गोदरेज अप्लायन्सेसतर्फे नवा मापदंड प्रस्थापित, भारतातील सर्वात उर्जा कार्यक्षम रेफ्रिजरेटर – एज निओ लाँच
गोदरेज अप्लायन्सेसतर्फे नवा मापदंड प्रस्थापित, भारतातील सर्वात उर्जा कार्यक्षम रेफ्रिजरेटर – एज निओ लाँच
गोदरेज अँड बॉयस, या गोदरेज समूहाच्या प्रमुख कंपनीने गोदरेज अप्लायन्सेस हा आपला व्यवसाय शाश्वतता जपण्यासाठी आणि ग्राहकांना नवे तंत्रज्ञान मिळवून देण्यासाठी बांधील असल्याचे नव्याने दाखवून दिले आहे. कंपनीने भारतातील सर्वात उर्जा कार्यक्षम रेफ्रिजरेटर – एज निओ लाँच केला असून हा रेफ्रिजरेटर दरवर्षी केवळ ९९ युनिट्स वापरतो. बीईईच्या अद्ययावत रेटिंगनुसार भारतातील इतर रेफ्रिजरेटर्सच्या तुलनेत उर्जा वापराचे हे प्रमाण सर्वात कमी आहे. साहजिकच यामुळे विजेच्या बिलात लक्षणीय घट होते.
गोदरेज एज निओ हा सिंगल डोअर रेफ्रिजरेटर आहे, जो त्यात बसवलेला इन्व्हर्टर कॉम्प्रेसर, आधुनिक कॅपिलरी तंत्रज्ञान आणि स्मार्ट पद्धतीने डिझाइन करण्यात आलेला एयरफ्लो यांमुळे उर्जेच्या बाबतीत लक्षणीयरीत्या कार्यक्षम झाला आहे.
उर्जा बचत करणाऱ्या या रेफ्रिजेटरचा विजेचा वार्षिक खर्च एलईडी बल्ब, पंखा किंवा मल्टीप्लेक्समध्ये कुटुंबासह गेल्यानंतर येणाऱ्या खर्चापेक्षा कमी आहे. दरवर्षी यामुळे ११०१ रुपयांची बचत होत असल्याचे लक्षात घेता ग्राहकांना १० वर्षांत ११,००० रुपयांची रक्कम वाचवता येणार आहे. हा रेफ्रिजेटर पर्यावरणाचे रक्षणही करणारा असून १ स्टार रेफ्रिजेटरच्या तुलनेत तो १००० किलोपर्यंतचे कार्बन उत्सर्जन कमी करू शकतो. हे १० वर्षांत अंदाजे ६४ झाडांचे जतन करण्यासमान आहे.
ब्रँडकडे सध्या ५- स्टार एनर्जी रेटिंग असलेले २० एसकेयूज असून त्यामुळे अधिक चांगली उर्जा कार्यक्षमता मिळते. गोदरेज एज निओमध्ये आर्द्रता कायम राखणारे खास तंत्रज्ञान वापरण्यात आले असून ते पदार्थांचा ताजेपणा २४ दिवस कायम राखते. टर्बो कुलिंग तंत्रज्ञानामुळे बाटलीतले पाणी लवकर थंड होते, तर बर्फही लवकर तयार होतो. सामान ठेवणे सोपे व्हावे म्हणून यात मोठा फ्रीजर आणि अक्वा स्पेस देण्यात आली आहे.
या लाँचविषयी गोदरेज अप्लायन्सेसच्या रेफ्रिजरेटर विभागाचे उत्पादन समूह प्रमुख अनुप भार्गव म्हणाले, ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेला नवा एज निओ रेफ्रिजेटर दमदार थंडावा देतो, तसेच विजेचे बिल कमी करण्यासाठी ग्राहकांना मदत करतो. यामुळे पर्यावरणावरील परिणाम कमी होण्यासही मदत होते. १८० लीटर क्षमतेचे हे मॉडेल दोन आकडी विकास साधण्यासाठी आणि ग्राहकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी सज्ज आहे.’
२००८ मध्ये ५- स्टार रेफ्रिजरेटर्सची सर्वात मोठी श्रेणी लाँच करणारा गोदरेज हा भारतातील पहिल्या काही ब्रँडपैकी एक ब्रँड ठरला होता आणि आजही उर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत कंपनी आघाडीवर आहे. हा रेफ्रिजरेटर सध्या २६,९९० रुपयांच्या एमआरपीमध्ये उपलब्ध आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या आघाडीच्या ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हा रेफ्रिजरेटर सध्या उपलब्ध असून लवकरच तो पॅन भारतात उपलब्ध केला जाईल.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi