अर्थसंकेत नव उद्योजक पुरस्कार सोहळा २०२० ! – वर्ष ६ I Start Up Awards 2020 I
अर्थसंकेत नव उद्योजक पुरस्कार सोहळा २०२० ! – वर्ष ६
मराठी समजातील नव उद्योजकांचे कर्तुत्व जगासमोर आणण्याचा एक आगळा प्रयत्न म्हणजेच “अर्थसंकेत नव उद्योजक पुरस्कार सोहळा” !
असे उद्योजक ज्यांनी शून्यातून एक उद्योग उभा केला. ज्यांनी आपल्या आयुष्याची जोखीम घेऊन उद्योग निर्माण केला, रोजगार निर्माण केले समाजाचे देणे फेडले. अशा उद्योजकाचे कौतुक करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
नव उद्योजक पुरस्कार हा एकमेव पुरस्कार सोहळा आहे ज्या अंतर्गत नवीन उद्योजकांचा गौरव केला जातो. ज्या उद्योजकांनी वर्ष २०१० व त्यानंतर व्यवसाय सुरु केला आहे आणि स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे त्यांना पुढच्या पायरीवर जाण्यासाठी ज्या व्यासपीठाची आवश्यकता असते ते व्यासपीठ अर्थसंकेतने निर्माण केले आहे.
मराठी समाजाप्रती बांधिलकी जपण्यासाठी अर्थसंकेतद्वारे नेहमीच काही ना काही नवीन उपक्रम राबविले जातात. मराठीतील नव उद्योजकतेचा सन्मान करणे व त्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकेत घेऊन येत आहे.
नव उद्योजक पुरस्कार सोहळा २०२० ! Start Up Awards 2020
पुरस्कार विभाग
१. सर्वोत्कृष्ट नव उद्योजक [पुरुष]
२. सर्वोत्कृष्ट नव उद्योजक [ महिला ]
३. नाविन्याचा ध्यास
४. सामाजिक उद्योजक
५. सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार
६. विद्यार्थी उद्योजक
७. नव उद्योजकता [ भांडवल उभारणी व नफा ]
८. नव उद्योजकता [ रोजगार निर्मिती ]
९. लढाऊ बाणा
१०. सर्वोत्कृष्ट नव उद्योजकता व्यवसाय
नियम आणि अटी :
वर्ष २०१ २ व त्यानंतर सुरु झालेले व्यवसाय ग्राह्य धरले जातील
उद्योजकांनी आपली संपूर्ण माहिती द्यावी.
उद्योगाच्या स्वरूपाची संपूर्ण माहिती द्यावी.
भविष्यातील वाटचालीबद्दल माहिती द्यावी.
मिळालेल्या पुरस्काराबद्दल माहिती द्यावी.
वर्तमानपत्र, टी व्ही वर जाहिरात, मुलाखत व इतर काही माहिती असल्यास द्यावी
प्रत्येक पुरस्कारासाठी नामांकन शुल्क घेण्यात येईल.
नामांकनाची तपासणी करून निवड केली जाईल
व्यवसायातील नाविन्यता, व्यावसायिक अनुभव, व्यावसायिक यश, वैयक्तिक यश, सामाजिक काम, वय व पुरस्कार या निकषांवर पुरस्कार दिला जाणार आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क 8082349822
धन्यवाद !
