३६५ दिवस मुलाखतींचा विश्वविक्रमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
३६५ दिवस मुलाखतींचा विश्वविक्रमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
३६५ दिवस ३६५ कथा ह्या मुलाखतींच्या शृंखलेच्या माध्यमातून सौ रचना लचके बागवे या YouTubeChannel ‘Rachna Lachke Bagwe’ च्या माध्यमातून दररोज एक नवीन व्यक्तीची मुलाखत प्रकाशित केली आहे. शनिवार २० एप्रिल २०२४ रोजी ३६५ वी मुलाखत प्रसिद्ध करून सौ रचना लचके बागवे, नवीन विश्वविक्रमाला गवसणी घालणार आहेत. या जागतिक विक्रमासाठी आमंत्रित करताना आम्हाला आनंद होत आहे.
ह्या उपक्रमा दरम्यान आतापर्यंत श्री. मिलिंद लांजेवार – GST Commissioner, डॉ. रोहित साने – Madhavbaug, पदमश्री डॉ. मिलिंद कांबळे – संस्थापक अध्यक्ष DICCI, श्री. शंतनू भडकमकर प्रसिद्ध उद्योजक, सौ. सुषमा कुलकर्णी – प्र कुलगुरू निकमार विद्यापीठ, सौ अनिता नारकर – समाजसेविका अशा अनेक प्रतिष्ठित लोकांच्या मुलाखती ह्या शृंखलेत घेण्यात आल्या आहेत. ज्यामुळे समाजाला एक प्रेरणा मिळत आहे.
शनिवार २० एप्रिल २०२४ रोजी ‘365 Days 365 Stories – एक विश्वविक्रमी झेप’ हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी मंदीर सभागृह, दादर, मुंबई येथे सकाळी ९.३० ते दुपारी १.०० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
विकोचे संचालक श्री संजीव पेंढारकर, माधवबागचे डॉ . रोहित साने, असोचेमचे श्री. शंतनू भडकमकर, युके रिसॉर्टचे श्री. संतोष पाटील, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे, वास्तू रविराजच्या डॉ मंजुश्री अहिरराव, मी विजेता होणारचचे डॉ उमेश कणकवलीकर, रूरल रिलेशन्सचे श्री प्रदीप लोखंडे, ई बायोटोरिअमचे डॉ सागर जोशी असे दिग्गज व्यक्तिमत्व या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सामाजिक संस्था व आजी माजी शासकीय अधिकाऱ्यांच्या यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
चौकशीसाठी आणि अधिक माहितीसाठी, कृपया 9930026020 / 8082349822 वर संपर्क साधा
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3SHI9y3
शेअर ट्रेडींगची १८ प्रभावी सूत्रे – 18 Rules of Share Trading (Marathi Edition) Kindle Edition – https://amzn.to/3ul6ZvT
18 Effective Rules of Stock Trading Kindle Edition – Click on link to Read Free on Amazon Kindle or buy – https://amzn.to/3HXqUUw – English