जर्मनीतील ‘जोवत हॉट मेल्ट अधेसिव्ह’ची निर्मिती पिडीलाइट करणार भारतात I
जर्मनीतील ‘जोवत हॉट मेल्ट अधेसिव्ह’ची निर्मिती पिडीलाइट करणार भारतात
~ ‘फेव्हिकॉल जोवत’ या ब्रँड नावाने गुजरातमधील वापी येथील अत्याधुनिक कारखान्यात
‘जोवत हॉट मेल्ट्स’च्या श्रेणीचे होईल उत्पादन ~
नवी दिल्ली, २ मार्च, २०२३ : अधेसिव्ह, सीलन्ट्स आणि बांधकामातील रसायनांची भारतातील आघाडीची उत्पादक कंपनी असलेल्या ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड’ने ‘जोवत एसई’ या जर्मन कंपनीशी भागीदारी केली असून ‘जोवत हॉट मेल्ट्स’ या उत्पादनांची निर्मिती ‘पिडीलाइट’तर्फे भारतातील ग्राहकांसाठी स्थानिक पातळीवर करण्यात येणार आहे. जोवत एसई ही जगभरात औद्योगिक अधेसिव्हजचा पुरवठा करणारी एका जर्मन कुटुंबाच्या मालकीची कंपनी आहे.
पिडीलाइट ही कंपनी २०१८ पासून जोवत अधेसिव्हजच्या संपूर्ण श्रेणीची विक्री व वितरण भारतात, तसेच श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ यांच्यासह इतर शेजारी देशांमध्ये करीत आहे.
‘पिडीलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड’चे उप व्यवस्थापकीय संचालक सुधांशू वत्स म्हणाले, “पिडीलाइटमध्ये अग्रगण्यता हे मूल्य महत्त्वाचे मानले गेले आहे. आम्ही भारतात सातत्याने नवीन श्रेणी आणि तंत्रज्ञान सादर करीत असतो. ‘जोवत’सोबतची आमची भागीदारी हे याचेच आणखी एक उदाहरण आहे. ‘जोवत’च्या टीमच्या पाठिंब्याने, आम्ही आता भारतात हॉट मेल्ट अधेसिव्ह तयार करण्यासाठी गुजरातमधील वापी येथे अत्याधुनिक कारखान्याची आणि चाचणी सुविधेची उभारणी केली आहे. ‘फेव्हिकॉल जोवत’ या ब्रॅंड नावाने ही उत्पादने सादर केली जातील. फर्निचर, पॅकेजिंग, वाहन आणि कापड या उद्योगांमध्ये विशेष स्वरुपाची अधेसिव्हज लागतात, तेथे आम्ही सेवा देण्यास सक्षम असणार आहोत.”
‘जोवत एसई’चे व्यवस्थापकीय संचालक क्लॉस कुलमन या प्रसंगी म्हणाले, “पिडीलाइट इंडस्ट्रीज ही आशियात अधेसिव्हजमध्ये अग्रेसर आहे. आम्ही तिला पुढील स्तरावर नेत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. तंत्रज्ञान आणि संशोधन व विकास या दोन्हीमधील नावीन्य हे फार महत्त्वाचे असते आणि आम्ही या माध्यमातूनच आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देत आहोत. ‘जोवत’ स्वतःही अनेक उच्च-स्तरीय अधेसिव्ह उत्पादनांच्या विकासात अग्रेसर आहे आणि अधेसिव्हमधील तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक विकास आम्ही साधलेला आहे. भारतातील या नव्या कारखान्याच्या माध्यमातून ‘पिडीलाइट’सह आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम उपाय आणि उत्पादने देण्यासाठी एकत्र काम करू.”
‘थर्मोप्लास्टिक हॉट मेल्ट अधेसिव्ह’ची स्थानिक पातळीवर निर्मिती करून ‘फेविकॉल जोवत’ ही उत्पादनांची व्यापक श्रेणी अनेक औद्योगिक क्षेत्रांना पुरविण्यात येणार आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या आवाहनाच्या प्रेरणेतून ही भागीदारी करण्यात आली आहे.
About Pidilite:
Pidilite Industries Limited is a leading manufacturer of adhesives and sealants, construction chemicals, craftsmen products, DIY (Do-It-Yourself) products and polymer emulsions in India. Our products range also includes paint chemicals, automotive chemicals, art materials and stationery, fabric care, maintenance chemicals, industrial adhesives, industrial resins and organic pigments & preparations. Most of the products have been developed through strong in-house R&D. Our brand name Fevicol has become synonymous with adhesives to millions in India and is ranked amongst the most trusted brands in the country. Some of our other major brands are M-Seal, Fevikwik, Fevistik, Roff, Dr. Fixit, Araldite and Fevicryl.
About Jowat:
Jowat SE with headquarters in Detmold is one of the world’s leading suppliers of industrial adhesives. These are mainly used in woodworking and furniture manufacture, in the paper and packaging industry, for graphic arts, in the textile, automotive as well as in the electrical industry. The enterprise was founded in 1919 and has manufacturing sites in Germany in Detmold and Elsteraue, plus three other producing subsidiaries, Jowat Corporation in the USA, Jowat Swiss AG, and Jowat Manufacturing in Malaysia. The supplier of all adhesive groups is manufacturing 100,000 tonnes of adhesives per year, with 1,250 employees. A global sales structure with 23 subsidiaries plus solution partners is guaranteeing local service with close customer contact.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi