एल आय सीच्या आयपीओला सेबीची मान्यता : पॉलिसी धारकांना कोणती सवलत मिळणार ? LIC IPO got SEBI nod I What are the benefits to Policyholders ?
एल आय सीच्या आयपीओला सेबीची मान्यता : पॉलिसी धारकांना कोणती सवलत मिळणार ?
मार्केट रेग्युलेटर सेबी ने LIC च्या आयपीओला मान्यता दिली असून याकरिता एल आय सीने सेबीकडे फेब्रुवारी २०२२ ला पेपर्स जमा केले होते.
शासन या कंपनीत १००% भागधारक असून त्यातील ५% भागभांडवल विक्री शासन करणार आहे. पात्र कर्मचारी व पॉलिसी होल्डर्स ना शेअर खरेदी करिता रिसेर्वेशन मिळेल.
रशिया व युक्रेन वादामुळे शासनाने हे IPO वितरण पुढील आर्थिक वर्षात करणार असल्याचे जाहीर केले.
२८ फेब्रुवारी २०२२ पूर्वी ज्या पॉलिसी धारकांनी आपले पॅन क्रमांक पॉलिसीशी जोडला नाही त्यांना हा IPO खरेदी करतां येणार नाही. पॉलिसीधारक अथवा इतर रिटेल इन्व्हेस्टर यांना शेअर खरेदीसाठी डिमॅट अकाउंट सुरु करणे गरजेचे राहील. पॉलिसीधारक त्यांनी घेतलेले शेअर्स लिस्टिंग झाल्यानंतर विक्री देखील करू शकतात. त्याकरिता लॉक इन पिरिअड नाही.
ऑफर डॉक्युमेंट मध्ये दिलेल्या अनुसार कमीत कमी किती शेअर खरेदी करू शकता याचे बंधन गुंतवणूकदारांवर राहील. पात्र पॉलिसीधारकांना प्रति इक्विटी शेअर डिस्काउंट दिला जाईल. जॉईंट लाईफ पॉलिसीधारकांना दोघांपैकी एकाचे पॅन डिटेल पॉलिसीशी संलग्न करणे आवश्यक राहील. व तीच व्यक्ती जॉईंट डिमॅट अकाउंट असल्यास प्रथम होल्डर असणे आवश्यक आहे.
लॅप्स स्थितीतील पॉलिसी देखील पॉलिसीहोल्डर रिझर्वेशन अंतर्गत ग्राह्य धरली जाईल.
LIC च्या वेबसाईट वर जाऊन आपला पॅन क्रमांक, ईमेल आयडी , मोबाईल नंबर ,पॉलिसी नंबर या माहितीच्या आधारे पॅन अपडेट करता येते. ग्रुप पॉलिसी व्यतिरिक्त प्रधान मंत्री वय वंदना योजना घेतलेली व्यक्ती देखील या रिझर्वेशन अंतर्गत शेअर खरेदी करू शकते.
केवळ भारतात राहणारेच पॉलिसीहोल्डर या IPO मध्ये भाग घेऊ शकतात. IPO मध्ये सहभागासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. पॉलिसीहोल्डर रिझर्वेशन अंतर्गत अर्ज करताना कमीतकमी प्रिमिअम अथवा सम अशुअर्ड चे बंधन घातलेले नाही.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
