गोदरेज लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टीम्सची आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत २५०० कोटी रुपयांच्या महसुलाची आकांक्षा
गोदरेज लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टीम्सची आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत २५०० कोटी रुपयांच्या महसुलाची आकांक्षा
• पुढील पाच वर्षांत दुप्पट वाढ करण्याचे उद्दिष्ट
• आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टम्स क्षेत्रात न्यू-लिफ्ट बेड फिटिंग्ज आणि HIKIDO वॉर्डरोब फिटिंग्ज सादर
मुंबई २३ ऑगस्ट २०२२: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज आणि बॉयसची व्यवसाय शाखा प्रतिष्ठित ब्रँड गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्स (GLAFS)लाही या वर्षी १२५ वर्षे पूर्ण झाली. गोदरेज ब्रँडने (कुलूप) लॉकसह प्रवास सुरू केला आणि आज तो वारसा तंत्रज्ञान आणि डिझाइनमधील नवकल्पनांकडे लक्ष केंद्रित करून आणि गुंतवणूकीसह पुढे नेला जात आहे.
उत्पादनाच्या नाविन्यपूर्णतेमध्ये अग्रणी गोदरेज लॉक २०० हून अधिक उत्पादनांसह भारतीय बाजारपेठेत सेवा देत आहे. लॉकिंग उपकरणाच्या मूलभूत संकल्पनेत क्रांती घडवून आणण्यात ब्रँड आघाडीवर आहे आणि आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत २५०० कोटी रुपये अशी पाच वर्षांत दुप्पट वाढ करण्याची योजना आखत आहे. कंपनीचा सध्याचा व्यवसाय महसूल ९०० कोटी आहे आणि २०२३ च्या आर्थिक वर्षासाठी १००० कोटी महसुलाचा अंदाज आहे. डिजिटल लॉकच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे, ब्रँड नजीकच्या वाढीसाठी सज्ज आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी ब्रँडने डिजिटल डोअर लॉक्सची ‘कॅटस’ श्रेणी देखील सादर केली जी केवळ तांत्रिकदृष्ट्या उच्च आहेत असे नाही तर किंमतीच्या दृष्टीनेही उत्तम मूल्य देतात. महसूल वाढीला आणखी पाठबळ देण्यासाठी, ब्रँड बाजाराच्या विस्तारामध्ये गुंतवणूक करेल, बाजारपेठेतील स्थान आणखी वाढवेल आणि ब्रँडच्या जाहिरातीवर देखील लक्ष केंद्रित करेल.
येत्या तीन वर्षांत आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टीम उद्योगातील पहिल्या तीन ब्रँडमध्ये स्थान मिळवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. आर्किटेक्चरल फिटिंगची श्रेणी ही १०,००० ते १२,००० कोटी रुपयांची बाजारपेठ आहे. कंपनी आता आर्किटेक्चरल फिटिंग क्षेत्रामध्ये आपली निवड वाढविण्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि भारतीय घरांसाठी तयार केलेल्या प्रगत डिझाइन उपयांसह आर्थिक वर्ष २३ मध्ये ४०० कोटी रुपयांचा महसूल पार करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. GLAFS ने न्यू-लिफ्ट बेड फिटिंग्ज आणि HIKIDO वॉर्डरोब फिटिंग्ज देखील सादर केल्या आहेत, ज्यात भविष्यातील डिझाइन आणि सानुकूल उपाय सुविधा आहेत. याव्यतिरिक्त, ब्रँड भारतीय घरांसाठी ड्रॉवर्स, कॉर्नर सोल्यूशन्स, अंडर-सिंक सोल्यूशन्स आणि धान्य साठवण यांची अत्याधुनिक श्रेणी स्मार्ट किचन ड्रॉवर्स अँड ऑर्गनायझर्स (SKIDO) देखील सादर करत आहे.
भारतातील आक्रमक विकास योजनेवर भाष्य करताना गोदरेज लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सचे व्यवसाय प्रमुख श्री. श्याम मोटवानी म्हणाले, “गोदरेज लॉक्स या प्रतिष्ठित ब्रँडने ग्राहकांचे समाधान वाढविण्यावर सातत्याने भर दिला आहे. त्यामुळे बाजारपेठेचा विस्तार करण्यासाठी नेहमीच संधी निर्माण झाली आहे. आमच्या १२५ व्या वर्षी आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आम्ही केवळ आमच्या डिजिटल लॉक व्यवसायाचा विस्तार करण्याची योजनाच आखली आहे असे नाही तर आम्ही आमचा आर्किटेक्चरल फिटिंग्ज विभागही वाढवत आहोत. आधुनिक डिझाइन आणि तंत्रज्ञान आमच्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात आणि सर्व श्रेणींमध्ये तिथेच आम्ही आमचे लक्ष केंद्रित करणार आहोत. आम्ही आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टम्स व्यवसायात ४०० कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २३ मध्ये १००० कोटी च्या एकूण कमाईची योजना आखत आहोत. पुढील ५ वर्षांमध्ये दुप्पट वाढ करण्याची योजना आहे.”
आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनर्स (एआयडी) समुदायाचे हित जपत ब्रँड या बाजारपेठेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. GLAFS ने संपूर्ण भारतातील AID समुदायासाठी ‘गोदरेज व्हॅल्यू को-क्रिएटर्स क्लब’ (GVCC) अशा प्रकारच्या पहिल्याच असलेल्या उपक्रमाची घोषणा केली.
गोदरेज लॉक्स सध्या आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि मध्य पूर्वेतील 24 देशांमध्ये निर्यात करते. कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात लॉकिंग सोल्यूशन्स प्रदान करते. कंपनीला परदेशातील बाजारपेठेतून तिचा हिस्सा वाढण्याची अपेक्षा असून बाजारपेठेमधील आर्किटेक्चरल हार्डवेअर आणि किचन सिस्टीम विभागात प्रवेश करण्याची योजना आहे.
About Godrej Locks & Architectural Fittings and Systems:
Godrej Locks & Architectural Fittings and Systems is a 125-year-old leading manufacturer of innovative locking devices. Since its inception in 1897 by Ardeshir Godrej, the name ‘Godrej’ has become synonymous with trust, protection and integrity. From the first Anchor branded lock in 1897 to the first ever spring less lock in 1907, to the iconic ‘Nav-Tal’ in 1954, and to the postmodern biometric locks, Godrej has set every benchmark in the locks industry. Over the years, Godrej Locks &Architectural Hardware and Fittings have changed in form, function and scope of application. But one thing still remains the same – the solid stamp of trust and reliability. Godrej Locks & Architectural Fittings and Systems adhere to global quality norms and hold ISO 9001, ISO 14001 and OHSAS 18001 certifications.
Beyond Locking Solutions, the brand also caters to Architectural Fittings and Systems, creating innovative, premium, comprehensive hardware solutions. The range which consists of door, furniture and glass fittings has been designed to fit perfectly into today’s hi-tech residential and commercial establishments. Most products cater to needs for safety, privacy, fire & smoke checks and energy saving with ease. These devices meet international quality standards like UL Rating, EN Rating, CE Certification and fire-rated.
The Kitchen Fittings by Godrej Locks & Architectural Fittings and Systems includes SKIDO, i.e. Smart Kitchen Drawers & Organisers – an innovative range of smart kitchen storage solutions, designed in India to meet the unique requirements of the Indian kitchen. The Godrej Cartini range of knives- showcase cutting-edge design, a fine quality blade and the highest level of durability. These premium kitchen and hobby equipment range are also made in India, to suit home and professional needs. The brand has come a long way in delivering world-class smart locking solutions. For more information, please log on to https://www.godrej.com/godrej-locking-solutions-and-systems.
Godrej Locks is a business unit of Godrej & Boyce Mfg. Co. Ltd
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi