Breaking News – ‘सिन्थॉल’च्या प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना ‘रॉयल एनफील्ड बाइक जिंकण्याची संधी

‘सिन्थॉल सोप’तर्फे ‘सिन्थॉल ऑसम रिवॉर्ड्स’ उपक्रम

‘सिन्थॉल’च्या प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना ‘रॉयल एनफील्ड बाइक जिंकण्याची संधी

शंभर विजेत्यांना दर आठवड्याला ‘वाईल्डक्राफ्ट बॅग’ मिळवण्याचीही संधी!

मुंबई, 17 मार्च : ‘गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’चा ‘लेगसी ब्रँड’ असलेल्या ‘सिन्थॉल’तर्फे, ‘सिन्थॉल लाईम’ आणि ‘सिन्थॉल कूल’ या दोन साबणांच्या खरेदीतून ग्राहकांना ब्रॅंडशी जोडणारा ‘सिन्थॉल ऑसम रिवॉर्ड्स’ हा एक रोमांचक उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. या ब्रॅंडच्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा आणि त्यांना पुन्हा उत्साही व छान वाटण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा हा उपक्रम एक भाग आहे. ‘सिन्थॉल लाईम’ व ‘सिन्थॉल कूल’ या साबणांची खरेदी केलेल्या व या उपक्रमात विजेते ठरलेल्या ग्राहकांना पुढील 2 महिन्यांत 8 ‘रॉयल एनफिल्ड बाईक्स’ आणि 100 ‘वाईल्डक्राफ्ट’ बॅगा ही बक्षिसे मिळणार आहेत. हा उपक्रम 1 मार्चपासून सुरू झाला आहे आणि 30 एप्रिल 2021 पर्यंत तो चालणार आहे.

या स्पर्धेत कोणीही व्यक्ती पुढीलप्रकारे भाग घेऊ शकते.. जेव्हा एखादा ग्राहक सिन्थॉल साबण खरेदी करील, तेव्हा त्या साबणाच्या पॅकेजमध्ये आतील बाजूस एक कोड नंबर छापलेला त्यास आढळेल. ग्राहकाने हा कोड नंबर 07777062444 या मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पाठविणे आवश्यक आहे. यातील विजेत्यांच्या नावांची घोषणा www.cinnolawesomerewards.com या मायक्रोसाईटवर 17 मार्चपासून प्रत्येक बुधवारी होईल. कोविड साथीच्या दरम्यान लोकांचे मनोबल वाढवणे आणि ग्रीष्म ऋतु सुरू होण्याच्या काळात ‘सिन्थॉल कूल’ आणि ‘लाईम’ या उत्पादनांच्या विक्रीस प्रोत्साहन देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना ‘गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’चे (जीसीपीएल) भारत आणि सार्क या क्षेत्रांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया म्हणाले, “सिन्थॉल हा देशातील सर्वात प्रतिष्ठित ब्रॅण्डपैकी एक आहे आणि ग्राहकांमध्ये या ब्रॅंडविषयी अजूनही ओढ आहे. या ब्रॅंडच्या साबणाने स्नान करून ताजेतवाने होण्याचा अनुभव सर्वांनीच घेतलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, ग्राहकांना आनंदित करणे आणि त्याचवेळी सिन्थॉल साबणांची, विशेषत: ‘लाईम’ व ‘कूल’ या ब्रॅंड्सची विक्री वाढवणे हा आमचा हेतू आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत या साबणांमधून ग्राहकांना ‘लेमनी’ आणि ‘आईसी-कूल’ फ्रेशनेस मिळेल, आणि त्याचबरोबर या उपक्रमामधून त्यांना बक्षीस जिंकण्याचा आनंदही मिळेल.”

ताजेपणाचा अनुभव देणाऱ्या ‘लेमनी डीओ’ सुगंधाने बनविलेला, ‘सिन्थॉल लाईम’ हा उत्साह निर्माण करणारा आहे. त्याच्या वर्धित ‘लाईम फ्रेशनेस’मुळे आपल्या सर्व संवेदना जागृत होऊन स्नानाचा एक विस्मयकारी अनुभव आपल्याला मिळतो. ‘सिन्थॉल कूल’मध्ये बर्फाळ थंड ताजेपणा आणि सक्रिय डीओ सुगंध आहे. त्यामुळे आपल्याला दिवसभर उत्साह वाटत राहतो. यातील अतिरिक्त-थंड मेन्थॉलमुळे आपली त्वचा ताजीतवानी, रसरशीत आणि उन्हाळ्याच्या त्रासापासून मुक्त राहते.

Cinthol Awesome Rewards
Cinthol Awesome Rewards

‘गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट लि.’बद्दल :

गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स ही एक उदयोन्मुख बाजारपेठांतील कंपनी आहे. 123 वर्षांची परंपरा असलेल्या गोदरेज समूहाचा एक भाग असलेल्या या कंपनीला विश्वास, सचोटी आणि इतरांचा आदर या दृढ मूल्यांचा वारसा लाभलेला आहे. या वारशाच्या बळावर आम्ही वेगाने प्रगती करीत आहोत आणि रोमांचक, महत्वाकांक्षी मनोरथ बाळगत आहेत.

सद्यस्थितीस आमचा समूह जगभरात विविध व्यवसायांच्या माधय्मातून 1.15 अब्ज ग्राहकांना सेवा देत आहे. ‘गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स’च्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ‘तिनास तीन’ या धोरणानुसार, आम्ही आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका या तीन उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गृह देखभाल, वैयक्तिक स्वच्छता व केसांची निगा या तीन श्रेणींमध्ये व्यवसाय करीत आहोत. घरगुती कीटकनाशके व केसांची निगा राखणारी उत्पादने यांमध्ये आम्ही विकसनशील बाजारपेठांमध्ये सर्वात मोठे म्हणून गणलो जातो. घरगुती कीटकनाशकांच्या उत्पादनात आम्ही भारतात अग्रणी आहोत, इंडोनेशियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहोत, तर आफ्रिकेत आमचा विस्तार होत आहे. आफ्रिकन वंशाच्या स्त्रियांच्या केसांची निगा राखण्यात आम्ही अव्वल आहोत, तसेच हेअर कलर क्षेत्रात भारत व उप-सहारा आफ्रिकेत अग्रस्थानी आहोत. लॅटिन अमेरिकेतही आमचे नाव मोठे आहे. साबणांच्या क्षेत्रांत आम्ही भारतात दुसर्याा क्रमांकावर आहोत, तर एअर फ्रेशनर्स आणि वेट टिश्शू या उत्पादनांमध्ये आम्ही इंडोनेशियामध्ये अव्वल आहोत.

आमची मजबूत आर्थिक कामगिरी आणि नाविन्यपूर्ण, लोकप्रिय उत्पादने यांच्याव्यतिरिक्त, आम्ही एक चांगली कंपनी म्हणून राहिलो, हे मात्र खूप महत्त्वाचे आहे. आमच्या समुहातील प्रवर्तकांचा सुमारे 23 टक्के हिस्सा हा विश्वस्त संस्थांमध्ये गुंतविण्यात येतो. या संस्था पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षणामध्ये गुंतवणूक करीत असतात. अधिक समावेशक असा हरित भारत निर्माण करण्यासाठी, आपल्या ‘गुड अँड ग्रीन’ पध्दतीच्या माध्यमातून ठसा उमटविण्यासाठी, आमची उत्कटता आणि उद्देश यांचा आम्ही उपयोग करीत आहोत.

या सर्वांच्या अंतर्स्थानी आमचा प्रतिभावान कर्मचारीवर्ग आहे. आमच्या जलद कामांच्या व उच्च क्षमतेच्या कार्यसंस्कृतीतून एक प्रेरणादायी कार्यस्थान निर्माण केल्याचा आम्हाला फार अभिमान वाटतो. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांमधील विविधता ओळखण्यास आणि त्यांचे मूल्यमापन करण्यास मनापासून कटिबद्ध आहोत.

Sarjerao Yadav
Sarjerao Yadav

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *