देशात आर्थिक विषमतेची मोठी दरी – ऑक्सफॅम इंटरनॅशनलचा अहवाल I
देशात आर्थिक विषमतेची मोठी दरी – ऑक्सफॅम इंटरनॅशनलचा अहवाल
भारतातील एक टक्का श्रीमंतांकडे देशाची ४० टक्के संपत्ती
लोकसंख्येच्या सर्वात गरीब वर्गाकडे देशाची फक्त ३ टक्के मालमत्ता
भारतातील १० श्रीमंतांवर ५ टक्के कर लावला तर मुलांना शालेय शिक्षणासाठी पूर्ण पैसे मिळू शकतात
श्रीमंतांच्या तुलनेत गरीब लोक अत्यावश्यक वस्तू आणि सेवांवर जास्त खर्च करत असमानतेने जास्त कर भरत आहेत.
खाद्यपदार्थ आणि अखाद्य वस्तूंमधून गोळा होणाऱ्या एकूण करांपैकी ६४.३ टक्के कर हा तळाच्या ५० टक्के लोकसंख्येकडून येतो.
अखिल भारतीय स्तरावरील खालच्या ५० टक्के लोकसंख्येला वरच्या १० टक्क्यांच्या तुलनेत उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार अप्रत्यक्ष कर आकारणीवर सहा पट जास्त पैसे द्यावे लागतात.
२०२१-२२ मध्ये एकूण १४.८३/- लाख कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा करातील अंदाजे ६४ टक्के लोकसंख्येच्या तळातील ५० टक्के लोकसंख्येमधून आले होते, तर केवळ ३ टक्के जी एस टी वरच्या १० टक्क्यांमधून आला होता
भारतात जिथे पुरुष मजुरांना १ रुपया मिळत असेल तिथे महिला कामगारांना ६३ पैसे मिळतात
नोव्हेंबर २०२२ पर्यंत भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत १२१ टक्क्यांनी वाढ
भारतातील एकूण अब्जाधीशांची संख्या २०२० मध्ये १०२ वरून २०२२ मध्ये १६६ वर पोहोचली
भुकेल्या भारतीयांची संख्या २०१८ मध्ये १९० दशलक्ष वरून २०२२ मध्ये ३५० दशलक्ष झाली
२०२२ मध्ये ५ वर्षांखालील मुलांमध्ये ६५ टक्के मृत्यू मोठ्या प्रमाणावर भूकबळीमुळे होत आहेत
ऑक्सफॅमच्या मते भारतामध्ये जगातील सर्वाधिक २२८.९ दशलक्ष गरीब आहेत
२१ सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची संपत्ती, ७० कोटी भारतीयांच्या संपत्तीइतकी
भारतातील १० सर्वाधिक श्रीमंतांची संपत्ती एका वर्षात २७.५२ लाख कोटी रूपयांनी वाढली
भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीवर एकदाच २ टक्के कर आकारला तर पुढील तीन वर्षांसाठी कुपोषणग्रस्त बालकांच्या पोषणासाठी ४०,४२३/- कोटी रुपये जमा होऊ शकतात
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi