लोनच्या माध्यमातून अदानी ग्रुप उभारणार ४.५ बिलियन डॉलर्स I
लोनच्या माध्यमातून अदानी ग्रुप उभारणार ४.५ बिलियन डॉलर्स
विदेशी कर्ज योजनेमार्फत लोन घेण्याकरिता अदानी ग्रुप कंपनी सध्या विविध परकीय बँकांशी चर्चा करीत आहे. भारतीय कंपनीकडून पहिल्यांदाच अश्यापद्धतीची मोठ्या प्रमाणातील विदेशातून कर्ज उभारणी योजना राबवली जात आहे. विदेशी गुंवणूकदारांना बॉण्ड विक्री करून हा फंड उभारला जाईल. बार्कलेज, डॉच बँक, स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक या बँका फंडिंग संदर्भातील काम बघतील. तसेच प्रमुख जागतिक बँका BNP पारिबास, सिटी, जेपी मॉर्गन, MUFG ,SMBC , मिझुहो बँक या देखील या व्यवहाराकरिता चर्चेत आहेत. अदानी ग्रुप कडून प्रत्येक बँकेची कर्ज वितरण क्षमता तपासली जात आहे. अदानी ग्रुप ने विदेशातील होलसिम कंपनीचे भारतातील भागभांडवल खरेदी केले असून होलसिम व त्यांच्या उपकंपन्या मिळून अंबुजा सिमेंट मध्ये ६३.१९% व ACC मध्ये ५४.३३% भागधारक आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo