१५ आणि १६ मार्च २०२१ रोजी बँकांचा संप
१५ आणि १६ मार्च २०२१ रोजी बँकांचा संप
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी नऊ कामगार संघटनांनी १५ आणि १६ मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. संपात AINBOF चे सुमारे ६८००० अधिकारी सहभागी होण्याची शक्यता आहे.
खासगीकरणाला विरोध तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि इतर प्रश्नांबाबत देखील सरकारने तातडीने तोडगा काढावा अशी संपकाऱ्यांची मागणी आहे.
ए.आय.बी.इ.ए (AIBEA), आयबोक (AIBOC), एन.सी.बी.इ (NCBE), ए.आय.बी.ओ.ए (AIBOA) , बेफी (BEFI ), इन्बेफ (INBEF), इन्बोक (INBOC), एन.ओ.बी.डब्लु (NOBW) आणि नोबो (NOBO) या नऊ संघटनांनी युनायटेड फोरम ऑफ बँक या संघटनेच्या नेतृत्वात १५ आणि १६ मार्च रोजी संपात सहभागी होण्याचा निर्धार केला आहे.
शेअर मार्केट मधून श्रीमंतीचा मार्ग ! / Share Market Mr. Avadhut Sathe