CEAMA ने केली आपल्या ४३ व्या वार्षिक कार्यक्रमाची सांगता I
CEAMA ने केली आपल्या ४३ व्या वार्षिक कार्यक्रमाची सांगता
~ ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असलेला भारतीय ACE उद्योग’ या सूत्रावरील CEAMA च्या वार्षिक सोहळ्यात राष्ट्राच्या उभारणीत ACE उद्योगाच्या वर्धित भूमिकेवर चर्चा करण्यात आली~
दिल्ली, १७ नोव्हेंबर २०२२: उपकरणे आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स (अप्लायन्सेस अँड कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ACE) उद्योगाची शिखर उद्योग संस्था असलेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (CEAMA) च्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असलेला भारतीय ACE उद्योग’ या सूत्रावर आधारित ४३ व्या वार्षिक कार्यक्रमाचा समारोप झाला.
माननीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पीयूष गोयल यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. २०० हून अधिक धोरणकर्ते आणि प्रभावी व्यक्ती या वार्षिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. CEAMA चे अध्यक्ष श्री. एरिक ब्रागांझा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
भारतातील ई-कचरा व्यवस्थापन सुधारण्याच्या उद्देशाने ‘टूवर्डस अ सस्टेनेबल CEEW व्हॅल्यू चेन – मॅपिंग आणि प्लगिंग लीकेज’ या शीर्षकाच्या Deutsche Gesellschaft für Internationale Zusammenarbeit (GIZ) GmbH च्या सहकार्याने CEAMA च्या अहवालाचे श्री पीयूष गोयल यांनी अनावरण केले. ई-कचऱ्याची गळती बंद करण्यासाठी शिफारशी ओळखणे आणि सुचवणे हे या अभ्यासाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अधिक चांगल्या चक्राकार अर्थव्यवस्था उभारणीत योगदान देत पुर्ननिर्माण केलेल्या साहित्याची पुनर्प्राप्ती करण्यात सुधारणा व्हायला मदत होईल. एका विस्तृत घरगुती सर्वेक्षणातील महत्त्वाच्या निरिक्षणातून असे दिसून आले की सरासरी ६५% प्रतिसादकर्त्यांना ई-कचऱ्याची माहिती आहे परंतु केवळ ३४% लोकांना त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट कशी लावायची याची माहिती आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमध्ये आश्वासक भागीदारी आवश्यक आहे. वाढीसाठी आणि स्पर्धात्मक सक्षम बनण्यासाठी उद्योगाकरता स्वयंपूर्ण उत्पादन पर्यावरण प्रणाली स्थापित करणे महत्वाचे आहे.
या कार्यक्रमात भारताच्या अप्लायन्स अँड कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स (ACE) उद्योगासमोरील आव्हाने आणि संधी आणि भारतीय ACE उद्योगातील भरभराटीला मदत करणाऱ्या असंख्य संधींवर प्रकाश टाकण्यात आला. आज, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ACE बाजारपेठांपैकी एक आहे. बर्याच उत्पादन श्रेणींमध्ये कमी प्रवेश पातळीसह, मोठ्या आणि लहान उपकरणांचा आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सचा समावेश असलेला उद्योग पुढील ३ वर्षांत २०२५ पर्यंत १.४८ लाख कोटींपर्यंत त्याचे मूल्य दुप्पट करेल असा अंदाज आहे.
त्यात पुढे ACs मधील PLI योजना यांसारख्या उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला. त्यांनी उत्पादनातील वाढीला पाठबळ दिले असून ग्राहक इलेक्ट्रॉनिक्समधील एफडीआय २०२१ मधील १९८ दशलक्ष अमेरिकन डॉलरवरून २२ जूनपर्यंत ४८१ दशलक्ष अमेरिकन डॉलरपर्यंत जवळपास दुप्पट झाली आहे.
कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना माननीय केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री श्री. पीयूष गोयल म्हणाले, “१.४ अब्ज लोकसंख्या असलेला भारत आज जगात असलेली सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देतो. जगातील विकसित देश आता भारतासोबत मुक्त व्यापार करार किंवा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करण्यास उत्सुक आहेत. यूके, कॅनडा, युरोपियन यूनियन, इस्रायल बरोबर FTA वाटाघाटी सुरू आहेत आणि आणखी एक महत्त्वाचा FTA पुढील आठवड्यात (GCC सह) सादर केला जाईल. विकसित राष्ट्रांशी व्यवहार करताना समान तत्त्वावर वाटाघाटी करताना धाडसी नेतृत्व केल्याबद्दल मी उद्योगक्षेत्राचे कौतुक करतो. यावरून सर्वोत्कृष्ट गोष्टींशी स्पर्धा करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर उद्योगाची खात्री असण्याचे धैर्य दिसून येते.”
ते पुढे म्हणाले, “सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण संरचनात्मक बदल केले आहेत आणि त्यायोगे व्यवसायात सुलभता, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स रँकिंगमध्ये सुधारणा, उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजना यांसारख्या योजनांचे यश लाभले आहे. मोबाइल उद्योगात दोन उत्पादकांपासून जवळजवळ २०० उत्पादकांपर्यंत झालेली लक्षणीय वाढ हे या यशाचे जितेजागते उदाहरण आहे.”
भारत हा ‘स्मार्ट’ देश आहे. यातील एस चा मुख्य आधार म्हणजे शाश्वतता. शाश्वतता वा टिकाऊपणा हे ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचे वैशिष्ट्य असले पाहिजे. ‘एम’ म्हणजे भारताच्या उत्पादन क्षमता, ‘ए’ म्हणजे आत्मनिर्भर भारत. आपण भारतातील घटक परिसंस्थेला आत्मनिर्भर ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आधार बनण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ‘आर’ म्हणजे रेटिंग. उद्योगाने स्वयं-नियमन तत्त्वांवर मेड इन इंडिया लेबलसह गुणवत्ता रेटिंग मिळवण्याचा विचार केला पाहिजे. ‘टी’ म्हणजे तंत्रज्ञान. ते आमच्या उद्योगाचे यश ठरवेल. हा उद्योग खऱ्या अर्थाने नवीन समृद्ध भारताचा ध्वजवाहक बनेल. तो भारतात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला नोकरीच्या संधी देईल आणि भारतात जागतिक दर्जाची उत्पादने तयार करेल.
CEAMA चे अध्यक्ष श्री एरिक ब्रागांझा म्हणाले, ” CEAMA नेहमीच सरकारी उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि ई-कचरा त्यापैकी एक आहे. ई-कचरा हे जागतिक आव्हान आहे आणि या समस्येला एकत्रितपणे हाताळणे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ACE उद्योगाबद्दल बोलताना, आमचा असा विश्वास आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ शक्य आहे. आपण सर्वानीच अलीकडे जागतिक महामारीचा सामना केला आणि या काळातही भारतीय ACE उद्योगाने सर्व अडथळ्यांना न जुमानता लक्षणीय वाढ अनुभवली. या क्षेत्रामध्ये आर्थिक वाढीचे इंजिन बनण्याची आणि रोजगाराच्या भरीव संधी निर्माण करण्याची क्षमता आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आम्ही इतर उत्पादन श्रेणींमध्ये अधिक PLI योजनांची अपेक्षा करतो. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतातील घटक उत्पादनाचा पाया मजबूत होईल आणि त्यातून ‘आत्मनिर्भर भारत’ ला चालना मिळेल.
“आम्ही एक उद्योग म्हणून, हे क्षेत्र निर्माण करू शकणार्या परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास उत्सुक आहोत. त्यासाठी बहुआयामी दृष्टीकोन आवश्यक आहे. उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या विकासाला कशी गती मिळू शकते आणि या क्षेत्राला आणि खरे तर देशाला शाश्वत वाढीतून मिळणारे फायदे कसे मिळू शकतात यावर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आजचा वार्षिक कार्यक्रम हे एक योग्य व्यासपीठ आहे. सरकारशी जवळून संवाद साधून, आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या आपल्या पंतप्रधानांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण एकत्र काम करू या. आपल्या उद्योगाला पर्यायी उत्पादन केंद्र आणि जगासाठी एक प्रमुख निर्यात स्थळ म्हणून बदल घडवू यात,” असेही ते पुढे म्हणाले.
ACE उद्योगाच्या ४३ वर्षांच्या वाटचालीबद्दल CEAMA ने भारतीय ACE उद्योगातील सदस्यांचा त्यांच्या योगदानाबद्दल सत्कारही केला. बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनुज पोद्दार यांना ‘मॅन ऑफ स्मॉल अप्लायन्सेस पुरस्कार’ आणि डिक्सन टेक्नॉलॉजीजचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अतुल बी लाल यांना ‘मॅन ऑफ कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स OEM पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
आपले विचार व्यक्त करताना CEAMA चे सरचिटणीस श्री. रविशंकर चौधरी म्हणाले, “भारतीय ग्राहक हळूहळू ई-कचऱ्याबद्दल अधिक जागरूक होत आहेत, परंतु त्याची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल त्यांना फारशी माहिती नाही. अनौपचारिक क्षेत्र सध्या ते जिथे आहेत तिथे चांगले काम करत आहे आणि औपचारिक क्षेत्राशी एकत्रितपणे समन्वय साधून काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन आवश्यक आहे. सर्व उद्योगक्षेत्राला एकत्र आणण्यासाठी आणि महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आजच्या कार्यक्रमासारखे व्यासपीठ महत्त्वाचे आहे.”
“ACE उद्योगाने पूर्णपणे वेगळा आयाम घेतला आहे आणि हळूहळू उत्पादनाचे केंद्र बनण्याचे आणि शेवटी एक आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अलीकडील घडामोडींमुळे जागतिक पुरवठा साखळींवर जोरदार परिणाम झाला आहे आणि त्यामुळे मागणी-पुरवठ्याच्या साखळीत मोठ्या प्रमाणात दरी निर्माण झाली आहे. तथापि, ACE उद्योग अडथळ्यांशी जुळवून घेण्याच्या दिशेने त्याच्या व्यवसाय मॉडेल्समध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असून त्या बदल्यात, देशांतर्गत उत्पादनाला चालना देत आहे,” ते पुढे म्हणाले.
धीरज मुखर्जी, विक्री प्रमुख – भारत, GfK यांचे ‘एसीई उद्योगासाठी सध्याचे आणि भविष्यातील प्रवाह’ या विषयावर ज्ञान सत्र झाले.
यावेळी बोलताना श्री. मुखर्जी म्हणाले, “ग्राहक तंत्रज्ञान आणि ड्युरेबल्स बाजारपेठेचा दृष्टीकोन सकारात्मक राहण्याची शक्यता असली तरी महागाई आणि भौगोलिक-राजकीय अशांतता यामुळे आपल्याला घरगुती बजेट आवळण्याची शक्यता भासू शकते. GfK मार्केट इंटेलिजेंस POS रिटेल ट्रॅकिंगनुसार, या वर्षात एकूण ग्राहक तंत्रज्ञान आणि टिकाऊ वस्तूंच्या श्रेणीमध्ये प्रीमियम विभागाच्या १०% CAGR मूल्य वाढीसह, प्रीमियमीकरणाचा (सर्वोत्तम वैशिष्ट्य यावर भर देत ग्राहकांना ब्रॅंड अपील करणे) प्रवाह सुरू राहण्याची अपेक्षा आहे. साथीच्या रोगावरील निर्बंध शिथिल केले जात आहेत परंतु डिजिटायझेशन आणि स्मार्ट घरे ही निवडक श्रेणींसाठी एक संधी आहे.”
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi