महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी अनेक संधी – श्री अजय ठाकूर व्यवस्थापकीय संचालक बी एस ई – एस एम ई I Arthsanket Maharashtra Growth Story Conclave I
महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी अनेक संधी – श्री अजय ठाकूर व्यवस्थापकीय संचालक बी एस ई – एस एम ई
महाराष्ट्रात उद्योजकांसाठी सिंगल विंडो सिस्टमची गरज – श्री रॉबिन बॅनर्जी माजी अध्यक्ष सी आय आय
अर्थसंकेत संस्थेतर्फे ‘महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह’ हा कार्यक्रम, एक राज्य म्हणून महाराष्ट्राच्या प्रगती आणि विकासावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. आय टी आणि उत्पादनापासून ते कृषी आणि पर्यटनापर्यंतच्या उद्योगांच्या दोलायमान मिश्रणासह, महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे. या यशात योगदान देणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकणे, जसे की सरकारी उपक्रम, पायाभूत सुविधांचा विकास आणि गुंतवणुकीच्या संधी यावर प्रकाश टाकणे हा या परिषदेचा उद्देश होता.
डॉ अमित बागवे यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा चढता आलेख लोकांसमोर उलगडला. महाराष्ट्राने नेहमीच भारतामध्ये मोठ्या भावाची भूमिका निभावली आहे असे मत त्यांनी मांडले. ह्युआन त्सांग या चिनी प्रवाशाने सातव्या शतकात ‘महाराष्ट्र’ या नावाचा प्रथम उल्लेख केला. स्वातंत्र्यानंतर कृषी सहकारी संस्थांच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर होता. भारतातील एकूण लघु उद्योगांमध्ये महाराष्ट्र राज्याचे योगदान सुमारे १३% आहे. महाराष्ट्रात सुमारे ४ दशलक्ष लघु उद्योग आहेत, जे १० दशलक्षाहून अधिक लोकांना रोजगार देतात. एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२२ पर्यंत महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ ₹ १०.८८ लाख कोटी होता, जो देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या २८.५% होता. भारताच्या एकूण उत्पादन उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा २५% आहे, ज्यामुळे ते भारतातील सर्वात मोठे उत्पादक राज्य बनले आहे.
महाराष्ट्र जरी देशात अनेक बाबतीत पुढे असला तरी, एखादा उद्योग सुरु करताना अनेक परवानग्या मिळवताना त्रास होतो व महाराष्ट्रात उद्योजकांसाठी सिंगल विंडो सिस्टमची गरज आहे असे मत सी आय आयचे माजी अध्यक्ष श्री रॉबिन बॅनर्जी यांनी मांडले.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये ४४२ लघु व मध्यम उद्योजकांनी लिस्टिंग करून करोडो रुपयांचे भांडवल उभे केले आहे. सर्वाधिक लघु उद्योजक हे महाराष्ट्रातून आहेत व महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी अनेक संधी आहेत. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये नोंदणी केलेल्या उद्योगांचे एकूण भाग भांडवल जवळपास ७०,००० हजार कोटी रुपये इतके झाले आहे, अशी माहिती श्री अजय ठाकूर यांनी दिली.
ईशा टूर्सचे संस्थापक श्री आत्माराम परब यांनी पर्यटन क्षेत्रातील विविध संधीची माहिती दिली व मध्यमवर्गीय ते २५ कोटींचा व्यवसाय हा त्यांचा प्रेरणादायी उद्योजकीय प्रवास उपस्थितांसमोर मांडला.
१५ हुन अधिक सुपरमार्केटची चेन असलेले आर के बझारचे श्री मनोज डुंबरे यांनी रिटेल क्षेत्रातील संधींची माहिती दिली. आर के बझारच्या नवीन फ्रॅन्चायजी पद्धतीमुळे अनेकांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
डॉ अमित बागवे लिखित ‘व्हॉट्सऍप मार्केटिंग फॉर स्मॉल बिझनेस’ या इंग्रजी पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. सौ रचना बागवे यांनी महिला उद्योजकांसाठी उपलब्ध संधींची माहिती दिली. प्रोफेसर रोहन होमकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले व उपस्थितांची मने जिंकली.
निकमार विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सौ. सुषमा कुलकर्णी तसेच सौ. शमिका राणे सावंत व एकल महिला संघटना यांचा ‘वूमेन एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. श्री. आशिष संकपाळ यांचा ‘बिझनेस एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अक्षय एड्युकेशनल इंस्टिट्यूट यांचा ‘बेस्ट एड्युकेशनल इंस्टिट्यूट इन महाराष्ट्र’, सौ. दीपाली कदम, सुनीता मोर, बिझनेस लीडरशिप लीगच्या श्वेता मोहंती, शुभांगी कुलकर्णी, सौ करुणा संखे यांचा ‘वुमन अचिव्हर्स’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये होणार असून पुढील सहयोग आणि भविष्यातील वाढीच्या पुढाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत भारताच्या अर्थव्यवस्थेतील पॉवरहाऊस बनण्याच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास साजरा करत आहे.
Contact- 8082349822
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे