पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना मानद डॉक्टरेट

पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना मानद डॉक्टरेट

श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ‘मानद डॉक्टरेट’ (डी.लिट.) पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांची उद्योगक्षेत्रातील भरीव कामगिरी आणि ते करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत गेल्याच महिन्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना सन्माननीय डी.लिट. (विद्यानिधी) पदवी प्रदान करण्यात आली. एका मराठी उद्योजकाला मिळालेला हा बहुमान समस्त मराठी जनांसाठी गौरवास्पद आहे.

मानद डॉक्टरेट:
रवींद्र प्रभुदेसाई यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून ‘विद्यानिधी’ (D.Litt.) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे.

Doctorate to Ravindra Prabhudessai
Doctorate to Ravindra Prabhudessai

सत्कार सोहळा: या मानद पदवीच्या निमित्ताने नागरी अभिवादन सत्कार समिती, ठाणे यांच्या वतीने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जिथे त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, डॉ. सच्चिदानंद शेवडे, श्रीकृष्ण चितळे – पार्टनर , चितळे बंधू, मा.संजय केळकर – आमदार ठाणे शहर, मा.निरंजन डावखरे – आमदार कोकण पदवीधर मतदारसंघ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !

Dr Ravindra Prabhudesai
Dr Ravindra Prabhudesai

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *