Bse Sme मध्ये नोंदणीकृत ४४९ लघु व मध्यम उद्योजकांचे बाजार भांडवल ८०,००० कोटी रुपये पार I

Bse Sme मध्ये नोंदणीकृत ४४९ लघु व मध्यम उद्योजकांचे बाजार भांडवल ८०,००० कोटी रुपये पार

अर्थसंकेत महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह पर्व दुसरे ‘ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’च्या सहयोगाने संपन्न

महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह हा कार्यक्रम एक राज्य म्हणून महाराष्ट्राच्या प्रगती आणि विकासावर चर्चा करण्यासाठी अर्थसंकेततर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे व सौ रचना बागवे, Bse Sme चे श्री आनंद चारी, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे मानद सचिव श्री सुनील कुलकर्णी, खांडवाला सिक्युरिटीज लिमिटेडचे श्री रीनव मनसेटा, यस बँकेचे श्री. दीपक शर्मा उपस्थित होते.

आय टी आणि उत्पादनापासून ते कृषी आणि पर्यटनापर्यंतच्या उद्योगांच्या दोलायमान मिश्रणासह, महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे. या यशात योगदान देणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकणे, जसे की सरकारी उपक्रम, पायाभूत सुविधांचा विकास आणि गुंतवणुकीच्या संधी यावर प्रकाश टाकणे हा या परिषदेचा उद्देश होता.

डॉ अमित बागवे यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा चढता आलेख लोकांसमोर उलगडला. महाराष्ट्राने नेहमीच भारतामध्ये मोठ्या भावाची भूमिका निभावली आहे असे मत त्यांनी मांडले. ह्युआन त्सांग या चिनी प्रवाशाने सातव्या शतकात ‘महाराष्ट्र’ या नावाचा प्रथम उल्लेख केला. महाराष्ट्रात सुमारे ४ दशलक्ष लघु उद्योग आहेत, जे १० दशलक्षाहून अधिक लोकांना रोजगार देतात. एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२२ पर्यंत महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ ₹ १०.८८ लाख कोटी होता, जो देशातील एकूण  परकीय गुंतवणुकीच्या २८.५% होता. महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठे उत्पादक राज्य बनले आहे अशीही माहिती त्यांनी दिली.

Arthsanket Maharashtra Growth Story season 2
Arthsanket Maharashtra Growth Story season 2

ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे मानद सचिव श्री सुनील कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याची तसेच दैदिप्यमान इतिहासाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. संस्थेशी जोडले गेल्यास उद्योजकांना नक्कीच फायदा होईल असेही मत त्यांनी व्यक्त केले.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये ४४९ लघु व मध्यम उद्योजकांनी लिस्टिंग करून करोडो रुपयांचे भांडवल उभे केले आहे. सर्वाधिक लघु उद्योजक हे महाराष्ट्रातून आहेत. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज Bse Sme मध्ये नोंदणी केलेल्या उद्योगांचे एकूण बाजार भांडवल जवळपास ८०,००० हजार कोटी रुपये इतके झाले आहे, अशी माहिती Bse Sme चे श्री आनंद चारी यांनी दिली.

यस बँकेचे श्री. दीपक शर्मा यांनी बँकेच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली तसेच कर्ज घेताना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी याविषयी मार्गदर्शन केले.

खांडवाला सिक्युरिटीज लिमिटेडचे श्री रीनव मनसेटा यांनी लघु व मध्यम उद्योजकांना शेअर मार्केटमधून भांडवल कसे उभे करावे व त्यासाठी लागणारी माहिती दिली.

Dr Amit Bagwe
Dr Amit Bagwe

सौ सोनाली घाटे बाणे, श्री शिवम गुप्ता, हॉटेल MH 09 शेतकरी, श्री दीपक पावस्कर, श्री योगेश माटेगांवकर, श्री प्रफुल्ल धाकतोडे, श्री. दिनेश मोरे यांचा अर्थसंकेत बिझनेस अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

डॉ. पायल नांदुरकर यांनी ‘WE’ The recycling company या त्यांच्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तसेच चित्रपट जनक दादासाहेब फाळके टाउनशिप, शेलू यांच्या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. सौ रचना बागवे आभार प्रदर्शन केले.

महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये होणार असून पुढील सहयोग आणि भविष्यातील वाढीच्या पुढाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत भारताच्या अर्थव्यवस्थेतील पॉवरहाऊस बनण्याच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास साजरा करत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क -8082349822

MGSC 2 EVENT
MGSC 2 EVENT

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *