गोदरेज अॅण्ड बॉईसकडून डिझाइनच्या माध्यमातून शाश्वत राहणीमानाला सुधारित करण्यासाठी वार्षिक इव्हेण्ट ‘कॉन्शिअस कलेक्टिव्ह’ लाँच
गोदरेज अॅण्ड बॉईसकडून डिझाइनच्या माध्यमातून शाश्वत राहणीमानाला सुधारित करण्यासाठी वार्षिक इव्हेण्ट ‘कॉन्शिअस कलेक्टिव्ह‘ लाँच
~ उज्ज्वल भविष्याला प्रेरित करण्यासाठी, त्यामध्ये नाविन्यता आणण्यासाठी आणि नवीन आकार देण्यासाठी ३० हून अधिक सर्जनशील दूरदर्शींच्या मार्गदर्शनांतर्गत डिझाइन व शाश्वततेचे सुरेख संयोजन ~
मुंबई, १२ ऑक्टोबर २०२३: गोदरेज अॅण्ड बॉईस या व्यवसायामधील शाश्वत पद्धतींना चालना देणाऱ्या अग्रणी कंपनीने नवीन व्यासपीठ ‘कॉन्शिअस कलेक्टिव्ह’च्या लाँचची घोषणा केली. या व्यासपीठाचा बेडरूम व घरांमध्ये शाश्वततेला चालना देण्याचा मनसुबा आहे, जेथे डिझायनर्स, आर्किटेक्ट्स व इतर व्यावसायिकांच्या समुदायांना जागरूक भविष्य निर्माण होण्याची आशा आहे.
कॉन्शिअस कलेक्टिव्ह हा गोदरेज अॅण्ड बॉईसद्वारे नेतृत्वित दीर्घकालीन उपक्रम आहे. या उपक्रमाचा डिझाइन-नेतृत्वित नाविन्यतेच्या नवीन युगाला चालना देण्याचा मनसुबा आहे, जेथे शाश्वत बिल्ट स्पेसेस, साहित्यांचा जागरूकपणे वापर आणि पर्यावरणाचे संरक्षण यावर प्रबळ फोकस आहे.
कॉन्शिअस कलेक्टिव्ह व्यासपीठाला वार्षिक तीन-दिवसीय इव्हेण्टसह डिसेंबरमध्ये सुरूवात होईल. या इव्हेण्टमध्ये अधिक शाश्वत भविष्याला नवीन आकार देण्यामध्ये अग्रणी असलेल्या आणि भावी पिढ्यांसाठी आरोग्यदायी, हरित व अधिक शाश्वत विश्व निर्माण करण्याप्रती अॅम्बेसेडर्स म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तींना व यशाला प्रशंसित करेल.
यामध्ये प्रशंसित विचारवंतांचे वार्षिक प्रदर्शन आणि अवलंब करता येऊ शकतील अशा जबाबदार निवडींवरील फेलोशिप प्रोग्राम व वार्षिक अहवालाच्या माध्यमातून क्षेत्रामधील तरूण व्यावसायिकांद्वारे संकल्पनांना चालना देण्याप्रती त्यांच्या कार्यांना दाखवण्यात येईल. कॉन्शिअस कलेक्टिव्ह उज्ज्वल भविष्याला आकार देण्याप्रती कटिबद्ध आहे.
”झपाट्याने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेसह भारत शाश्वत राहणीमानाला गती देण्यासाठी नाविन्यपूर्ण डिझाइन-संचालित सोल्यूशन्सवर देखरेख ठेवत जगासाठी उदाहरण स्थापित करू शकतो. आता आपण सर्वांनी येणाऱ्या हवामान संकटाचे निराकरण करण्यासाठी अर्थपूर्ण व अधिक शाश्वत कृतीच्या दिशेने सहयोगात्मक समूह म्हणून एकत्र काम करणे महत्त्वाचे आहे,” असे गोदरेज अॅण्ड बॉईसचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. जमशेद गोदरेज म्हणाले.
गोदरेज अॅण्ड बॉईस विकास व संवर्धन परस्पररित्या संलग्न असण्याची गरज नसल्याचे दाखवत व्यवसाय कार्यसंचालनांमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा (एसडीजी) समावेश करण्याचे नेतृत्व करत आहे. पृथ्वीसाठी उत्तम असलेल्या उत्पादनांचे प्रमाण वाढवत, तसेच चक्रिय असलेल्या प्रकिया वाढवत जागरूकपणे संतुलन राखता येऊ शकते, जेथे प्रत्येक पावलावर कचरा कमी करण्याचा, सहयोगी व पुरवठादारांची इकोसिस्टम तयार करण्याचा मनसुबा आहे, जे या प्राधान्यक्रमांसह कार्य करू शकतात आणि दशकानुदशके उदरनिर्वाह व खारफुटी सारख्या ब्ल्यू कार्बन सिस्टम्सचे संरक्षण करू शकतात.
गोदरेज अॅण्ड बॉईसच्या कार्यकारी संचालक नायरिका होळकर म्हणाल्या, ”आमचा शतकापासून प्रगतीमध्ये अग्रणी राहण्याचा मनसुबा आहे आणि सध्या आमच्या प्रगतीमधून मुलभूत व्यवसायामध्ये शाश्वततेचा समावेश करत हवामान बदलाचा कशाप्रकारे सामना करता येऊ शकतो याचे उत्तर मिळेल. निव्वळ शून्य उत्सर्जन संपादित करण्याची शक्यता २ टक्के नाही तर ९८ टक्के आहे. आम्ही व्यावसायिक व तज्ञांना एकत्र आणत सुरू असलेल्या संवादांना चालना देण्याची आशा करतो, ज्यामुळे आपल्या मुलांसाठी अधिक जागरूक भविष्याला आकार देण्याच्या नवीन शक्यता समोर येतील.”
कॉन्शिअस कलेक्टिव्ह हे सर्वोत्तम अनुभव देणारे व्यासपीठ आहे, ज्यामध्ये संकल्पनात्मक स्पेसेसचे सर्वोत्तम इन्स्टॉलेशन्स, साहित्यावर विचारशील प्रदर्शन, विशेष कीनोर्टस् आणि तज्ञांसोबत चर्चा, तसेच ३ दिवसांमध्ये आयोजित केले जाणाऱ्या परस्परसंवादात्मक कार्यशाळांचा समावेश आहे. डिसेंबर २०२३ मध्ये मुंबई आयोजित केला जाणारा इव्हेण्ट जागरूक राहणीमानाप्रती प्रवासाला गती देण्याची खात्री देतो. व्यावसायिक, सामान्य माणसापासून मुलांपर्यंत या व्यासपीठांवर सर्वांना प्रेरित करण्यात येईल.
कॉन्शिअस कलेक्टिव्हची खासियत म्हणजे आर्किटेक्चर, इंटीरिअर डिझाइन, संशोधन, कला व डिझाइनमधील प्रमुख व्यावसायिक व प्रमुखांसोबत, तसेच शाश्वत राहणीमान पद्धतींना प्रमोट करण्याच्या इव्हेण्टच्या मुलभूत मिशनला चालना देण्यामध्ये साह्य करणारे उद्योग प्रभावकांसोबत धोरणात्मक सहयोग. प्रशंसित विचारवंत आहेत राहुल मेहरोत्रा, अनुपमा कुंडू, वृंदा सोमाया, कृतिका अग्रवाल, मंगेश लुंगारे, माधव पै, कार्तिक गणेशन, लिजा गोल्डबर्ग, मनोज कुमार आणि इतर अनेक. इव्हेण्टमध्ये फूल, कार्बन क्राफ्ट, अनुवाद यांसारखे कॉन्शिअस ब्रॅण्ड्स देखील आहेत. प्रोग्राम व सहयोगींबाबत अधिक माहितीसाठी साइटला (https://consciouscollective.in/) भेट द्या. आजच नोंदणी करा
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- डॉ. मारुती पवार यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान – भारताच्या ‘स्टील व्हिजनरी’च्या प्रेरणादायी वाटचालीला सलाम
- गोदरेज फाउंडेशनतर्फे ‘ग्लोबल अॅक्सेस टू टॅलेंट फ्रॉम इंडिया (GATI) फाउंडेशन’चे सहसादरीकरण
- स्मार्ट होम कॅमेऱ्यांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो – गोदरेज सर्वेक्षण
- बास्किन रॉबिन्सने क्विक कॉमर्स व स्नॅकिंग ट्रेंडसाठी रिटेल विस्तार केला
- विचार ते अंमलबजावणी: डॉ. अमित बागवे घडवत आहेत महाराष्ट्र उद्योगजगतात क्रांती