भूतानचे पक्षीवैभव – भाग ३

आत्माराम परब

भूतान हा तीन देशांच्या सीमांना जोडणारा देश आहे. पण तरीदेखील तेथील पर्यटन नियंत्रित स्वरूपात आहे. त्याचे कारण म्हणजे प्रचंड महागडा असा पर्यटन व्हिसा.

भारतीयांसाठी हा व्हिसा मोफत असला तरी युरोपियन अथवा अन्यांसाठी तोच आकार किमान २५० डॉलर्स इतका असतो. त्यामुळे भूतानने चांगल्या प्रमाणात येथील वैविधता जपली आहे. अर्थात तेथे बर्ड टुरिझम अजून पूर्णाशाने विकसित झाले नसले तरी तेथे प्रचंड संधी आहे.

थिम्पू आणि पारो येथून तुम्हाला पक्षी निरीक्षणासाठी खास मार्गदर्शक मिळू शकतात. पण तुमचा चमू मोठा असेल तर त्यांचा दिवसाचा खर्च भागवणे सहज शक्य होऊ शकते. किमान आठ ते दहा दिवसांची ही टूर आखावी लागेल. जंगलांच्या आसपासच्या भागातील गावांमध्ये काही ठिकाणी होम स्टेची सुविधा आहे, तर काही ठिकाणी कॅिम्पगदेखील करता येते.

भूतान हा जगात सुखी माणसांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातील उत्तर पूर्व भागातील काही राज्यांमध्येदेखील जैववैविधता प्रचंड आहे, पण त्याच्या जतनासाठी तुलनेने प्रयत्न कमी झाले आहेत. तसेच तेथील लोकांच्या मानसिकतेत बदल होत नाही तोपर्यंत जे आकाशात उडते ते खाद्य असते अशी समजूत दूर होणार नाही.

भूतानने अतिशय परिश्रमपूर्वक तेथील जनतेच्या मनात अनेक गोष्टी रुजवल्या आहेत. शिक्षण व आरोग्य सुविधा मोफत केल्या आहेत. भूतानचा राजा वर्षांतून एकदा तरी प्रत्येक गावाला भेट देतोच. या सर्वामुळे भूतान आजही त्याची समृद्धता जपून ठेवू शकला आहे. त्यामुळेच अशा या अद्भुत देशात पक्षी पाहण्याची संधी आवर्जून घ्यायला हवी.

Call 093200 31910

info@ishatours.net

Home

geetanjali.ishatour@gmail.com

ठाणे – 02225437417, 9320131910

दादर – 02224223233, 9320031910

बोरिवली – 9324531910

पुणे – 9422870773

कल्याण – 9619941910

लेह – 9320031910

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *