बॉलिवूडचा स्टार आयुष्मान खुरानाचे नवीन जाहिरातपटांमध्ये ‘डोके ताळ्यावर’!
~ घराच्या सुरक्षेची चिंता करत असताना ‘आपले डोके फिरणे’ काय असते, याचे प्रतिभावान अभिनेता व ‘गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स’चा ब्रँड अॅम्बेसॅडर आयुष्मान खुराना याच्याकडून नवीन जाहिरातींमध्ये विनोदी ढंगाने चित्रण~
मुंबई, ४ ऑक्टोबर २०२२ : घराच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती उपाययोजना केल्यानंतर, आपल्याला घराबाहेर असतानाही फारशी काळजी करण्याचे कारण उरत नाही, असे बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना याने ‘गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स’च्या जाहिरातपटांत आपल्या आयकॉनिक ‘अंदाजा’मध्ये नुकतेच दाखविले होते.
या जाहिरातपटांना ‘पीस ऑफ माइंड’ असे शीर्षक देण्यात आले असून त्यांत आयुष्मानला तीन वेगवेगळ्या वेषभूषांमध्ये दाखवण्यात आले होते. यात तो एकदा प्रवासात, एकदा बाजारात आणि एकदा त्याच्या ‘मित्राच्या लग्नात असलेला दाखविण्यात आला होता. आयुष्मानने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर या जाहिरातपटांमधील ‘पडद्यामागील’ दृष्येदेखील पोस्ट केली होती.
“कामानिमित्त अनेकदा प्रवास करणाऱ्यांना त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तूंविषयी जी काळजी वाटत राहते, ती मी समजू शकतो; कारण मलाही अनेकदा प्रवास करावा लागतो. ही काळजी केवळ घरातील मौल्यवान वस्तूंबद्दलच असते असे नाही, तर आपल्या प्रियजनांना घरी एकटे सोडण्याबद्दलदेखील ती वाटत असते. आपली घरे बांधताना आपण जी पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे घराची सुरक्षितता जपणे; मग ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये गुंतवणूक करणे असो किंवा घरातल्या लॉकरवर विश्वास ठेवणे असो! माझ्या घरात लहानपणापासूनच मी ‘गोदरेजची लॉकर्स’ पाहत आलेलो आहे आणि म्हणूनच आज ‘गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स’चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून प्रतिनिधित्व करणे हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. आजच्या जगातील इतर सर्व गोष्टींप्रमाणेच, ‘गोदरेज’च्या सुरक्षा उत्पादनांमध्ये आणि ब्रँडमध्येदेखील कालानुरुप सुधारणा झाल्या आहेत. माझ्या घराप्रमाणेच माझे डिजिटल लॉकर हे माझे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. माझे ‘गोदरेज कॅमेरे’ मला जगातील कोठूनही माझ्या प्रियजनांवर लक्ष ठेवण्यास मदत करतात. जवळपास प्रत्येक भारतीय कुटुंबाप्रमाणे माझ्या कुटुंबाचादेखील ‘गोदरेज लॉकर’वर अतूट विश्वास आहे. ‘गोदरेज’च्या तिजोऱ्या या नेहमीच विश्वासार्ह ठरलेल्या आहेत आणि पिढ्यानपिढ्या त्या तशाच दर्जाच्या होत आहेत. मला खात्री आहे की पुढच्या पिढ्याही आपल्या मौल्यवान वस्तूंचे आणि घरांचे रक्षण करण्यासाठी ‘गोदरेज’वरच विश्वास ठेवतील”, असे प्रतिपादन गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचा ब्रँड अॅम्बेसेडर आयुष्मान खुराना याने केले आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- डॉ. मारुती पवार यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान – भारताच्या ‘स्टील व्हिजनरी’च्या प्रेरणादायी वाटचालीला सलाम
- गोदरेज फाउंडेशनतर्फे ‘ग्लोबल अॅक्सेस टू टॅलेंट फ्रॉम इंडिया (GATI) फाउंडेशन’चे सहसादरीकरण
- स्मार्ट होम कॅमेऱ्यांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो – गोदरेज सर्वेक्षण
- बास्किन रॉबिन्सने क्विक कॉमर्स व स्नॅकिंग ट्रेंडसाठी रिटेल विस्तार केला
- विचार ते अंमलबजावणी: डॉ. अमित बागवे घडवत आहेत महाराष्ट्र उद्योगजगतात क्रांती