Arthsanket Digital India 2022 I अर्थसंकेत डिजिटल इंडिया २०२२ I

Arthsanket Digital India 2022 I अर्थसंकेत डिजिटल इंडिया २०२२ I

अर्थसंकेत प्रस्तुत डिजिटल इंडिया २०२२ (वर्ष सहावे) – चर्चासत्र आणि पुरस्कार सोहळा

अर्थसंकेत प्रस्तुत डिजिटल इंडिया २०२२ घेऊन येत आहे, पुन्हा एकदा मराठी उद्योजकांना, बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यासाठी व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी. तसेच सत्कार होणार आहे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व नावाजलेल्या संस्थांचा आणि व्यक्तिमत्त्वांचा !

प्रत्येक व्यवसाय तसेच प्रत्येक सेवा ई कॉमर्स या नव्या पद्धतीत बदलता येऊ शकते. सोशिअल मीडियाच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचता येते अगदी मोफत. ते कसे ? इंडस्ट्री ४.० म्हणजे काय ? डिजिटल इंडिया म्हणजे नक्की काय ? तंत्रज्ञानात झपाट्याने होत असलेले बदल काय आहेत ? सध्या आपण करीत असलेल्या नोकरी व व्यवसायावर बदलत्या तंत्रज्ञानामुळे काय परिमाण होणार आहे ? या व अशा अनेक प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा एक प्रयत्न म्हणेज अर्थसंकेत प्रस्तुत डिजिटल इंडिया २०२२.

इंडस्ट्री ४.० अर्थात यंत्रानी यंत्रासोबत संवाद साधून काम करणे. इंडस्ट्री ४.० मुळे काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. जगण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. असे कोणतेच काम शिल्लक राहिले नसेल, जे हे रोबोट्स करू शकणार नाहीत. सर्व क्षेत्रांमध्ये इंडस्ट्री ४.० चा शिरकाव झाला आहे. जगातला प्रत्येक माणूस आज कोणत्या ना कोणत्या प्रकारे सोशिअल मीडियाच्या आहारी गेला आहे. तर मग आपला व्यवसाय सुद्धा सोशिअल मीडियावर जाणे आवश्यक आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे अनेक नोकरी व व्यवसाय अस्तंगत झाले आहेत व यापुढे अनेक नोकऱ्या व व्यवसाय पूर्णपणे नष्ट होणार आहेत. अशा विविध मुद्द्यांचा उहापोह म्हणजे अर्थसंकेत प्रस्तुत डिजिटल इंडिया २०२२.

तसेच ज्याप्रमाणे जग बदलत चालले आहे त्याचप्रमाणे अनेक उद्योग व्यवसाय नव्या तंत्रज्ञानाची कास धरून पुढे जात आहेत. अशा उद्योजकांच्या यशोगाथा समाजासमोर आणण्याचे कार्य म्हणजे अर्थसंकेत प्रस्तुत डिजिटल इंडिया २०२२. ऑनलाईन माध्यमातून, डिजिटल माध्यमातून व सोशिअल मीडियाच्या माध्यमातून हे उद्योजक बदलते जग समाजासमोर आणत आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा म्हणजे अर्थसंकेत प्रस्तुत डिजिटल इंडिया २०२२.

Digital India 2022
Digital India 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mrudula Joshi
Mrudula Joshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *