Breaking News – सेबीने अंबांनी कुटुंबियांना ठोठावला २५ कोटींचा दंड I Sebi Fined Amani’s I
सेबीने अंबांनी कुटुंबियांना ठोठावला २५ कोटींचा दंड I
सेबीच्या कलम ११ (१) चे उल्लंघन
मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी यांच्यासह आणखी १५ सदस्यांना सेबीने जवळपास २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या समभाग वाटपात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्यासह अंबानी कुटुंबातील १५ सदस्यांवर सेबीने कारवाई केली आहे.
१९९४ साली विकण्यात आलेल्या सहा कोटी अपरिवर्तनीय रोख्यांच्या बदल्यात जानेवारी २००० साली रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर देण्यात आले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे १२ कोटी शेअर प्रत्येकी ७५ रुपयांप्रमाणे ३८ जणांना वाटप करण्यात आले.
जानेवारी २००० मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या १२ कोटी शेअर्सचे अंबानी कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटप करण्यात आले. यावेळी सेबीच्या कलम ११ (१) चे उल्लंघन केल्याचे निदर्शनात आले आहे.
सेबीच्या नियमानुसार प्रवर्तकांना शेअर वाटपाची ५ टक्के मर्यादा असताना प्रत्यक्षात रिलायन्स प्रवर्तकांनी ६.८३ शेअरचे अधिग्रहण केले. ‘सेबी कायदा १९९२ च्या कलम १५ एच’नुसार हा गुन्हा दंडासाठी पात्र आहे.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R