भारताने $४०० बिलियनच्या निर्यातीचे ध्येय गाठले I India achieved $400 Billion export target I
भारताने $४०० बिलियनच्या निर्यातीचे ध्येय गाठले
निर्यातीत वाढ केल्यास भारताला ग्लोबल मार्कंडाईस एक्स्पोर्ट रँक मिळण्याची शक्यता
भारताने मार्च मध्ये $४०० बिलियन च्या निर्यातीचे ध्येय गाठले असून ‘आत्मनिर्भर ‘ भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. २०२२ मध्ये इंजिनिअरिंग गुड्स च्या निर्यातीत ५०% ची वाढ झाली असून अधिक मूल्यांकनाचे व गुणवत्तापूर्ण मालाच्या निर्यातीचे ध्येय भारताने ठेवले आहे. २०१८-१९ मध्ये भारताने $३३० बिलियन च्या निर्यातीचे ध्येय गाठले होते. भारताच्या आत्मनिर्भर होण्याकडे उचलेले हे महत्वाचे पाऊल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कॉटन यार्न,हॅन्डलूम प्रॉडक्ट, जेम , ज्वेलरी, या वस्तूच्या निर्यातीत ५० ते ६०% ची वाढ झाली आहे.
‘भारत हा जागतिक स्तरावर फूड व ऍग्रीकल्चर प्रॉडक्ट निर्यातीत अग्रेसर आहे. कोव्हीड नंतर बऱ्याच जागतिक स्तरावरील महत्वाच्या इंडस्ट्रीज कडून सप्लाय चेन मध्ये बदल केले गेले व त्यावेळी भारताला प्राधान्य दिले गेले आहे. तसेच प्रोडक्शन लिंक इंसेन्टीव्ह स्कीम मुळे भारतात परकीय गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणात वाढली.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo