८००० अती श्रीमंत व्यक्ती यावर्षी भारत सोडणार I
८००० अती श्रीमंत व्यक्ती यावर्षी भारत सोडणार
नव्या सर्व्हे नुसार, २०२२ मध्ये जवळपास ८००० उच्च नेटवर्थ असलेल्या व्यक्ती भारत देश सोडून जातील. कडक टॅक्स संबंधित नियम , पासपोर्ट चे कठोर नियम यामुळे या व्यक्ती स्थलांतर करतील. खाजगी वेल्थ अँन्ड इन्व्हेस्टमेंट ट्रेंड ची पाहणी करणाऱ्या हेन्ले ग्लोबल सिटीझन रिपोर्ट ने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या व्यक्ती सर्वाधिक तरुण असून जागतिक स्तरावर नाविन्यपूर्ण बिझनेस व इन्व्हेस्टमेंट संधी तसेच धोका पत्करण्याची तयारी असलेल्या आहेत. तसेच या अहवालानुसार, २०३१ पर्यंत भारतात सर्वाधिक संपत्ती असलेल्या व्यक्तींची संख्या ८०% ने वाढेल. यामुळे फायनान्शिअल सर्विसेस, हेल्थकेअर, टेक्नॉलॉजी या क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे. या व्यक्ती प्रामुख्याने दुबई व सिंगापूर येथे स्थलांतर करतील. दुबई गोल्डन व्हिसा चे आकर्षण , सिंगापूर मधील वर्ल्ड क्लास फायनान्शिअल सल्लागार व मजबूत लीगल सिस्टीम यामुळे याठिकाणांना ते पसंती देत आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo