Breaking News – नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मध्ये करोडो अरबोचे व्यवहार ठप्प !
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मध्ये करोडो अरबोचे व्यवहार ठप्प !
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शेअर खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे बंद पडले आहेत.
जवळपास दोन तासांपासून नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मध्ये व्यवहार स्थगित आहेत. सकाळी ११.४० मिनिटांनी तांत्रिक बिघाड झाला आहे. अद्याप व्यवहार पूर्ववत झालेले नाहीत.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवहार मात्र सुरळीत व नेहमीप्रमाणे सुरु आहेत
व्यवहार पुन्हा कधी सुरु होणार याबाबत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
ट्विटर वरून तांत्रिक बिघाडाची माहिती नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने दिली आहे.
रोख व्यवहार तसेच वायदे बाजार अर्थात फ्युचर अँड ऑप्शन ठप्प झाले आहेत. लाखो गुंतवणूकदारांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार अपूर्ण राहिले असून होणाऱ्या नुकसानाची भरपाई कशी होणार असा प्रश्न सर्व विचारत आहेत.
खरेदी विक्री पुन्हा सुरु झाल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरु होतील व त्यामुळे पुन्हा ताण येऊन तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Share Trading Rules in Marathi I शेअर मार्केट ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे I