लघु व मध्यम उद्योगांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर व BSE SME यांच्यात सामंजस्य करार I

लघु व मध्यम उद्योगांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर व BSE SME यांच्यात सामंजस्य करार

जागतिक लघु उद्योजक दिन अर्थात SME DAY उत्साहात साजरा

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या आंतरराष्ट्रीय परिषद सभागृहात ललित गांधी यांचे भाषण

महाराष्ट्रातील लघु उद्योगांना शेअर मार्केटमधून भागभांडवल उभारून देणार – ललित गांधी

मुंबई – लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचा देशाच्या सकल उत्पादनात 22 टक्क्याहुन अधिक वाटा असुन हे क्षेत्र सक्षम करण्यासाठी लघु व मध्यम उद्योगांची बीएसई-एसएमई च्या माध्यमातुन शेअर बाजारातुन भाग भांडवल उभारूण देणार असल्याची माहीती ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग‘ीकल्चर’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) च्या एसएमई व स्टार्टअप विभागातर्फे जागतिक लघु उद्योग दिनानिमित्त बीएसई इंटरनॅशनल कन्वेन्शन हॉल, फोर्ट, मुंबई येथे आयोजित विशेष समारंभात भाषण करताना त्यांनी ही माहिती दिली.
बीएसई चे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहाण, मुख्य वित्त अधिकारी नयन मेहता, बीएसई-एसएमई चे प्रमुख अजय ठाकुर, सहप्रमुख आनंद चारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या समारंभात लघु व मध्यम उद्योगांना भांडवल उभारणीसाठी बीएसई – एसएमई तर्फे उपलब्ध सुविधा व या संकल्पनेची व्याप्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्रातील व्यापार-उद्योग व कृषि उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग‘ीक्लचर व बीएसई मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र चेंबरच्या वतीने अध्यक्ष ललित गांधी व बीएसई तर्फे एसएमई विभागाचे प्रमुख अजय ठाकुर यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या कार्यकारी संचालक आशिष चौहाण यांच्या उपस्थितीत सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले.
ललित गांधी यांनी आपल्या भाषणात बीएसई तर्फे लघु व मध्यम उद्योगांना गेलया दहा वर्षात 4000 कोटी रूपयांचे भांडवल शेअर बाजारातुन उपलब्ध करून दिल्याबद्दल बीएसई चे अभिनंदन केले व चालु वर्ष अखेरीस 100 नवीन लघु व मध्यम उद्योगांना एसएमई शेअर मार्केट मध्ये सहभागी करून 1000 कोटी रूपयांचे भांडवल या उद्योगांना उपलब्ध करून देऊ अशी घोषणा केली. तसेच महाराष्ट्र चेंबर स्वातंत्र्यपूर्व काळापासून व्यापार-उद्योगांच्या विकासासाठी कार्य करत असून राज्य, देश व जागतिकस्तरावर राज्यातील व्यापार उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र चेंबरने महत्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले. व्यापार उद्योगांच्या अडीअडचणी सोडविणे, व्यापार उद्योगांना सक्षम करणे हे चेंबरचे उद्धिष्ट असून राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र चेंबरने आपले धोरण तयार केले आहे. २०२७ पर्यंत राज्यातील ३६ जिल्ह्यात कृषी क्लस्टर , महिला क्लस्टर व उत्पादन आधारित क्लस्टरची निर्मिती राज्य सरकार व केंद्र सरकारच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. क्लस्टर निर्मितीमुळे स्थानिक व्यापार उद्योगांना व नवउद्योजकांना चालना मिळणार असल्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी यांच्या स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जात असल्याचे सांगितले.
या सामंजस्य करारामुळे राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना भांडवली बाजारात नोंदणी करण्यास आणि सार्वजनिक बाजारातून भांडवल उभारण्यास मदत होईल. नोंदणीकृत उद्योगांना बीएसई एसएमइ प्लॅटफॉर्ममध्ये सूचीबद्ध होण्यासाठी मदत होईल. तसेच एसएमइनी भांडवल बाजारात नोंदणी केल्यावर त्यांना भांडवल उभारण्यास मदत होऊन त्यांची आर्थिक गरज पूर्ण होईल. एसएमइनी बीएसई एसएमइ प्लॅटफॉर्ममध्ये सूचीबद्ध होऊन फायदा घ्यावा व येत्या वर्षभरात १०० एसएमइ बीएसई एसएमइ प्लॅटफॉर्ममध्ये सूचीबद्ध होतील असे आश्वासन अध्यक्ष ललित गांधी यांनी दिले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग‘ीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी यांचा बीएसई तर्फे अजय ठाकुर यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
बीएसई एसएमइचे प्रमुख अजय ठाकूर यांनी महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना बीएसई एसएमइ एक्सचेंजवर सूचीबद्ध होण्याचे एसएमइचे फायदे आणि इक्विटी भांडवल वाढविण्याबाबतचे ज्ञान आणि जागृकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र चेंबरच्या मदतीने महाराष्ट्रातील एसएमइपर्यंत बीएसई एसएमइ एक्सचेंजचे फायदे पोचविणे व त्यांना बीएसइ एसएमइ प्लॅटफॉर्मवर सूचिबद्ध होण्यासाठी मदत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तसेच बीएसइ लिमिटेड आणि महाराष्ट्र चेंबरमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्यभरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मदत होणार आहे. आशिष चौहाण यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राज्यातील प्रमुख उद्योजक, बँकर्स यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करूनाकर शेट्टी, कार्यकारणी सदस्य निलेश घरात, मनीष पाटील, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते

BSE SME & MACCIA MOU
BSE SME & MACCIA MOU
Avadhut sathe
Avadhut sathe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *