त्यासाठी रणनीती तयार केली आहे. गोदरेज इंटिरिओ वेबसाइटही ग्राहकांना गोदरेज इंटेरिओ होम इंटिरियर्स (पूर्वीचे U&Us) अंतर्गत त्याच्या कामाची आणि सेवांची झलक देखील देईल. त्यात स्वतःसाठी एक समर्पित विभाग असेल. त्याद्वारे संभाव्य ग्राहकांना निवडक शहरे आणि स्टोअरमध्ये आमच्या डिझाइनरशी वैयक्तिक सल्लामसलत बुक करण्यासही अनुमती दिली जाईल.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi