होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
होळीचा सण म्हणजे रंग, उत्साह आणि आनंदाचा सोहळा असतो. हा सोहळा साजरा करताना अनेकदा आपल्या केसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. होळीचा आनंद लुटल्यानंतर केस निस्तेज होतात. केसांमध्ये कोरडेपणा जाणवतो. बरेचदा केसांचा पोतही बिघडतो. रंगांमधील रसायनांमुळे केसांतील नैसर्गिक ओलावा निघून जातो. केस निर्जीव झाल्यासारखे दिसू लागतात. होळीनंतर केसांचे आरोग्य जपण्यासाठी त्यांची निगा राखणे आवश्यक आहे. जेणेकरुन केसांचे सौंदर्य पुन्हा बहरेल.
बरेचदा होळीच्या रंगांमध्ये घातक रसायनांचा समावेश केला जातो. केसांमधील ओलावा पूर्णपणे निघून जातो. सण साजरा करण्यापूर्वी आणि सण साजरा केल्यानंतरही आवश्यक काळजी केल्यास केसांमधील मऊपणा आणि चमक कायम राहते. त्याकरिता केसांना योग्य पोषण द्यायला हवे. होळी साजरी झाल्यानंतर सौम्य उत्पादनांचा वापर करुन केसांचे आरोग्य जपायला हवे. केसांचे सौंदर्य अभाधित राहावे, त्यातील मुलायमपणा टिकून राहावा याकरिता गोदरेज प्रोफेशनलचे नॅशनल टॅक्निकल हेड शैलेश मुल्या यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
होळी खेळण्यापूर्वी काळजी घ्या: केसांचे संरक्षण कवच तयार करा
· केसांना लिव्ह इन ऑइल लावा: होळी खेळण्यापूर्वी केसांना लिव्ह इन ऑइल लावा. हे ऑइल लावल्याने केसांचे रासायनिक रंगापासून संरक्षण करण्यासाठी कवच तयार होते. याकरिता केराकेअर मॅकॅडॅमिया ऑइल वापरणे फायदेशीर ठरते. हे तेल केसांना मुलायम आणि चमकदार बनवते. रंगांमुळे होणारा कोरडेपणा टाळण्यासाठी आणि केसांचा नैसर्गिक पोत टिकवून ठेवण्यासाठी ही सोपी आणि प्रभावी पद्धत ठरते.
· रंगांपासून वाचवणारी केशरचना करा: केस मोकळे सोडू नका. घट्ट वेणी किंवा आंबाडा बांधा. केस बांधल्यामुळे गुंता होत नाही. केसांचे संरक्षण होते.
· स्कार्फ किंवा रुमाल बाँधा: रंगापासून संरक्षण करण्यासाठी स्कार्फ, टोपी किंवा रुमाल बांधावा. यामुळे केसांचा रंगांशी थेट संपर्क येत नाही. परिणामी, केसांचे घातक रंगांपासून ब-यापैकी संरक्षण होते.
होळी खेळल्यानंतर काय काळजी घ्याल:
· थंड पाण्याने केस धुवा: होळी खेळ्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. यामुळे केसांमधील रसायने सहज निघून जातात.
केस ड्रायरने सुकवू नका : होळीनंतर हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनचा वापर करु नका. केस नैसर्गिकरितीने सुकवा.
· सौम्य शॅम्पूचा वापर करा: केस धुण्यासाठी सौम्य शॅम्पूचा वापर करा. यामुळे केसांमध्ये मुलायमपणा टिकून राहण्यास मदत होते.
केसांना हेअर मास्क लावा: केसांना पोषण देण्यासाठी हेअर मास्क लावा. मधाचे घटक असलेले मास्क लावा आणि टाळूच्या आरोग्यासाठी हे मास्क लावणे फायदेशीर ठरते.
होळीचा सण हा आनंद साजरा करण्याचा हक्काचा सण मानला जातो. सण साजरा करताना रंगांचे नुकसान होता कामा नये. केस निरोगी, मलायम आणि चमकदार दिसण्यासाठी गोदरेज प्रोफेशनचे तज्ज्ञ शैलेश मुल्या यांनी दिलेल्या खास टिप्स नक्की फॉलो करा.



